दीपक मोहिते,
” बॉटमलाईन,
५ लाख लाडक्या बहिणी ठरल्या सावत्र बहिणी,
सहा महिन्यांपूर्वी ज्या लाडक्या बहिणींवर धनवर्षाव झाला होता,त्या लाडक्या बहिणींवर आता संक्रात आली आहे.महायुती सरकारने सुमारे ५ लाख लाडक्या बहिणींना आता सावत्र बहिणी ठरवल्या आहेत.आणखी किती बहिणींना महायुतीचे सरकार सावत्र बहीण ठरवणार आहेत,देवजाणे ?
गेल्या डिसें.महिन्यात या योजनेचा लाभ देताना लाडक्या बहिणींची आकडेवारी २ कोटी ४६ लाख इतकी होती,ती जाने.२०२५ मध्ये २ कोटी ४१ लाखावर आली.निवडणूकीच्या तोंडावर महायुती सरकारने ही योजना कार्यान्वित करून तमाम विरोधी पक्षांना चारी मुंड्या चित केले.या योजनेसाठी येणारा प्रचंड खर्च हा राज्याला परवडणारा नाही,हे माहीत असतानाही महायुतीच्या नेत्यांनी या योजनेची धुमधडाक्यात अंमलबजावणी केली.त्याचे सकारात्मक परिणाम विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळाले.या योजनेतील लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पदरात भरभरून दान टाकले.पण दुसरीकडे या योजनेच्या पुढील टप्प्यात लाभ कसा द्यायचा ?

