वसंत भोईर,वाडा
वाड्यात भावपूर्ण वातावरणात शेकडो गणरायाला निरोप
तालुक्यात काल दीड दिवसांसाठी घरोघरी आगमन झालेल्या बाप्पा मौज मजे सह गोड धोडांची लय लूट करून गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना,आम्हाला अशा घोषणा देत, ढोल ताशे बँजोच्या साथीने गुळाची उधळण करीत येथे गणरायाला निरोप देण्यात आला
तालुक्यात हजारोंच्या संख्येने घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती.गणपती विसर्जन काही ग्रामपंचायतींच्या माध्यमातून उभा रण्यात आलेल्या कृत्रिम तलावात, तर काही ठिकाणी गणपती विसर्जन गावच्या नद्या,ओहोळ व तलावात करण्यात आले.यावेळी गणेश भक्तांमध्ये भावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.काल वाड्यात दुपारपासून सुरू झालेल्या पावसामुळे विसर्जनास गणेश भक्तांची चांगली तारांबळ उडाली होती.त्यामुळे पावसाच्या हजेरीत बाप्पाचे विसर्जन गणेश भक्तांना करावे लागले.विसर्जनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती वाडा पोलिसांनी दिली.

