नवीन पाटील,सफाळे,
सफाळे येथे तरुणाने इअरफोनमुळे गमावला जीव,
पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकात रेल्वे अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकताच घडली.कानात इअरफोन घातल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या राजधानी एक्स्प्रेस गाडीचा हॉर्न ऐकू आला नाही आणि त्या तरुणाचा गाडी खाली येऊन मृत्यू झाला.
नितेश चौरसिया,असे या तरुणाचे नाव आहे.याबाबत सफाळे रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मुंबईहून सफाळे येथे नेहमीप्रमाणे ओमटेक्स येथे क्रिकेटच्या सरावासाठी येत असताना रेल्वे रूळ ओलांडताना ही घटना घडली. सफाळे स्थानकात लोकलमधून उतरून तो मैदानाकडे चालला होता.मात्र, कानात इअरफोन असल्याने रेल्वे रूळ ओलांडताना त्याला गाडीचा,तसेच लोकांच्या आरडाओरड्याचा आवाज ऐकू आला नाही.तो मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेस खाली आला व जागीच मृत्यू जागीच ठार झाला.यावेळी आजूबाजूच्या प्रवाशांनीही आरडाओरड केली होती.मात्र कानाला इअरफोन असल्यामुळे त्याला त्यांचा आवाज ऐकू आला नाही व त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

