संजय लांडगे, वाडा शहर,
हिंदुवरील अत्याचाराच्या विरोधात वाड्यात निषेध मोर्चा,
बांगलादेशात अराजकता माजल्यानंतर हिंदू समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत आहेत.अनेक मंदिरांची नासधूस करण्यात येत आहे.हे सर्व तातडीने थांबावे व
इस्कॉनच्या साधूंची तत्काळ सुटका व्हावी,या मागणीसाठी वाड्यात सकल हिंदू समाजातर्फे आज निषेध मोर्चा काढण्यात आला.
सर्व सकल हिंदू समाज मिळून बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजावरील अत्याचाराचा तीव्र निषेध व्यक्त करतो व आपणास आवाहन करतो की,युनो आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी याची दखल घ्यावी व बांगलादेश मधील कट्टरतइस्लामी मानव विरोधी सरकार व आतंकवादी यांचेविरुद्ध कठोर पावले उचलावी,तसेच इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता करावी.बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्यांक समाजास कायमस्वरूपी सुरक्षितता मिळण्यासाठी सर्व आवश्यक उपाय योजावेत,अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांना देण्यात आले.
त्यासाठी वाडा येथील खंडेश्वरी नाका येथून मुख्य बजार पेठ,परळी नाका,भाजी मार्केटमार्गे मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आलं होता.या मोर्चात सकल हिंदू समाजाचे बंधू, भगिनींनी मोठ्या संख्येने सहभगी झाले होते.

