संदीप जाधव,बोईसर,
चिल्हार फाट्यावर ट्रेलर बंद पडल्यामुळे वाहतुक ठप्प,
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून तारापूर एमआयडीसीकडे येणाऱ्या बोईसर-चिल्हार रस्त्यावर चिल्हार फाट्याजवळ ट्रेलर बंद पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली.अनेक वाहने अडकून पडली.हा ट्रेलर रस्त्याच्या मध्यभागी बंद पडल्यामुळे वाहनचालकांना रस्ता ओलांडताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
वाहनचालक आणि स्थानिकांनी बंद पडलेले ट्रेलर तातडीने हटवून वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्याची मागणी केली आहे.या घटनेने रस्ता अरुंद झाल्यामुळे मोठ्या वाहनांना आणि मालवाहतूक करणाऱ्या गाड्यांना पर्याय उपलब्ध नाही.
बोईसर-चिल्हार हा तारापूर एमआयडीसीकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग आहे.या मार्गावर अशी अडचण निर्माण झाल्यास कामगार आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना उशीर होतो,ज्याचा थेट परिणाम औद्योगिक कामकाजावर होत असतो.
वाहतूक विभागाने या समस्येवर तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

