मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला पालघर जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा,
आज पंचायत समिती पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर,रविंद्र शिंदे यांनी गट विकास अधिकारी,विस्तार अधिकारी (पंचायत),विस्तार अधिकारी (सांख्यिकी),सर्व विभागप्रमुख,उपअभियंता, शाखा अभियंता,सहाय्यक प्रशासन अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांची समन्वय आढावा सभा घेऊन विकासकामांचा आढावा घेतला.
यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी,ग्रामपंचायत,चंद्रशेखर जगताप,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,पाणी व स्वच्छता विभाग अतुल पारसकर,बापूराव नाळे,प्रभारी गट विकास अधिकारी,पंचायत समिती पालघर तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचा आढावा घेताना
सन २०१६-१७ ते २०२३-२४ पर्यंत दरम्यान प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत घरकुल योजनांची अपूर्ण घरकुले माहे जानेवारी २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबत सुचना दिल्या.लाभार्थी घरकुले बांधून पूर्ण करत नसतील तर सदर घरकुलांना वाटप केलेले अनुदान शासन खाती भरणा करुन सदरची घरकुले रद्द करणत यावी.तसेच सन २०२४-२५ वर्षातील सर्व योजनांची घरकुले मार्च २०२५ अखेर पर्यंत पूर्ण करण्याची कार्यवाही करावी,अशा सूचना रविंद्र शिंदे यांनी दिल्या.
शासकीय जमीनीवरील घरकुलांबाबत शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करुन प्रलंबित घरकुले पूर्ण करण्यात यावीत,असेही यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले.
माझी वसुंधरा अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.
ग्रामपंचायत विभागामधील जनसुविधा व नागरी सुविधा योजनेंतर्गत सन २०२३-२४ वर्षातील अपूर्ण कामे १५ जाने.२०२५ पर्यंत तर मंजूर कामे मार्च २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्यांत यावीत, २०२५-२६ चे आराखडे सादर करताना शासन निर्णयाप्रमाणे कामे घेण्यांत यावीत,तसेच ग्रामपंचायतीकडे असलेली शिल्लक रक्कम इतकीच कामे प्रस्तावित करण्याची दक्षता घेण्यात यावी.शासन निर्णयाप्रमाणे ग्रामसभा घेण्याची दक्षता घेण्यात याव्यात.१५ वा वित्त आयोगांतर्गत बंधित व अबंधित सन २०२०-२१ ते २०२३-२४ पर्यंतची सर्व कामे पूर्ण करण्याची कार्यवाही करावी.
१५ वा वित्त आयोगांतर्गत कामांवरील शासकीय वजातींचा भरणा संबंधित खात्यांवर करण्याची दक्षता घेण्यांत यावी, ग्रामपंचायतीमधील सर्व घरपट्टी धारकांना घरपट्टी आकारणी देयकांची बजावणी लवकरात लवकर पूर्ण करुन तसा अहवाल जिल्हा कार्यालयास सादर करावा,ग्रामपंचायतीची कर वसुली १००% पूर्ण करण्याची कार्यवाही अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
सर्व ग्रामपंचायतींनी शासनाने नेमलेल्या निविदाकाराकडून कचराकुंड्या,ई-व्हेईकल खरेदी करणेबाबत कार्यवाही करणे,वैयक्तिक व सार्वजनिक शौचालये पूर्ण करणे,
सार्वजनिक शौचालयांतर्गत नवीन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पाणी व स्वच्छता विभागाचा आढावा घेते वेळी देण्यात आले.
मुख्य कार्यकारी अधिकारी, यांनी यावेळी सर्व योजनांची कामे मार्च २०२५ अखेर पूर्ण करुन १००% खर्च नोंदवण्या बाबत सूचना दिल्या.सर्व विभागांचा सविस्तर आढावा यावेळी घेण्यात आला.
बी.के.शिंदे उपअभियंता पाणीपुरवठा,
संजय वाघ गटशिक्षणाधिकारी प्रभारी,
विनोद पाटील विस्तार अधिकारी ग्रामपंचायत,
राजू रामदास कोळी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत,
रवींद्र सिंग पाटील विस्तार अधिकारी ग्रामपंचायत,
स्मिता पाटील कृषी अधिकारी तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

