वसंत भोईर,वाडा
वाडा तालुक्यात साडेतीन हजार तरुणांना रोजगार मिळणार,
कोंटेन्ड्रे सोलर कंपनीच्या माध्यमातून तालुक्यातील साडेतीन हजार स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत.राज्यातील प्रत्येक गाव खेड्यातील घराघरात सोलर पोहोचवून वीजबिल मुक्त खेडे करण्यासाठी शासनाच्या कार्याला हातभार लावणार असल्याचे कंपनीचे मालक परेश शेठ यांनी सांगितले.
तालुक्यातील मुसरणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत साडेदहा एकर क्षेत्रात कोंटेन्ड्रे सोलर हा कारखाना उभा राहत असून अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत aaj सकाळी या सोलर कंपनीचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) भिवंडी महानगरपालिकेचे नगरसेवक बाळाराम चौधरी,विधानसभा समन्वयक सचिन पाटील, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष जितेश पाटील,परेश शेठ,यश शेठ,धर्मेश शेठ,ग्रामपंचायत मुसारणे,ग्रामपंचायत नारेचे सर्व पदाधिकारी,रवींद्र मेने, स्वप्निल जाधवआदीसह या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

