सुरेश काटे,तलासरी,
झरी शाळेच्या विज्ञान प्रकल्पाची जिल्हास्तरावर निवड,
तलासरी तालुका विज्ञान प्रदर्शन आयोजन शिक्षण विभाग तलासरी,तालुका विज्ञान मंडळ व ज्ञानमाता आदिवासी हायस्कूल उपलाट यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
त्यामध्ये ज्ञानमाता आदिवासी माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा झरीने सुयश संपादन केले.इ.8 वी च्या विद्यार्थ्यांनी निर्जला उंबरसाडा व अंकीता शनवार यांचा ” वाहनातुन बाहेर पडणाऱ्या कार्बन कणांपासून प्रिंटर शाई तयार करणे,”या प्रकल्पाची जिल्हास्तरावर निवड झाली. त्यांच्या या प्रयोगाला विज्ञान शिक्षक हेमंत अधिकारी यांनी मार्गदर्शन केले.तर गणित विषयाच्या प्राध्यापिका हेमाली भंडारी यांचे ” कोनीक सेक्शन,”या शैक्षणिक साधनाची जिल्हा स्तरावर निवड झाली. संस्थाचालक,शिक्षण विभाग यांच्यातर्फे सदर शाळेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

