- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
Author: दीपक मोहिते
सुरेश वैद्य,पालघर शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालघर जिल्ह्यामध्ये होणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल,असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा शुभारंभ पालघर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला,त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खा.डॉ.हेमंत सवरा,आ.सर्वश्री राजेंद्र गावित,निरंजन डावखरे, माजी आ.राजेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी ,संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जी.के थोरात,कार्याध्यक्ष नरसु पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पहेलगाम येथे पर्यटकावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेचीअत्यंत गंभीर दखल घेतली असून अतिरेक्यावर अशा पद्धतीने कारवाई करण्यात…
वसंत भोईर,वाडा कुडूसमध्ये रंगला कबड्डीचा थरार, धिरज निलेश सांबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जिजाऊ संघटनेतर्फे कुडूस ता. वाडा येथे जिल्हास्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा आज पार पडल्या.या स्पर्धेत साईकृपा वसरे पालघर संघाने विजेतेपद पटकावले. लवकुश बोईसर व जीवनज्योती हालोली संघ हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले. तर चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरला तो जय हनुमान दिनकरपाडा संघ वाडा.या स्पर्धेचा मालिकावीर ठरला लवकुश संघाचा राघवेंदरसिंग तर सर्वोत्कृष्ट पकडीचा मान वसरे संघाचा फैजल खान तर हालोली संघाचा हुकमी एक्का ध्रुव डोंगरे यांना मिळाला.सर्वोत्कृष्ट रेडर महिला संघातून प्रथम क्रमांकाचा मान मिळवला समर्थ क्रीडा महिला संघ वाडा यांनी तर द्वितीय क्रमांकाचा मान मिळाला जे.वाय.पाटील…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” कलमा म्हणजे काय ? इस्लाममध्ये त्याला इतकं महत्व का ? पहलगामच्या हल्ल्यात पर्यटकांना म्हणायला लावलेला कलमा म्हणजे काय ? याच हल्ल्यादरम्यान कलमा म्हटल्याने माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे प्राण वाचले,असं आसामचे प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य म्हणाले.देबाशिष हे एका झाडाखाली पुरुषांच्या गटासोबत बसले आणि कलमा म्हणू लागले.त्यामुळे त्यांच्यावर दहशतवाद्याने गोळी झाडली नाही. पहलगाममधील बैसनर याठिकाणी २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अमानुष गोळीबार केला. ” तुमच्यापैकी हिंदू कोण आणि मुस्लिम कोण आहेत ? तुमचा धर्म कोणता आहे ? मुस्लिम असाल तर कलमा वाचून दाखवा,” असं म्हणत दहशतवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य केलं. सर्व मुस्लिमांनी कलमा जाणून घेणं आवश्यक असतं,कारण ते इस्लामी श्रद्धेचा…
संदीप जाधव,बोईसर भाजप बोईसर मंडळ निवडणुकीवरून वाद ; अनेक कार्यकर्ते नाराज, भाजपच्या बोईसर मंडळाच्या निवडणूक प्रक्रियेवर आरोप होत असून,व्यापारी मोर्चा व वाहतूक आघाडीतील प्रमुख कार्यकर्त्यांना मतदान प्रक्रियेतून जाणूनबुजून दूर ठेवण्यात आल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीची प्रक्रिया तातडीने स्थगित करण्याची मागणी करण्यात येत आहे.याप्रकरणी कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहेत. भाजपच्या बोईसर मंडळ निवडणुकीत पारदर्शकतेचा अभाव होता.व्यापारी मोर्चा आणि वाहतूक आघाडीचे सक्रिय पदाधिकारी असूनही दुर्गेश सोलंकी आणि अहमद खान यांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आले.निवडणूक प्रक्रियेची कुठलीही पूर्वकल्पना न देता एकतर्फी पद्धतीने प्रक्रिया राबवण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या संदर्भात भाजप नेते आशिष संखे…
जव्हार,प्रतिनिधी जव्हार येथे रेवजीभाई चौधरी यांची ११५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी, ” जव्हारचा ढाण्या वाघ,” अशी ओळख असलेले व १९४२ च्या ” चले जाव,” आंदोलनात सक्रिय भाग घेतलेले खरवंद गावचे सुपुत्र स्वातंत्र्य सैनिक वीर रेवजीभाई चौधरी यांची ११५ वी जयंती आज जिल्हा परिषद शाळा चौक,तालुका जव्हार,केंद्र वाळवंडा येथे उत्साहात साजरी करण्यात आली.सदर कार्यक्रमाची सुरुवात स्वा.सैनिक रेवजीभाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.या प्रसंगी शाळेचे पदवीधर शिक्षक रवी बुधर यांनी स्वातंत्र्य सैनिक रेवजीभाई चौधरी यांच्या संघर्षमय जीवनाची माहिती विद्यार्थ्यांना दिली.त्यांनी म.गांधी यांच्या नेतृत्वाखालील सत्याग्रह आंदोलनात केलेल्या…
दीपक मोहिते ” निर्लज्जपणा, ” शिंदे यांनी म्हस्के यांना वेळीच आवरावे,अन्यथा पक्ष अडचणीत येण्याची शक्यता, एकनाथ शिंदे यांच्या गटाचे खा.नरेश म्हस्के हे वादग्रस्त नेते म्हणून ओळखले जातात. काश्मीर येथे घडलेल्या घटनेनंतर वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.मस्के हे नेहमीच वादग्रस्त विधाने करून या-ना त्या कारणावरून वादात सापडत असतात. यावेळी त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात जोरदार पडसाद उमटले. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना प्रवक्तेपदावरून हटवण्यात यावे,अशी मागणी करण्यात येत आहे. जम्मू काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या नागरिकाविषयी त्यांनी वादग्रस्त विधान केले व पुन्हा एकदा वाद ओढवून घेतला आहे.जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या प्रवाशांना मदत करणे,ही राज्य सरकारची जबाबदारी असताना,अशा प्रकारचे वक्तव्य करणे,हे अपमानास्पद आणि…
दिपक मोहिते, बदला घेणार,म्हणजे नक्की काय करणार ? जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते.या घटनेला चार दिवस उलटून गेले.पण ज्या दहशतवाद्यांना पाककडून रसद पुरवण्यात येते,त्या पाकिस्तानला आपले मोदी सरकार केवळ इशारे देत बसले आहे.एकाही दहशतवाद्याला सोडणार नाही,अशा सिंहगर्जना करण्यात आपले सरकार धन्यता मानत आहे.हे दहशतवादी आता पाकीस्तानच्या आश्रयाला गेले आहेत.त्यांना हुडकून काढून त्यांना ठार मारणे,ही आपल्या आवाक्या बाहेरची गोष्ट आहे. पाकिस्तानशी युद्ध करणे,ही अशक्यप्राय गोष्ट आहे.पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळ आपण उध्वस्त करू शकतो,पण त्या देशाशी आपल्या लोकांना आपल्याला थेट युद्ध करणे,शक्य नाही.कारण दोन्ही देश न्यूक्लिअर पॉवर देश आहेत.दोन्ही देशात युद्ध झालेच तर ते तिसऱ्या…
वसंत भोईर,वाडा १९ हजार रू.ची लाच घेताना सरपंचाला रंगेहाथ पकडले, तालुक्यातील सापरोंडे मांगाठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा गवारी यांना ग्रामपंचायत कार्यालय विस्तारिकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी २ टक्के प्रमाणे एकूण १९ हजार रू.ची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.त्यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून सरपंचावर कारवाई होण्याची ही पहिलीच वेळ आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,वाडा तालुक्यातील सापरोंडे मागाठणे या ग्रामपंचायतीच्या सरपंच शोभा सुनिल गवारी वय ३६ या आहेत.येथील ग्रामपंचायत कार्यालय विस्तारिकरण करण्याच्या कामाचे मंजूर केलेल्या बिलाच्या रकमेपैकी २ टक्के प्रमाणे एकूण २० हजारांची लाच सरपंच शोभा गवारी यांनी तक्रारदार यांच्याकडे मागितली होती.तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी…
सचिन परब,विरार लायन्स क्लबतर्फे आगाशी जिल्हा परिषद शाळेला बेंचेसची भेट, राज्यातील जिल्हा परीषद शाळांची दुर्दशा व दिवसेंदिवस कमी होत चाललेली विद्यार्थ्यांची संख्या ही चिंतेची बाब ठरत आहे.गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी समाजातील अनेक सेवाभावी संस्था नेहमीच खारीचा वाटा उचलत असतात. विरारमधील एका शाळेला लायन्स क्लबकडून मदतीचा हात देण्यात आला आहे.या मदतीमुळे विद्यार्थ्याँना दिलासा मिळाला आहे. वसई तालुक्यातील आगाशी येथील जिल्हा परिषद शाळा ही एकेकाळी नावाजलेली अशी शाळा.बदलत्या काळात इंग्रजीच्या ओढ्यामुळे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या उतरणीला लागली.तसेच शासनाच्या शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे या शाळेची पार दुरावस्था झाली आहे. शाळेमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांना सध्या अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत होते.या शाळेत…
वसंत भोईर,वाडा, वाडा तालुक्यात जागतिक हिवताप दिन साजरा, जागतिक हिवताप दिना निमित्त आरोग्य विभागाकडून तालुक्यात विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले. जिल्हा हिवताप अधिकारी अश्विनी राव,वाडा तालुका आरोग्य अधिकारी शरयू तुपकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रा.आ.केंद्र खानीवली,प्रा.आ.केंद्र गोऱ्हे, प्रा.आ.केंद्र परळी,प्रा.आ.केंद्र कुडूस अंतर्गत विविध गावात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले. यावर्षी जागतिक हिवताप दिन ” चला हिवताप संपवू या : पुन्हा योगदान द्या,पुनर्विचार विचार करा,पुन्हा सक्रिय व्हा,” या थीम खाली साजरा करण्यात आला.प्रा.आ.केंद्र खानिवली अंतर्गत येणाऱ्या मौजे तुसे येथे वैद्यकीय अधिकारी अश्विनी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तुसे गावात हिवताप जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी माध्यमिक विद्यामंदिर तुसे येथील विध्यार्थ्यांना हिवताप,डेंगू,चिकन गुनिया, हत्ती…
