- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आता मलईदार खात्यासाठी तीन इंजिनच्या सरकारमध्ये मॅरेथॉन स्पर्धा सुरू… निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठ दिवस झाले तरी मुख्यमंत्री कोण ? व कोणती खाती कोणाला ? या दोन प्रश्नाची उत्तरे शोधण्यात महायुती अपयशी ठरली आहे.मुख्यमंत्रीपद भाजपला द्यायचे ठरल्यानंतरही उमेदवाराचा चेहरा कोण ? हे जाहीर करण्यात भाजपचे केंद्रीय नेते मागेपुढे का करत आहेत,याचा उलगडा होत नाही.एकनाथ शिंदे हे मुंबईला परतले असले तरी त्यांचा राजकीय आजार अद्याप आटोक्यात आल्याचे दिसत नाही.अडीच वर्षांपूर्वी आपण जो डाव खेळलो,तो डाव आपल्यावर बुमरॅग होईल,असे त्यांना वाटले नव्हते.पण तो अखेर उलटलाच,” उसके घर देर है,पर अंधेर नही,” याची प्रचिती एकनाथ शिंदे यांना गेल्या आठ…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मनसे ; आता पुन्हा सावरणे जरा कठीणच… या निवडणुकीतील निकाल पाहता राज यांची मनसे पुन्हा निवडणुका लढवण्याच्या फंदात पडतील,असे वाटत नाही.पालघर व ठाणे जिल्ह्यात मनसेचा झालेला दारुण पराभव लक्षात घेऊन त्यांचे वादग्रस्त जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा दिला होता.पण अचानकपणे त्यांना नैतिकतेचा विसर पडला व त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला.पण त्यांच्या या कृतीचे पालघर म्हणा की ठाणेवासियाना बिलकुल आश्चर्य वाटले नाही. सर्वच्या सर्व म्हणजे १२८ उमेदवाराचा पराभव होणे,हा प्रकारच मुळात जिव्हारी लागणारा होता,त्यापैकी ६० ते ७० उमेदवारांच्या अनामत रकमा जप्त होणे,हे तर त्याहून जिव्हारी लागणारे ठरले.पण या पराभवातून राज व त्याचे फंटर्स काही…
दीपक मोहिते, भयाण वास्तव, पाणीटंचाई ; वेळीच सावध न झाल्यास जगभरात हाहाकार उडेल…. राज्याच्या यंदा चांगला पाऊस होऊनही अनेक जिल्ह्यात आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली आहे.जगातील अनेक देशांनाही या समस्येने चांगलेच घेरले आहे.दक्षिण आफ्रिकेची राजधानी केपटाऊन या शहरात चार दिवस आड पाणी सोडण्यात येत आहे.पण आपण पाणी बचत,पाण्याचा अपव्यय टाळणे,भूगर्भातील पाण्याचा अविरत होणारा पाणीउपशा व पर्यावरणाचे संवर्धन या महत्वाच्या प्रश्नांकडे ढुंकूनही पाहायला तयार नाही. जगात सध्या नैसर्गिक संसाधने ओरबाडून खाण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली असल्याचे जाणवू लागले आहे.झाडांची कत्तल,डोंगर पोखरणे,वनजमिनी बळकावणे व भूगर्भातील पाण्याचा प्रचंड उपशा,अशा कारणांमुळे मानवी जीवन आता धोक्यात आले आहे.यामध्ये भूगर्भातील पाण्याचा होणाऱ्या अविरत उपशामूळे आज अनेक…
दीपक मोहिते, विरार येथे महिलांसाठी कार्यशाळा संपन्न, यंग स्टार ट्रस्टचे अध्यक्ष लोकनेते माजी आ.हितेंद्र ठाकूर यांच्यातर्फे खास महिलांसाठी व्यवसाय विषयक उपक्रम अंतर्गत विनामूल्य अत्तर,अगरबत्ती,फिनाईल बनवण्याचे प्रशिक्षण आज साईबाबा मंदिर हॉल कारगिल नगर मनवेलपाडा विरार पूर्व येथे आयोजित करण्यात आले होते. या कार्यशाळेस स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत राऊत,माजी नगरसेविका मीनल पाटील, संगीता भेरे,यंग स्टार ट्रस्टच्या रुचिता नाईक,मिलिंद पोंक्षे, भूषण चूरी,बहुजन विकास आघाडी कार्यकर्ता मनीष राऊत,बहुजन विकास आघाडी कार्यकर्ते,महिला कार्यकर्त्या,मनवेल पाडा विभागातील महिला वर्ग उपस्थित होता. सदर कार्यशाळेस उपस्थित महिलाना रुचिता नाईक यांनी अत्तर,अगरबत्ती,फिनाईल बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले व याविषयी सखोल मार्गदर्शन केले.सदर कार्यशाळा संघटक सचिव व ट्रस्टचे समन्वयक अजिव पाटील यांच्या…
दीपक मोहिते, भयानक वास्तव, पालघर जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अळ्या व बुरशी, ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या विद्यार्थांच्या शरीरात क्रयशक्ती वाढावी,त्यांना कुपोषणाची लागण लागू नये,यासाठी केंद्र व राज्य सरकारने काही दशकापूर्वी पोषण आहार योजना सुरू केली.पण शिक्षण विभागाचे अधिकारी व पुरवठादार यांच्या मिलीभगत मुळे या योजनेतील गैरप्रकाराला अक्षरश: उत आला आहे. पालघर जिल्हा परिषदेच्या २ हजार ३७१ प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील मुलांना देण्यात येणाऱ्या मिलेट न्यूट्रेटिव्ह बार फूडमध्ये,गेल्या सहा महिन्यापासून जिवंत अळ्या आणि बुरशी आढळल्याच्या तक्रारी आल्या होत्या.त्याची दखल घेऊन अनेक शाळांनी आपल्या वरिष्ठाना कळवले होते.तरीही मुलांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या या फूडचे वाटप सुरूच आहे.जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या आदिवासी,गरीब मुलांच्या…
दीपक मोहिते, ” वास्तव,” तीन अपत्ये ; भागवतांचे वक्तव्य,अराजकाला आमंत्रण देणारे, जगभरातील अनेक देशात सध्या अशांतता निर्माण झाली असून अनेक देश युद्धाच्या खाईत ढकलले गेले आहेत.रशिया-युक्रेन,इस्रायल -पॅलेस्टाईन,लेबनॉन,इराण,इ.सुरू असलेले युद्ध थांबायचे नाव घेत नाही.सिरिया,लिबिया,श्रीलंका,बांगलादेश,पाकिस्तान, म्यानमार,इराक व पाकिस्तान या देशात प्रचंड अराजक निर्माण झाले आहे.त्याचा फटका आपण व आपला शेजारी असलेल्या नेपाळ या देशानाही बसण्याची शक्यता आहे. भारत व नेपाळ,या दोन्ही देशांनी अनेक वर्षापूर्वी लोकशाही व्यवस्था स्विकारली आहे.या दोन्ही देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य,धर्मस्वातंत्र्य व मूलभूत अधिकार यास अनन्यसाधारण महत्व देण्यात आले आहे.आपल्या देशाचा कारभार,हा भारतीय संविधानाने आखून दिलेल्या चौकटीत केला जातो.मात्र गेल्या दहा वर्षात आपल्या देशाची वाटचाल एकाधिकारशाहीच्या दिशेने सुरू झाली आहे.हिंदुत्वाच्या नावाखाली…
दीपक मोहिते, राजकीय घडामोडी, वसई-विरार शहर मनपा निवडणुका ; भाजपकडून फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात, लोकसभा,विधानसभा व त्यानंतर आता वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत.या निवडणुका सर्वसाधारणपणे फेब्रु.महिन्यात लागतील,अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पालघर लोकसभा मतदारसंघातील लोकसभेची एक व विधानसभेच्या सहाही जागा भाजपने जिंकल्या असून या दोन्ही निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाचा पार धुव्वा उडाला आहे.त्यामुळे महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.राज्याचे मंत्रिमंडळ अस्तिवात आल्यानंतर या निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार आहे.महायुतीची निवडणूक यंत्रणा ही वर्षाचे बारा महिने निवडणुकीसाठी सज्ज असते.उमेदवार निवड,घटक पक्षाशी जागावाटपा संदर्भात बोलणी,इ.सोपस्कार तेवढे शिल्लक राहतात. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला की या कामाना वेग येत असतो.वसई-विरार शहर…
दीपक मोहिते, भाकरी फिरणार, अमित शहा आता धक्का देण्याच्या तयारीत, महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून धमासन सुरू असताना गृहमंत्री अमित शहा आता याप्रकरणी धक्का देण्याच्या तयारीत आहेत.पुण्याचे खा.मुरलीधर मोहोळ यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या स्पर्धेत आल्यामुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.असं जर घडलं तर एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस या दोघांची अवस्था ” माका नका,तुका नका,घाल कुत्र्याला,” अशीच होणार आहे. निवडणुका झाल्यानंतर भाजप आपली वाघनखे बाहेर काढतील,असा अंदाज आम्ही लेखातून व्यक्त केला होता आणि धडले देखील तसंच,त्यांची वाघनखे बाहेर पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना आपले जन्मगाव असलेलं ” दरे,” गाव गाठावे लागले.खा.मुरलीधर मोहोळ यांचे नाव अचानक स्पर्धेत आलेले नाही.राज्यात भाजपला विजय मिळवून देण्यात देवेंद्र फडणवीस यांचा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” छोट्या राज्यांची निर्मिती करणे गरजचे, स्वतंत्र विदर्भाच्या मागणीवर संसदेत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली असून गृहमंत्रालयाने याविषयी कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचे सांगितले.केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे स्वतंत्र विदर्भाची मागणी अडगळीत पडली गेली. विकासाच्या दृष्टीने छोटी राज्ये निर्माण करण्यासाठी अधून मधून विविध गटाकडून मागणी करण्यात येत असते,पण वेळोवेळी या मागण्या केंद्र सरकार धुडकावत आले आहे.स्वतंत्र विदर्भासंदर्भात सहमती होत नसल्याचे कारण सांगत गृहमंत्रालयाने ही मागणी धुडकावून लावली आहे. गेल्या ७५ वर्षात विविध राज्यातील विषमता व विकासाच्या बाबतीत असलेला असमतोलपणा लक्षात घेता,छोटी राज्ये निर्माण करणे गरजेचे आहे.विषमता व असमतोलपणा,कायम राहिल्यास संघराज्याच्या अखंडता व ऐक्यास घातक ठरू शकते.राज्यनिर्मितीच्या वेळेस राज्य…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शिंदे यांचा आजार संपला ; त्यांचे हेलिकॉप्टर दरे गावातून थेट मुंबईच्या दिशेने रवाना झाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अचानकपणे उद्भवलेला आजार,आज अचानक तो बरा झाला व ते हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले.त्यांच्या या आजाराने मुंबईतील वैद्यकीय व्यवस्थेवर आता प्रश्न उपस्थित झाला आहे.ज्या आजारावर केवळ दरे गावातच उपचार होऊ शकतो,असा कोणता आजार त्यांना जडला होता,हे फक्त त्या ईश्वरालाच माहित असले पाहिजे. पण झाले ते एकप्रकारे चांगलेच झाले,असे म्हणावे लागेल.आम्हा महाराष्ट्राच्या जनतेचा जीव अक्षरशः भांड्यात पडला.असो,पण आज अचानक त्यांना घाईघाईने मुंबई का गाठावी लागली,हे कोडे मात्र अद्याप सुटू शकलेले नाही.खरं सांगायचं झाल्यास,शिंदे यांना राजकीय सर्दी झाली होती.या राजकीय आजारामुळे…
