वसंत भोईर,वाडा
गौराईमातेच्या आगमनासाठी वाडा तालुक्यातील बाजारपेठा सजल्या,
तालुक्यातील व्यापाऱ्यांनी गौराई मातेच्या स्वागतासाठी बाजारपेठ सजवल्या आहेत. मात्र यंदा वाढलेल्या महागाईने खरेदीसाठी आलेल्या सामान्य भक्तांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
तालुक्यात वाडा,कुडूस,खानिवली,कंचाड,शिरीष पाडा,या महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत.या बाजारातील फळ विक्रेत्याच्या मनमानी व्यवहारावर नियंत्रण नसल्यामुळे व्यापारांच्या मनाप्रमाणे येथे फळांचे भाव असतात.मुंबई,ठाणे,कल्याण पेक्षाही येथे फळे चढ्या भावाने विकण्यात येत असतात. द्राक्षे -३५० रू.कि.लो.सफरचंद-१२० ते १६० रू.कि.लो. केळी ( वेलची )-७०ते ८०रू.डझन, साधी केळी-५०रू.ते ८०रू.डझन, पेरू-१०० रू.कि.लो.चिकू-१००रू.कि.लो.डाळिंब-१६०रू.कि.लो.
नासपती-१२० रू.कि.लो.पपई-७०रू.नग, सुपारी-१० रू.नग असे भाव असून हे भाव सामान्य नागरिकाला न परवडत नाहीत.यावर प्रशासनाने नियंत्रण आणून योग्य दराने फळांची विक्री व्हावी.अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी केली आहे.

