संजय लांडगे,वाडा,
खा.सावरा यांनी केली मनरेगाच्या अकुशल कामगारांच्या थकीत निधीची मागणी,
आज खा. सवरा यांनी केंद्रीय ग्रामीण विकास कृषी व शेतकरी कल्याणमंत्री शिवराज चौहान यांची भेट घेऊन आपल्या मागण्याचे निवेदन त्यांना दिले.
मनरेगा अंतर्गत पालघर जिल्ह्यातील अकुशल मजुरांचे थकित देयक निधी मिळावे, यासाठी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खा.डॉ.हेमंत विष्णू सवरा यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ( मनरेगा ) अंतर्गत पालघर जिल्ह्यातील अकुशल मजुरांचे थकित देयक निधी त्वरित मुक्त करण्याची विनंती केंद्रीय ग्रामीण विकास, कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज चौहान यांना केली.
२६ कोटी ४० लाख इतकी थकबाकी असून मजुरांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहॆ.त्यामुळे कामगारांच्या उपजीविकेवर परिणाम होत आहे.या संदर्भात डॉ.सवरा यांनी केंद्रीय मंत्री शिवराज चौहान यांना पत्र पाठवून तातडीने वरील थकीत निधी मुक्त करण्याची मागणी केली आहे.
मनरेगा ही ग्रामीण भागातील गरजू आणि अकुशल कामगारांसाठी महत्त्वाची योजना असून,या योजनेचा उद्देश निधीच्या विलंबामुळे बाधित होत आहे.पालघर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात मजूर,या योजनेवर अवलंबून आहेत,त्यामुळे निधी लवकरात लवकर वितरित करण्याची मागणी खासदार डॉ.हेमंत सवरा यांनी केली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राची प्रतही निवेदनासोबत संदर्भासाठी जोडण्यात आली आहे.कामगारांना त्यांचा हक्काचा निधी वेळेवर मिळावा आणि त्यांची आर्थिक कोंडी सुटावी,यासाठी त्वरित कार्यवाही करावी,असे आवाहन डॉ.हेमंत सवरा यांनी केंद्र सरकारला केले आहे.

