अनिल वैद्य,नाशिक,
नाशिक येथे पोलीस उपनिरीक्षकांच्या 124 व्या तुकडीचा दीक्षांत समारंभ संपन्न,
महाराष्ट्र पोलीस अकादमी पोलीस उपनिरीक्षकांच्या 124 व्या तुकडीचा दीक्षांत संचालन समारंभ नुकताच नाशिक येथे पार पडला,.
अनाथ तरुण-तरुणींना शासकीय सेवेत एक टक्का आरक्षण देण्याच्या सरकारच्या निर्णयानुसार पाच अनाथ तरुणांना पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्त्या देण्यात आल्या.
पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या 124 व्या तुकडीचे दीक्षांत संचलन समारंभ नाशिक जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद दौलतराव जग्गू मुलानी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पोलीस प्रबोधिनी मैदानावर संपन्न झाला.यावेळी पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार हे उपस्थित होते.124 व्या तुकडीच्या दीक्षांत संचालन समारंभामध्ये देण्यात आलेल्या नियुक्त्यामध्ये तीन तरुण आणि दोन तरुणींचा समावेश आहे.पोलीस प्रबोधिनीमध्ये पोलीस दलामध्ये पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झालेल्या प्रशिक्षणार्थींना विविध पातळीवर बारा महिने प्रशिक्षण देण्यात येते.यंदाच्या 124 व्या तुकडीमध्ये 620 प्रशिक्षणार्थीमध्ये 210 महिला प्रशिक्षणार्थीचा समावेश आहे. शासन निर्णयानुसार मिळालेल्या आरक्षणाच्या आधारे पाच अनाथ तरुण-तरुणी पोलीस दलात प्रथम समावेश होत असल्याच्या या कार्यक्रमामध्ये फाउंडेशनचे पदाधिकारी आणि या तरुण-तरुणींचे दत्तक पालक असलेले आ. श्रीकांत भारतीय आणि श्रेया भारतीय हे या समारंभाला प्रामुख्याने उपस्थित होते. पोलीस बँडच्या तालावर शानदार संचालन करत प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी समारंभाचे प्रमुख पाहुणे मुख्य जिल्हा सत्र न्यायाधीश दीपचंद चकलानी यांना मानवंदना दिली.या कार्यक्रमांमध्ये पोलीस प्रबोधिनीच्या कार्याचा आढावा घेताना संचालक राजेश कुमार यांनी प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणाचा आणि त्यातील विधीशास्त्र गुन्हेगारी शास्त्र न्यायवैद्यक आर्थिक गुन्हे कायद्याचा प्रत्यक्ष वापर करणे, गोळीबार सराव,टीमवर्क, शारीरिक स्वास्थ्य, दहशतवादाची मुकाबला, आदी प्रशिक्षणाचा आढावा घेतला.दीक्षांत संचलन कार्यक्रमांमध्ये विविध विषयावर प्राविण्य मिळवणाऱ्या प्रशिक्षणार्थ त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या असते पारितोषिक देण्यात आली.त्यामध्ये अत्यंत मानाचा समजला जाणारा” ” रिवाल्वर ऑफ ऑनर, ” हा सर्वोच्च पुरस्कार महिला प्रशिक्षणार्थी कोल्हापूर जिल्ह्यातील नेहा दिलीप कोंडेकर हीला देण्यात आला.या पुरस्कारासह नेहा कोंडेकर हिने सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थीचा अहिल्यादेवी होळकर चषक बेस्ट कॅडेट स्टडी साठी प्रथम पुरस्कार आदी पुरस्कारही पटकावले. याव्यतिरिक्त सागर तुळशीराम लगड यांना तसेच
बेस्ट कॅडेट ड्रिल बेस्ट इन रायफल रिवर बेस्ट कॅडेट आउटडोर हा पुरस्कार श्री अभय अशोक तेली यांना या अनाथ आश्रमात राहून शिकलेल्या प्रशिक्षणार्थीने पटकावला तर बेस्ट कॅडेट इन लॉ हा पुरस्कार अक्षय रतन झगडे यांना मिळाला. कार्यक्रमांमध्ये प्रशिक्षणातील उपनिरीक्षकांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे जिल्हा सत्र न्यायाधीश जगमलांनी यांनी म्हणाले,रोज नवीन तंत्रज्ञानाचा उदय होत असून पोलिसांची भूमिका आव्हानात्मक आहे.पोलीस अधिकाऱ्यांची ही पहिली तुकडी आहे,ज्यांना नवीन फौजदारी कायद्याचे प्रशिक्षण मिळाले आहे.प्रशिक्षण हे आचार विचारात अचूकपणा आणण्यासाठी व विवेक प्रदान करण्यासाठी असते.त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांनी कायद्याचे पालन करण्यासाठी करावे.दीक्षांत संचलनानंतर प्रशिक्षणार्थी पुरुष व महिला अधिकाऱ्यांनी मल्लखांब प्रात्यक्षिके सादर केली.

