पंकज चव्हाण,विरार,
१२ व्या मॅरेथॉन धमाल धाव मध्ये उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालयाला दुसरा क्रमांक,
न्याय हा मानवी समाज जीवनाचा आणि समाज सुरळीत कार्यरत राहील, यासाठी आवश्यक असणारा घटक आहे.जेव्हापासून मनुष्य समाज म्हणून एकमेकांसोबत राहू लागला आणि समाज व्यवस्था अस्तित्वात आली.तेव्हापासून न्यायाचा मुद्दा वेळोवेळी अधोरेखित केला गेला.अर्थात कालानुरुप न्यायदानाची प्रक्रिया आणि पद्धतही बदलत गेली. कोणत्याही प्रांतामध्ये प्रशासनाचा वचक ठेवण्यासाठी न्याय हा फार महत्वाचा घटक असतो.
हीच न्यायदेवता आणि विविध क्षेत्रात महिलांवर होणारे अत्याचार आणि आजची स्त्री सुरक्षित आहे का ? यावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने नुकताच विरार येथे नुकत्याच पार पडलेल्या १२ व्या वसई राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये
मुंबईच्या महाविद्यालयाच्या गर्दीत कायम आपले वेगळेपण जपत मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या विरार पश्चिमेच्या विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल संचालित कै.पांडुरंग रघुनाथ पाटील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालय सहभागी झाली होती.महाविद्यालयाच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विभागाच्या शिक्षिका प्रियांका नायर,प्रतीक्षा राऊत,रिद्धीमा जाधव,मनिता यादव,हितीक्षा राऊत यांनी विविध क्षेत्रांतील महिलांवर होणारे अत्याचार ह्यावर प्रकाश टाकत त्या संदर्भातील कायद्यांबद्दल यावेळी जनजागृती केली.त्यासाठी त्यांना द्वितीय पारितोषिक मिळाले.
विविध क्षेत्रातील मग ती सामान्य गृहिणी,डॉक्टर, कॉर्पोरेट क्षेत्रातील महिला
किंवा अगदी शालेय विद्यार्थिनी असो त्यांच्यावर होणारे अन्याय,अत्याचार अधोरेखित करत त्या न्यायदेवतेकडे न्याय मागत आहेत,असे दाखवत
स्त्रीला सन्मान द्या,घर सुखकर करा,हिंसा थांबवा,हक्क जपा,रक्षक बना,भक्षक नको, तिच्या कर्तुत्वाला ओळखा,होणारे छळ थांबवा,निरागसतेचा अपमान थांबवा,आवाज उठवा,अशा घोषणा देत मॅरेथॉन दरम्यान जनजागृती केली.
धमाल धाव मधील द्वितीय पारितोषिक विजेते शिक्षकांचे संस्थेच्या सचिव अपर्णा ठाकूर मॅडम,संस्थेचे सर्व पदाधिकारी,मुख्याध्यापिका मुग्धा लेले,उपमुख्याध्यापक सुभाष शिंदे,मार्गदर्शिका कल्पना राऊत यांनी सहभागी सर्व स्पर्धकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

