- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” सूर्यातीर,” ” ग्रामीण भागातील साक्षरता ; एक भयाण वास्तव,” दक्षिणेकडील केरळ राज्याने साक्षरतेच्या क्रमवारीत आपला पहिला क्रमांक आजही टिकवला आहे.सुशिक्षित राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या राज्यात सत्तेत आलेल्या प्रत्येक सरकारने शिक्षण,कृषी व पर्यावरण,या महत्वाच्या क्षेत्रावर गेल्या सहा दशकात लक्ष केंद्रित केले.त्यामुळे हे राज्य देशात शिक्षण क्षेत्रात प्रगत राज्य ठरू शकले.उद्योग व आर्थिक क्षेत्रात अव्वल राज्य म्हणून ओळख असलेल्या आपल्या राज्याला मात्र ते शक्य होऊ शकले नाही.त्यामुळे आपल्या राज्याच्या ग्रामीण भागातील निरक्षरतेचे प्रमाण आजही ” जैसे थे,” स्थितीतच आहे. सध्या आपले सरकार रस्तेबांधणी,शासन आपल्या दारी,मेट्रो,सागरी सेतू उभारणी,इ.विकासकामांवर लाखो कोटी रु.खर्च करत आहे.नवीन रस्ते बांधणीच्या माध्यमातून गावे एकमेकांशी जोडण्याचा…
दीपक मोहिते, निवडणूक विश्लेषण, काँग्रेसने ईव्हीएम मशीनचं रडगाणं आता बंद करावे, जम्मू-काश्मीर व हरयाणा या दोन राज्याचे निकाल हाती आल्यानंतर एक महत्वाची चर्चा सुरू झाली आहे.या निकालाचे परिणाम महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीवर कसा होईल,यावर आता विचार मंथन सुरू झाले आहे.जम्मू-काश्मीरमध्ये भाजपला फारशा अपेक्षा नव्हत्या,काश्मीर खोरे हा प्रदेश मुस्लिमबहुल आहे,त्यामुळे या खोऱ्यात भाजपला फटका बसणार हे स्पष्ट होतं.कारण येथे कलम ३७० उठवण्यात आल्यामुळे मुस्लिम समाजाचा भाजपवर प्रचंड राग आहे.तो राग खोऱ्यातील मतदारांनी या निवडणुकीत ईव्हीएममधूम व्यक्त केला.जम्मू खोऱ्यात हिंदूंचे प्राबल्य आहे.पंजाबी,पंडित व मुस्लिमेतर समाज येथे बहुसंख्य आहे.त्यामुळे यावेळीही येथील मतदारांनी भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली.येथे नॅशनल कॉन्फरन्सला कधीही थारा मिळाला नाही,तसा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सकडे तर हरयाणा तिसऱ्यांदा भाजपच्या ताब्यात, जम्मू-काश्मीर व हरियाणा या दोन राज्याच्या निवडणुकीचे निकाल आज लागले.जम्मू-काश्मीर येथे अपेक्षित असा निकाल लागला.येथे नॅशनल कॉन्फरन्स व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांच्या आघाडीला ५० जागा मिळाल्या,त्यामुळे या राज्यात या दोन्ही पक्षाचे सरकार विराजमान होईल.पण हरयाणा राज्यात भाजपने काँग्रेस पक्षाचे मनसुबे उधळून लावले. या राज्यात मात्र काहीतरी गोलमाल झाले आहे,असा संशय काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी व्यक्त केला आहे.आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासात पिछाडीवर पडलेल्या भाजपने अचानक मुसंडी मारली व ५० जागा जिंकल्या,तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला ३४ जागांवर समाधान मानावे लागले.वास्तविक या राज्यात भाजपला जबर फटका…
दीपक मोहिते, विक्रमगड विधानसभा ; भुसारा विरुद्ध जनाठे,सरळ लढत होण्याची शक्यता, इच्छुक उमेदवारांच्या प्रगती पुस्तकाचे चावडी वाचन, विक्रमगड विधानसभा,( अनु.जमाती ) भाग क्र.६, पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विविध पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल,हे सांगणे,सध्या तरी कठीण आहे.पण यांना उमेदवारी का मिळावी,त्यांचे कर्तृत्व किती ? त्यांना परिसर विकासकामाबाबत किती आस्था आहे ? त्यांनी आपल्या पक्षवाढीसाठी किती प्रयत्न केले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.गेल्या महिन्यात या सर्व इच्छुकांना आपण प्रश्नावली पाठवली होती,पण एकाही इच्छूकाला यातील प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.त्यामुळे आता आपण स्वतःहून त्यांच्या या कामाचा आढावा आपल्या परीने…
दीपक मोहिते, ” भाऊबंदकी,” भाऊबंदकीवर अद्याप लस नाही… गृहकलह व भाऊबंदकीच्या शापाने इतिहासकाळात अनेक साम्राज्ये बुडाली,त्याकाळी लागलेली लागण,आजही तशीच सुरू आहे.प्लेग व कोरोना अशा अस्मानी संकटावर आपण यशस्वीपणे मात करू शकलो.पण गृहकलह व भाऊबंदकी या असाध्य रोगावर आपण कोरोनासारखी लस तयार करू शकलो नाही.मराठा साम्राज्याला घरघर का लागली,पेशवाई का बुडाली ? या प्रश्नाच्या खोलात जाऊन पाहिल्यास आपल्या समोर मराठेशाहीचा काळाकुट्ट येतो. सातशे ते आठशे वर्षात आपण अनेक स्थित्यंतरे पाहिली व परिवर्तनाच्या उसळलेल्या लाटा अनुभवल्या. पण या असाध्य अशा रोगावर कामस्वरूपी उपाययोजना करू शकलो नाही.त्यामुळे आता भाऊबंदकीने अक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे.पूर्वी राजघराण्यात हे पाहायला मिळत असे,अभयसिंहराजे,कल्पनाराजे,उदयनराजे व शिवेंद्रराजे या…
दीपक मोहिते, ” निवडणूक विशेष,” जम्मू-काश्मीर व हरियाणा, भाजप पराभवाच्या छायेत, वरील दोन्ही राज्यात विधानसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून उद्या निकाल लागणार आहे.या दोन्ही राज्यातील मतदानानंतर जे एक्झिट पोल जाहीर झाले आहेत,ते सारे पोल हे भाजपची चिंता वाढवणारे आहेत.या एक्झिट पोल नुसार या दोन्ही राज्यात भाजप भुईसपाट होणार आहे.जम्मू व काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ.व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या आघाडीला एकूण ९० जागांपैकी ५१ ते ५८ तर भाजपला २५ ते ३० जागा मिळण्याची शक्यता आहे. यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये काश्मीरच्या खोऱ्यात भाजपला कधीच फारशा जागा मिळत नाही.पण जम्मूच्या खोऱ्यात मात्र त्यांच्या पारड्यात अनेक जागा पडतात.या खोऱ्यात भाजपचा चांगला दबदबा आहे,मात्र या निवडणुकीत…
दीपक मोहिते, इच्छुक उमेदवारांच्या प्रगती पुस्तकाचे चावडी वाचन, डहाणू विधानसभा,( अनु.जमाती ) भाग क्र.५, पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विविध पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल,हे सांगणे,सध्या तरी कठीण आहे.पण यांना उमेदवारी का मिळावी,त्यांचे कर्तृत्व किती ? त्यांना परिसर विकासकामाबाबत किती आस्था आहे ? त्यांनी आपल्या पक्षवाढीसाठी किती प्रयत्न केले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.गेल्या महिन्यात या सर्व इच्छुकांना आपण प्रश्नावली पाठवली होती,पण एकाही इच्छूकाला यातील प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.त्यामुळे आता आपण स्वतःहून त्यांच्या या कामाचा आढावा आपल्या परीने घेतला आहे.सर्वप्रथम आपण जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्नावर एक नजर टाकूया….…
दीपक मोहिते, इच्छुक उमेदवारांच्या प्रगती पुस्तकाचे चावडी वाचन, बोईसर विधानसभा,( अनु.जमाती ) भाग क्र.४, पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विविध पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल,हे सांगणे,सध्या तरी कठीण आहे.पण यांना उमेदवारी का मिळावी,त्यांचे कर्तृत्व किती ? त्यांना परिसर विकासकामाबाबत किती आस्था आहे ? त्यांनी आपल्या पक्षवाढीसाठी किती प्रयत्न केले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.गेल्या महिन्यात या सर्व इच्छुकांना आपण प्रश्नावली पाठवली होती,पण एकाही इच्छूकाला यातील प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.त्यामुळे आता आपण स्वतःहून त्यांच्या या कामाचा आढावा आपल्या परीने घेतला आहे.सर्वप्रथम आपण जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्नावर एक नजर टाकूया….…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.१, देश व राज्य कर्जाच्या खाईत, केंद्र व महाराष्ट्र सरकार कितीही बोंबलत असले तरी देश व आपले राज्य कर्जात अखंड बुडल्याचे विविध वित्तीय संस्थांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.देशावर सुमारे २०५ लाख कोटी रु.चा बोजा असून आंतरराष्ट्रीय नाणे निधीने केंद्र सरकारला कडक शब्दात इशारा दिला आहे.राज्याची आर्थिक स्थितीही पार डबघाईला आली असून राज्यावर असलेल्या कर्जाचा बोझा हे ८२ हजार कोटींवर गेला आहे.दहा वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी देशावर ५४ लाख कोटीचे कर्ज होते,ते आता २०५ लाख कोटीवर गेले आहे.कर्ज जर असंच वाढत गेलं तर ते जीडीपीपेक्षा अधिक होईल,असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे.त्यांनी दिलेल्या अहवालात देशाचे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अरे कुठे नेवून ठेवला आमचा महाराष्ट्र ? विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे राज्यातील जनतेला काय काय पाहावे लागणार आहे,देवजाणे ? कोण मंत्रालयाच्या सज्यातून उड्या मारतो,कोण गुलाबी जाकीट घालून फिरतोय,तर कोण दर दोन ते दिवसाने मोदी व शहा यांच्या विमानाची वाट बघत विमानतळावर ताटकळत उभे राहत आहेत.अरे काय चाललंय आमच्या मराठी मुलखात,कुठे नेवून ठेवला आहे,आमचा महाराष्ट्र ? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हा-आम्हाला कधीही मिळणार नाही.भले मग आमचा महाराष्ट्र कायदा – सुव्यवस्थेविषयी रसातळाला गेला तरी बेहत्तर… आज या राजकारण्यांनी केलेली आपल्या महाराष्ट्राची अवस्था पाहून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी आपले देह ठेवले ते हुतात्मा नक्कीच ढसाढसा रडत असतील.पण ही रडायची…
