- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
सुरेश काटे,तलासरी, झरी शाळेच्या विज्ञान प्रकल्पाची जिल्हास्तरावर निवड, तलासरी तालुका विज्ञान प्रदर्शन आयोजन शिक्षण विभाग तलासरी,तालुका विज्ञान मंडळ व ज्ञानमाता आदिवासी हायस्कूल उपलाट यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा झरीने सुयश संपादन केले.इ.8 वी च्या विद्यार्थ्यांनी निर्जला उंबरसाडा व अंकीता शनवार यांचा ” वाहनातुन बाहेर पडणाऱ्या कार्बन कणांपासून प्रिंटर शाई तयार करणे,”या प्रकल्पाची जिल्हास्तरावर निवड झाली. त्यांच्या या प्रयोगाला विज्ञान शिक्षक हेमंत अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.तर गणित विषयाच्या प्राध्यापिका हेमाली भंडारी यांचे ” कोनीक सेक्शन,”या शैक्षणिक साधनाची जिल्हा स्तरावर निवड झाली. संस्थाचालक,शिक्षण विभाग यांच्यातर्फे सदर शाळेचे सर्वत्र कौतुक…
सुरेश काटे,तलासरी, २४ डिसें.रोजी पेसा ग्रामपंचायतींमध्ये साजरा होणार ‘पेसा दिन’ केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने २४ डिसें.हा दिवस ‘ पेसा दिन,’ म्हणून साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.त्यानुसार जिल्ह्यातील पेसा ग्रामपंचायतींमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून पेसा दिन साजरा करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी दिले आहेत. पेसा कायद्याच्या निर्मितीला २४ डिसे.रोजी २८ वर्षे पूर्ण होत असल्याने पंचायती राज मंत्रालयाने हा दिवस ‘पेसा दिन,’ म्हणून साजरा करणेबाबत निर्देशित केले आहे.पेसा दिनाच्या निमित्ताने ग्रामसभा सदस्य,पंचायत सदस्य, तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची क्षमताबांधणी व्हावी व त्यांच्यामध्ये जनजागृती वाढावी,तसेच त्यांचा या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये सहभाग वाढावा,यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्याचे निर्देश…
दीपक मोहिते, ” भयावह वास्तव,” नंदुरबार येथे कुपोषणामुळे ३८९ आदिवासी बालके कुपोषणामुळे मृत्युमुखी, राज्यातील नंदुरबार,नाशिक,पालघर, अमरावती व गडचिरोली हे पाच जिल्हे आदीवासीबहुल जिल्हे म्हणून ओळखले जातात.मूलनिवासी अशी ओळख असलेल्या या समाजातील बालकांना कुपोषणाचा शाप पाचवीला पुजला आहे.गेल्या सहा महिन्यात नंदुरबार जिल्ह्यात सुमारे ३८९ बालके मृत्युमुखी पडल्याचे धक्कादायक वृत्त प्रसिद्ध झाले आहे.गेल्या सात दशकात समाजाला लागलेला हा शाप नाहीसा, करण्यासाठी सरकारने आजवर हजारो कोटी रु.खर्च केले,पण कुपोषण आजही ” जैसे थे,” स्थितीतच आहे. कुपोषणाचे मूळ,हे या समाजाच्या अज्ञानात दडलं आहे,कमी वयात मुलींची लग्ने करणे,गरोदरपणात काळजी न घेणे व अन्य कारणे आहेत.पण समाज आपली संस्कृती व चालीरीती,याविषयी अत्यंत संवेदनशील असल्यामुळे समाजात याविषयी…
राजू सानप,घोलवाड तलासरी येथे महिला सक्षमीकरणाचा उत्साहवर्धक उपक्रम, आज तलासरी प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी उज्वला नांगरे यांच्या पुढाकाराने गिरगाव कडूपाडा येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. महिलांच्या सक्षमीकरणाला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कलागुणांना वाव देणे,असा उद्देश राखून हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. पंचायत समिती सदस्या जयवंती घोरखना,सरपंच लक्ष्मण घोरखना, ग्रामपंचायत सदस्या ललिता संदीप दुमाडा,चंचला किसन आडगा यावेळी उपस्थित होते. यशराज फाउंडेशनचे संतोष शिवाजी काढोळे आणि प्रथम संस्थेच्या कल्पना उराडे यांनी महिलांना स्वावलंबन, पोषण,आरोग्य,आणि शिक्षण इ. महत्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले.महिलांनी या मार्गदर्शनाचा उपयोग त्यांच्या दैनंदिन जीवनात करावा,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे आकर्षण: कार्यक्रमामध्ये महिलांसाठी मनोरंजनात्मक उपक्रम आयोजित करण्यात आले…
संदीप जाधव,बोईसर, चिल्हार फाट्यावर ट्रेलर बंद पडल्यामुळे वाहतुक ठप्प, मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून तारापूर एमआयडीसीकडे येणाऱ्या बोईसर-चिल्हार रस्त्यावर चिल्हार फाट्याजवळ ट्रेलर बंद पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली.अनेक वाहने अडकून पडली.हा ट्रेलर रस्त्याच्या मध्यभागी बंद पडल्यामुळे वाहनचालकांना रस्ता ओलांडताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहनचालक आणि स्थानिकांनी बंद पडलेले ट्रेलर तातडीने हटवून वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्याची मागणी केली आहे.या घटनेने रस्ता अरुंद झाल्यामुळे मोठ्या वाहनांना आणि मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांना पर्याय उपलब्ध नाही. बोईसर-चिल्हार हा तारापूर एमआयडीसीकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे.या मार्गावर अशी अडचण निर्माण झाल्यास कामगार आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना उशीर होतो,ज्याचा थेट परिणाम औद्योगिक कामकाजावर होत असतो. वाहतूक विभागाने या समस्येवर तातडीने…
अनिल वैद्य,नाशिक, नाशिक येथे पोलीस उपनिरीक्षकांच्या 124 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न, महाराष्ट्र पोलीस अकादमी पोलीस उपनिरीक्षकांच्या 124 व्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारंभ नुकताच नाशिक येथे पार पडला,. अनाथ तरुण-तरुणींना शासकीय सेवेत एक टक्का आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयानुसार पाच अनाथ तरुणांना पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्त्या देण्यात आल्या. पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या 124 व्या तुकडीचे दीक्षांत संचलन समारंभ नाशिक जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराव जग्गू मुलानी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस प्रबोधिनी मैदानावर संपन्न झाला.यावेळी पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार हे उपस्थित होते.124 व्या तुकडीच्या दीक्षांत संचालन समारंभामध्ये देण्यात आलेल्या नियुक्त्यामध्ये तीन तरुण आणि दोन तरुणींचा…
संदीप जाधव,बोईसर, अनधिकृत दगड वाहतुकीचा प्रश्न गंभीर,गावगुंडाचा हैदोस, कडक कारवाईची मागणी, बोईसर पूर्व भागातील अनधिकृत दगड वाहतुकीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे.या बेकायदेशीर कारवायांना आळा घालण्यासाठी मौजे गुंदले सजाचे तलाठी हितेश राऊत यांनी पाऊल उचलले असताना कारवाई दरम्यान एका ट्रक मालकाने धक्काबुक्की केली. काल तलाठी राऊत यांनी अनधिकृत दगड वाहतुकीवर कारवाई करत तीन ट्रक थांबवले.त्यावेळी ट्रक मालक धीरज सुधीर भंडारी याने त्यांना धक्काबुक्की केली आणि कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला.या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता व परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तत्काळ पोलीस बोलावण्यात आले,ज्यांच्या मदतीने ट्रक ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (…
संदीप जाधव,बोईसर, संदीप जाधव,बोईसर, येत्या २४ तारखेला जीवनप्रवासाचा अमृतमहोत्सव गौरव सोहळा, धुकटण गावातील ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्तिमत्त्व कमळाकर गोविंद पाटील यांच्या वयाला येत्या २४ डिसें.रोजी पंच्याहत्तर वर्षे होत आहेत.त्या निमित्ताने अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी त्या दिवशी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचे सुपुत्र चेतन कमळाकर पाटील यांनी,आपल्या वडिलांचा हा सोहळा अविस्मरणीय बनवण्यासाठी नियोजन केले आहे. कमळाकर गोविंद पाटील हे गावातील एक आदर्श नागरिक, कुटुंबप्रमुख आणि समाजासाठी प्रेरणास्थान आहेत.त्यांच्या जीवनातील अनेक संघर्षमय क्षण आणि त्यांच्या कार्याचा मागोवा घेतला,तर त्यांच्यातील कर्तृत्वाची एक वेगळीच छटा पहायला मिळते.त्यांच्या कष्टप्रद जीवनप्रवासाने समाजाला नेहमीच प्रेरणा दिली आहे. या विशेष सोहळ्याचे आयोजन करताना चेतन पाटील यांनी…
दिपक मोहिते, ” न्यूजलाईन,” शिवसेनेकडून ( उबठा ) वेगळी चूल मांडण्याचे संकेत, विधानसभा निवडणुकीतील अपयशानंतर महाविकास आघाडीच्या विघटनाला आता चांगलाच वेग आला आहे.आपला पराभव हा हिंदुत्वाला सोडचिठ्ठी देत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) या धर्मनिरपेक्ष पक्षाशी साथसंगत केल्यामुळे झाल्याचा साक्षात्कार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला झाला आहे.त्यामुळे त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये वेगळी चूल मांडण्याची तयारी चालवली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव,हा उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागला असून ते आता ” एकला चलो रे,” च्या भूमिकेत आले आहेत.दोन दिवसांपूर्वी त्यांनी ” काँग्रेस पक्षाने वीर सावरकर यांची निंदानालस्ती करणे,थांबवावे असे वक्तव्य केले.त्यांचे हे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शिंदे व पवार यांची सध्याची अवस्था,” सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही,” भाजपने जागा,मंत्रीपदे व खातेवाटप,यावरून शिंदे गटाला नामोहरम केल्यानंतर आता अजित पवार गटाची शिकार करण्याची तयारी चालवली आहे.अजित पवार गटाला यावेळी पुणे व रायगड या दोन जिल्ह्याची पालकमंत्रीपदे मिळण्याची शक्यता फार कमी आहे. वर्षभरापूर्वी अजित पवार गटाला सोबत घेताना भाजपने पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पालकमंत्रीपद काढून घेण्यात आले होते व ते अजित पवारांकडे सोपवले होते.पण यावेळी भाजप अजित पवारांच्या तोंडाला पाने पुसण्याच्या तयारीत आहे.खातेवाटपात अजित पवार यांना अर्थखाते मिळण्याचीही शक्यता नाही.पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे भाजप त्यांची कोंडी करण्यासाठी सध्या चाल खेळत आहेत.माजी मुख्यमंत्री एकनाथ…
