- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मुद्दा योग्य असला तरी ” औलादी,” या शब्दाचे समर्थन होऊ शकत नाही… राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भय्याजी जोशी यांनी एका कार्यक्रमात मराठी भाषेबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे अद्याप पडसाद उमटत आहे.त्यांच्या या वक्तव्यावर सर्वत्र जोरदार टीका झाली.मनसे नेते राज ठाकरे यांनीही तीव्र संताप व्यक्त करत भय्याजी जोशी यांना याविषयी खडे बोल सुनावले.त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर ऍड.सदावर्ते गुणरत्ने यांनी राज ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.ते एवढ्यावरच थांबले नाहीत,तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही त्यांनी सडकून टीका केली. टीका करताना ते म्हणाले,राज ठाकरे ज्याप्रकारे व्यक्त झाले, मला खरोखर त्यांची कीव येते.राज ठाकरे,मला सांगा तुमच्या औलादी कोणत्या शाळेत शिकल्या ?…
दिपक मोहिते, अबब… आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल : महाराष्ट्राची भयावह आर्थिक स्थिती आली समोर, ” भीक नको,पण कुत्र आवर, ” या म्हणीप्रमाणे सध्या राज्यातील जनतेची झाली आहे.महायुती सरकारमधील नेत्यांच्या मताच्या हव्यासापोटी राज्यासमोर आर्थिक संकट वाढत चालले आहे.महसुली उत्पन्नापेक्षा राज्याचा खर्च वाढत असून कर्ज आणि व्याजापोटी मोठी रक्कम खर्च होत आहे.त्यामुळे भांडवली खर्चासाठी दुसरे कर्ज काढण्याशिवाय सरकारपुढे अन्य पर्याय उपलब्ध नाही.आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल काल वित्तमंत्र्यांनी विधानसभेच्या पटलावर मांडला. आर्थिक पाहणी सर्वेक्षण अहवालातून राज्याची बिकट परिस्थिती समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात हा अहवाल मांडला. गेल्या वर्षी राज्यात सुमारे २०० तालुक्यांमध्ये अतिरिक्त, ६८ तालुक्यांमध्ये सरासरी आणि…
जव्हार जव्हार येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त ग्रामीण आदिवासी युवा कलाकार कृष्णा सदाशिव भुसारे ( वारली चित्रकार ) यांनी जिल्हा परिषद शाळा मोकाशीपाडा व जिल्हा परिषद शाळा दादरकोपरा, केंद्र-हिरडपाडा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे ( पेंटिंग किट ) वाटप केले. कार्यक्रमाचे ठळक मुद्दे: विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम – राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त वारली चित्रकार कृष्णा भुसारे यांनी विद्यार्थ्यांना पेंटिंग किट वाटप करून चित्रकलेला चालना दिली. या उपक्रमासाठी दीपक चौधरी सरांचे मोलाचे योगदान लाभले. विद्यार्थ्यांना चित्रकलेबाबत प्रेरित करून त्यांच्यातील सर्जनशीलता विकसित करण्याचा यावेळी प्रयत्न करण्यात आला. शाळेच्या वतीने कृतज्ञता व प्रमुख पाहुण्यांचे आभार मानून शिक्षकांनी विद्यार्थी हितासाठी असे उपक्रम पुढेही राबवावेत अशी भावना…
सचिन परब,विरार वसई विरार शहर मनपाचा सन २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर, वसई विरार शहर महानगरपालिकेचा सन २०२४-२५ च्या सुधारित अर्थसंकल्पासह सन २०२५-२६ चा मूळ अर्थसंकल्प काल वसई विरार शहर महानगरपालिकेचे मा. आयुक्त यांच्या वतीने प्रशासनाला सादर करण्यात आला. सन २०२४-२५ चा सुधारीत अर्थसंकल्प रु.३ हजार ५३८ कोटी व सन २०२५-२६ चा मूळ अर्थसंकल्प रु.३ हजार ९२६ कोटींचा ( रु. २.४० कोटी शिलकेसह ) आहे. सन २०२५-२६ च्या अर्थसंकल्पामध्ये पाणीपुरवठा योजना व मलःनिस्सारण योजना यासाठी भरीव तरतुदी केल्या आहेत. सदर अंदाजपत्रक सादर करतेवेळी महानगरपालिकेचे अन्य विभागांचे विभागप्रमुख तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दीपक मोहिते, जागतिक महिला दिन ; ग्रामीण भागातील कष्टकरी महिला आजही उपेक्षित, आज जागतिक महिला दिन,जगभरात तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.महिलांनी आपल्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस,आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो.महिलांचा खरा सन्मान राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी महिलांना आरक्षण देऊन केला होता.त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळाले.आज कोट्यावधी महिला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकल्या.मात्र ग्रामीण भागातील कष्टकरी महिला आजही कबाडकष्ट करत हलाखीचे जीवन जगत आहेत. हे चित्र जेंव्हा बदलेल,तेव्हांच खऱ्या अर्थाने महिलांना न्याय मिळाला,असे आपल्याला म्हणता येईल. हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यामागे नेमका उद्देश…
अमित जोशी, विरार, नरेडको महाराष्ट्र होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ सुरू, बहुप्रतिक्षित वसई-विरार होमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ च्या भव्य शुभारंभासह नरेडको महाराष्ट्रने वसई-विरार परिसराच्या रिअल इस्टेट क्षेत्राला एका नवीन उंचीवर नेले आहे.७ ते ९ मार्च २०२५ दरम्यान वाईएमसीए ग्राउंड, माणिकपूर, वसई पश्चिम येथे होणारा हा तीन दिवसीय भव्य कार्यक्रम घरखरेदीदार,गुंतवणूकदार आणि रिअल इस्टेट व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर लक्ष वेधून घेत आहे.या एक्स्पोमुळे वसई-विरार क्षेत्राच्या वाढत्या महत्त्वावर शिक्कामोर्तब झाले आहे. या एक्स्पोमध्ये ४० नामांकित विकासक,व्यवसायिक युनिट्स आणि २,५०० पेक्षा जास्त औद्योगिक युनिट्स यांचा सहभाग असून, हा वसई-विरारमधील सर्वात मोठा आणि व्यापक रिअल इस्टेट शोकेस आहे. परवडणाऱ्या घरे ते आलिशान निवासस्थानांपर्यंत विविध पर्याय उपलब्ध…
अनंत भोईर,पालघर जिल्हा परिषदेच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद, जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद,पालघर येथे महिला स्वयंसहाय्यता समूहांच्या उत्पादनांचे एकदिवसीय प्रदर्शन व विक्री मोठ्या उत्साहात पार पडले. मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या संकल्पनेतून आयोजित या उपक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. गृहउद्योगाला चालना देण्यासाठी आयोजित या प्रदर्शनात पापड,लोणची, मसाले,वाळवणी पदार्थ,ताक, फ्रूट सलाड,आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली.जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाने यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले. प्रकल्प संचालक डॉ.रूपाली सातपुते,उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक अतुल पारस्कर, शिक्षणाधिकारी संगीता भागवत,शिक्षणाधिकारी सोनाली मातेकर,जिल्हा कृषी विकास अधिकारी सोमनाथ पिंजारी तसेच इतर विभाग प्रमुखांनी आणि अधिकाऱ्यांनी प्रदर्शनाला भेट देऊन स्वयंसहाय्यता गटाच्या महिलांसोबत,त्यांचे उत्पन्न…
दीपाली संतोष सोनावणे, कन्या झाली म्हणून नको करू हेळसांड, गोपू बाळाच्या शेजारी सोनू ताईचा पाट मांड. लहानपणी ही कविता म्हणताना याचा अर्थ कधी कळला नव्हता.मोठेपणी प्रत्यक्ष अनुभव व आजूबाजूच्या परिस्थितीतून जाणीव झाली की सोनू ताई खरंच नकोशी होती का कोणाला ? ” काय ग ! दोन्ही मुलीच का तुला ?” हा प्रश्न एखाद्या स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला विचारला की कीव येथे अशा बुद्धीभ्रष्ट लोकांची.मुलगा व मुलगी यांच्यामध्ये भेदाभेद त्याकाळीही टळला नव्हता आणि आजही काही प्रमाणात पाहायला मिळतात. उद्या ८ मार्च जागतिक महिला दिन,मुळात असे दिवस साजरे करण्याची वेळ का येते ? तर महिलांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी सोसलेल्या वेदनांसाठी त्यांच्या…
वसंत भोईर,वाडा वाडा तालुक्यात साडेतीन हजार तरुणांना रोजगार मिळणार, कोंटेन्ड्रे सोलर कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातील साडेतीन हजार स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत.राज्यातील प्रत्येक गाव खेड्यातील घराघरात सोलर पोहोचवून वीजबिल मुक्त खेडे करण्यासाठी शासनाच्या कार्याला हातभार लावणार असल्याचे कंपनीचे मालक परेश शेठ यांनी सांगितले. तालुक्यातील मुसरणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत साडेदहा एकर क्षेत्रात कोंटेन्ड्रे सोलर हा कारखाना उभा राहत असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत aaj सकाळी या सोलर कंपनीचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक बाळाराम चौधरी,विधानसभा समन्वयक सचिन पाटील, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील,परेश शेठ,यश शेठ,धर्मेश शेठ,ग्रामपंचायत मुसारणे,ग्रामपंचायत नारेचे सर्व पदाधिकारी,रवींद्र मेने, स्वप्निल…
दिपक मोहिते, लाडकी बहीण योजना ; फुगा लवकरच फुटण्याची शक्यता, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारला राज्यातील ” बहिणी,” अचानक ” लाडक्या,” वाटू लागल्या व त्यांनी खिरापत वाटण्यास सुरुवात केली.आता त्यांचे हे खिरापत वाटणे,अंगलट येऊ लागल्यामुळे ज्या लाडक्या बहिणी निकषामध्ये बसत नाहीत,त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचे सांगत सुटले आहेत.दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे संकेत दिले आहेत. लाडकी बहीण योजना सुरू राहणार असली तरी ज्या महिला निकषामध्ये बसत नाहीत,त्यांना या योजनेतून आता वगळण्यात येणार आहे.आतापर्यंत अपात्र बहिणींची संख्या ९ लाखाच्या घरात पोहोचली आहे.विधानसभा निवडणूका जिंकल्यानंतर सरकारने लाडक्या बहिणींना १५००/- ऐवजी २१००/- रु.देणार असल्याचे जाहीर आश्वासन दिले होते.पण ते आश्वासन हवेतच विरले.शासनाच्या…
