संजय नेवे
विक्रमगड
बांगला देशाच्या निषेधार्थ विक्रमगड येथे मुक मोर्चाचे आयोजन,
बांगला देशात हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद आता देशभरात उमटू लागले आहेत.अनेक हिंदुत्ववादी संघटना व सामाजिक संस्था या अत्याचाराविरोधात निषेध व्यक्त करत आहेत.
पालघर जिल्ह्यातील
सकल हिंदू समाज या मराठा संघटनांनी याविषयी एल्गार पुकारला आहे.गेल्या दोन दिवसात नालासोपारा व आज वाडा / विक्रमगड शाखेने मोर्चाचे आयोजन केले होते. आज विक्रमगड येथे या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला होता
बांगलादेशामध्ये अल्पसंख्यांक हिंदूंना त्रास दिला जातो,त्यांच्यावर हल्ले होत आहेत,त्या निषेधार्थ विक्रमगड सकल हिंदू समाजाच्यावतीने शहरातील विठ्ठल मंदिर येथून मुक मोर्चा निघून विक्रमगड तहसीलदार कार्यालय विकमगड आला. यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने तहसीलदार चारुशीला पवार यांना निवेदन देण्यात आले.या मुक मोर्चामध्ये विक्रमगडवासिय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

