Author: दीपक मोहिते

अनिकेत मेहेर,डहाणू महालक्ष्मी गडावर दरड कोसळली,चार दुकाने पडली दरीत… डहाणू तालुक्यातील प्रसिद्ध महालक्ष्मी गडावर झालेल्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळून सात दुकानांपैकी चार दुकाने दरीत कोसळली. तर इतर दुकानावर दगडी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. महालक्ष्मी गडाच्या मंदिर परिसरातील दुकानांवर दरड कोसळली असून दरडी सह चार दुकाने दरीत पडून जमीनदोस्त झाली आहेत. तसेच या घटनेमुळे मंदिरात जाणार अरुंद रस्त्यावर परिणाम झाला आहे.सुदैवाने पावसामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांची वर्दळ कमी होती. त्या मुळे मोठी जीवितहानी टळली आहे.महालक्ष्मी सुळक्यावरून छोट्या मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याचे प्रकार काही वर्षांपासून सुरू असून २०२२ साली गडावर अशाप्रकारे मोठी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मुंबईतील मराठी माणूस ; शरद पवारांचे पुतना मावशीचे प्रेम… राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरद पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी काल एक महत्वाचे वक्तव्य केले.त्यांचे हे वक्तव्य महत्वपूर्ण असले तरी त्यांनी त्यांच्या या वक्तव्याचे आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.त्यांनी केलेल्या वक्तव्यावर एक नजर टाकली असता,पवार यांना ही उपरती आताच का व्हावी,असा प्रश्न मराठी माणसासमोर उभा ठाकतो. काल ते म्हणाले,” मुंबईतील ४० – ५० मजली इमारतीमध्ये मराठी माणूस कुठेच दिसत नाही,” खरं आहे ते आणि त्यांच्या म्हणण्यात तथ्यही आहे.पण त्याला कोण जबाबदार आहे,हे मात्र त्यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले नाही.यालाच आपण सोयीचे राजकारण असे म्हणतो.अशाप्रकारचे राजकारण करण्यात शरद पवार यांचा…

Read More

दीपक मोहिते, कायद्याचे रक्षक जेव्हा भक्षक होतात तेंव्हा… पोलीस यंत्रणा दिवसेंदिवस मुर्दाड बनत चालली आहे… स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी जालना येथे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांनी ताब्यात घेतलेल्या एका आंदोलकास धावत जाऊन लाथ घातल्याची चित्रफीत समाजमाध्यमावर व्हायरल झाली.त्यानंतर राज्यात सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.नव्याने अंमलात येणाऱ्या जनसुरक्षा कायद्याची ही पहिली झलक असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. उपअधीक्षक कुलकर्णी याने ज्या आंदोलनकर्त्याच्या कंबरेत पाठीमागून धावत येऊन लाथ घातली,त्या इसमाचे गोपाल चौधरी असे नाव असून कौटुंबिक प्रकरणात न्यायासाठी त्याचे जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू होते.आपल्याला न्याय मिळत नसल्याच्या कारणावरून स्वातंत्र्यदिनी आपण जिल्हाधिकारी न्यायालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देणारे पत्र त्यांनी…

Read More

दीपक मोहिते, मुसळधार पावसामुळे वसई/विरार परिसर जलमय, कालपासून वसई – विरार भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील तीन शहरे व अनेक गावे जलमय झाली आहेत.अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे आज दिवसभर वाहने जपून चालवावी लागत होती. काल रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे वसई तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.मात्र आजच्या पावसाने गोविंदाचा आनंद मात्र द्विगुणित झाला होता.विरार पश्चिम,नालासोपारा पूर्व व वसई याभागात गुडघाभर पाणी साचले होते.त्यामुळे वाहने संथगतीने येजा करत होती.दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने पालघर जिल्ह्यात १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी होईल,असा इशारा दिला होता.त्यानुसार काल रात्री व आज दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली.पावसासोबत ढगांचा गडगडाट व सोसाट्याचा…

Read More

अनिल पाटील,बोईसर प्लास्टिकमुक्त व हिरवेगार पालघर जिल्हा करणार – पालकमंत्री नाईक दुर्गंधी व प्लास्टिक मुक्त पालघर जिल्हा करण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे आवश्यक आहे.त्यासाठी २५० कोटी झाडे लावण्याचा संकल्प शासनाचा असून या माध्यमातून हिरवागार पालघर जिल्हा पाहायला मिळेल,असे प्रतिपादन वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालघर येथे केले. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र दुर्वेश येथील मुख्य इमारत व कर्मचारी निवासस्थानाच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न झाले. या प्रसंगी खा.डॉ.हेमंत सवरा,आ.राजेंद्र गावित, आ.विलास तरे,जिल्हाधिकारी डॉ.इंदुराणी जाखड,जिल्हा परिषद,मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख,दुर्वेश ग्रामपंचायतीचे सरपंच आकाश कडव,जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी,गटविकास…

Read More

सुरेश काटे,तलासरी तलासरीत दहीहंडी उत्सव उत्सहात साजरा, तलासरीत आज दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.तलासरीतील वनवासी कल्याण आश्रमच्या मुलीं,मुलांचे तसेच वसतिगृह मुलांचे गोविंदा पथक यांनी गावात नागरिकांनी तसेच राजकारण्यांनी बांधलेल्या दहीहंड्या फोडल्या.यावेळी डहाणू विधानसभा मतदार संघांचे आ.विनोद निकोले, माजी आ.श्रीनिवास वनगा, , पंचायत समिती माजी उप सभापती नंदकुमार हडळ, तलासरी नगर पंचायतीचे नगराध्यक्ष सुरेश भोये, उप नगराध्यक्ष सुभाष दुमाडा, तलासरी तहसीलदार अमोल पाठक,पोलीस निरीक्षक अजय गोरड तसेच नगर सेवक,पंचायत समिती,जिल्हा परिषद सदस्य यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. तलासरी नाक्यावर माकपाच्या स्टुडन्ट फेडारेशनच्या दहीहंडी उत्सवात सर्व सहभागी गोविंदा पथकांना पारितोषिके तसेच आ.विनोद निकोले यांनी प्रत्येकी पाच हजाराचे प्रोत्साहन पारितोषिके,तसेच शिवसेना…

Read More

सचिन जोशी,वसई वसई विरार शहरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा, आज वसई विरार शहर महानगरपालिका मुख्यालय तसेच सर्व प्रभाग समिती कार्यालये येथे “ स्वातंत्र्य दिन,” मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. महानगरपालिका मुख्यालयात आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. उपस्थितांतर्फे राष्ट्रध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत,ध्वजगीत व राज्यगीत म्हणण्यात आले.ध्वजारोहण कार्यक्रमानंतर संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून तसेच दीपप्रज्वलन करून वंदन करण्यात आले. महानगरपालिका मुख्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमास आ.राजन नाईक,माजी आ.हितेंद्र ठाकूर,माजी आ.क्षितीज ठाकूर,माजी महापौर राजीव पाटील, अतिरिक्त आयुक्त दिपक सावंत,उपायुक्त तसेच माजी सभापती,माजी नगरसेवक, माजी नगरसेविका,विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पोलीस विभागातील कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी,पत्रकार,नागरिक व इतर…

Read More

सचिन पाटील,विरार वसई विरार शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरु, अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासावर उपाययोजना करण्यासाठी वसई विरार शहर महापालिका प्रशासनाकडून युद्धपातळीवर पावले उचलण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरू झाले आहे. वसई विरार शहरात खड्डे बुजवण्याचे काम प्राधान्याने सुरू करण्यात आले असून या आठवड्यात आतापर्यंत ८५४ खड्डे खडीकरण डांबरीकरणाने बुजवण्यात आले आहेत.वसई विरार शहर महानगरपालिकेतर्फे खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू असून खड्डेमुक्त प्रवासाचा चांगला अनुभव देण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने कार्यरत आहेत.नागरिकांनी महानगरपालिकेला सहकार्य करावे,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Read More

सुरेश वैद्य,पालघर जव्हार येथे २० ऑगस्ट रोजी जनता दरबाराचे आयोजन, वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली २0 ऑगस्ट रोजी सकाळी ११. ०० वाजता जव्हार येथील शासकीय विश्राम गृह समोर असलेल्या रेड सॉईल रिसॉर्ट येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.या जनता दरबारामध्ये नागरिकाच्या समस्या व अडचणी जाणून घेण्यासाठी पालकमंत्री गणेश नाईक नागरिकाशी थेट संवाद साधणार आहेत. नागरिकांनी आपल्या समस्या व प्रश्नाचे निराकरण करुन घेण्यासाठी जव्हार येथे २० ऑगस्ट रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ इंदु राणी जाखड यांनी केले आहे. या जनता दरबारामध्ये नागरिकांच्या तक्रारी अर्जाचे निवारण करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख उपस्थित राहणार आहेत.यापूर्वी…

Read More

वसंत भोईर,वाडा वाडा तालुक्याच्या दहीहंडी उत्सवात मराठीचाच जागर… मराठी हिंदी भाषा वाद सुरू असून मनसे व शिवसेनेने हा मुद्दा महत्वाचा केला असतानाच आज झालेल्या दहीहंडी उत्सवावातही मराठीचा जागर पहावयास मिळाला.आम्ही नारेकर गोविंदा पथकाने ” महाराष्ट्रात फक्त मराठी “असे फलक झळकावून मराठीचा जागर केल्याचे पहावयास मिळाले. दही हंडी उत्सव आज देशभर साजरा केला जात असुन शहराप्रमाणे ग्रामीण भागातही या उत्सवात गोविंदा पथकांना हजारो रू.ची बक्षीसे ठेवण्यात आली होती.कुडूस येथे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते गोविंद पाटील यांच्या नवनिर्माण कला क्रिडा व सामाजिक संस्थेच्या मानाच्या दहीहंडी उत्सवात ६१ हजार रू.चे प्रथम तर महिलांसाठी ११ हजार रू.चे बक्षीस ठेवण्यात आले होते.भाजपातर्फे मंगेश…

Read More