वसंत भोईर, वाडा,
त्या टायर रिसायकलिंग कंपनीला अखेर टाळे…
तालुक्यातील कोनसई गावात टायर रिसायकलिंगच्या अनेक कंपन्या असून, या कंपन्यांमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच या कंपन्याचे रासायनिक सांडपाणी आसपासच्या शेतीमध्ये जात असल्याने भात पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
त्यामुळे ही कंपनी बंद करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी गेल्या दोन वर्षापासून उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे केली होती. शेतकऱ्यांच्या या तक्रारीच्या अनुषंगाने प्रशासनाने या टायर कंपनीवर बंद करण्याची कारवाई केली आहे.या प्रदूषणकारी टायर कंपनी मुळे कोणसई गावातील ३० शेतकऱ्यांच्या ५० एकर भात शेतीचे तसेच सुमारे १५ लाखापर्यंत या आर्थिक नुकसान झाल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.या नुकसानीची प्रशासनाने पाहणी करून नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी ग्रामस्थाकडून करण्यात येत आहे.दरम्यान कुपनलिकेचे पाणीही दूषित होत चालले असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
प्रशासनाने आता या कंपनीवर बंदची कारवाई केली आहे. मात्र आमच्या शेतीचे झालेल्या नुकसानीची भरपाई आम्हाला मिळावी यासाठी स्थानिक शेतकरी आग्रही आहेत.

