- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
आदिवासींचे स्थलांतर थांबवण्यासाठी रोजगार निर्मिती करणे आवश्यक- राज्यपाल रमेश बैस, पालघर, आदिवासी आणि ग्रामीण समुदायांना सक्षम आणि समृद्ध करण्यासाठी आपल्याला बहुआयामी धोरणाची आवश्यकता आहे.आदिवासी बांधवांसाठी त्यांच्याच गावात रोजगार निर्माण केल्यास त्यांचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर थांबू शकेल.त्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले वाडा तालुक्यातील गलतारे येथील इस्कॉन गोवर्धन इको व्हिलेज येथे चेंज मेकर्सचा गौरव राज्यपाल बैस यांच्या हस्ते करण्यात आला,त्यावेळी श्री.बैस बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील,वाडा प्रांताधिकारी आगे पाटील इस्कॉनचे संचालक गौरांग दास प्रभू,इस्कॉनच्या संचालिका मैथिली देसाई तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ…
पालघर, तानसा धरण भरले ; जिल्ह्यातील १५ गावांना सतर्कतेचा इशारा, पालघर जिल्ह्यातील तानसा धरणाने पाण्याची कमाल पातळी गाठली असून ते ओसंडून वाहू लागले आहे.त्यामुळे वसई व वाडा तालुक्यातील एकूण १५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.वसई तालुक्यातील १२ तर वाडा तालुक्यातील ३ गांवाचा त्यामध्ये समावेश आहे. गेल्या पंधरा दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे तानसा धरणातील पाण्याची पातळी १२८.१०७ मी.इतकी पोहोचली आहे.या धरणाची पूर्ण क्षमता १२८.६३ मी.इतकी आहे.सध्याची पातळी अधिक असल्यामुळे तसेच ती सतत वाढत असल्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जातील.त्यामुळे खानिवडे,घाटेघर,शिरवली,आडणे,पारोळ,आंबोडे, भाताणे,सायवन,काशीद-कोपर,हेदवडे,कोपर,चिमणे व वाडा तालुक्यातील निभावली,मेट व गोरांड या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.या धरणाचे दरवाजे उघडले की…
दीपक मोहिते, कोकण रेल्वेचे आरक्षण अवघ्या दहा मिनिटात हाऊसफुल्ल, दलाल व रेल्वे कर्मचाऱ्याची मिलीभगत, सालाबादप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाच्या तोंडावर कोकण रेल्वेवर दलालांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.कोकण रेल्वेचे बुकिंग सुरु होताच अवघ्या दहा मिनिटात कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल झाले.त्यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना आता खाजगी बसेसचा आधार घ्यावा लागणार आहे.खाजगी बस ऑपरेटर देखील आता लुटीच्या तयारीत आहेत. यंदा मध्य रेल्वेने मुंबई-कोकण दरम्यान गणेशोत्सवासाठी २०२ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.या गाड्याच्या आरक्षणास कालपासून सुरुवात करण्यात आली.सकाळी आठच्या सुमारास बुकिंगला सुरुवात होताच अवघ्या दहा मिनिटात आरक्षण हाऊसफुल्ल झाले.त्यामुळे कोकणवासीयांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली.दलालांनी या बुकिंगवर डल्ला मारल्याचा आरोप त्यांनी केला…
दीपक मोहिते, जिल्हाधिकारी बोडके यांनी केली महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी, काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते विजय पाटील यांनी वसई विरार जिल्हा काँग्रेसतर्फे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निषेधार्थ ढोल बजाव आंदोलन केले होते. या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष जनतेला होणाऱ्या त्रासाकडे वेधले जाईल व त्याचीत ते दाखल घेतील,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.पण निद्रावस्थेत असलेल्या प्राधिकरणाचे अधिकारी या आंदोलनाने जागे झाले नाहीत.त्यामुळे विजय पाटील यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची नुकतीच भेट घेऊन या विषयी कैफियत मांडली होती.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते विजय पाटील यांच्या सोबत महामार्गाची झालेली दुरवस्था व खड्ड्याची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत वसई तहसीलदार अविनाश कोष्टी,मंडळ अधिकारी, तलाठी,राष्ट्रीय महामार्ग…
दीपक मोहिते, अमित शहा यांची विखारी टीका ; महायुतीला आगामी विधानसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता, दोन दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या भाजपच्या मेळाव्यात भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली.त्याचे राज्यभरात जोरदार पडसाद उमटले.खुद्द अजित पवार गटाच्या अनेक आजी-माजी आमदारांनी त्यांच्या टिकेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.तर दस्तुरखुद्द अजित पवार यांनी याविषयी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला ” नो कॉमेंट्स,” असे सांगत वेळ मारून नेली.शहा यांच्या या अशा टीकेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसेल,अशी भिती आमदार खाजगीत व्यक्त करत आहे. एकीकडे भाजप शरद पवार यांना लक्ष्य करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शरद पवार यांनी…
पालघर, वसई पूर्व मुख्य रास्ता पाण्याखाली,रस्तावर खर्च झालेले लाखो रु.पाण्यात, वसई पूर्वेस मुंबई-अहमदाबद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक दिवसभर अत्यंत धिम्यागतीने सुरू होती. वसई ते सातीवली फाटा दरम्यान दरवर्षी गुढघाभर पाणी भरते.त्यामुळे सातीवली फाटा,गोखीवरे,सातीवली गाव,वालीव,गवराईपाडा, भोयदापाडा हजारो नागरिकांना किमान चार ते पाच दिवस हालअपेष्टा सहन करावे लागते.या रस्त्याची उंची कमी असल्यामुळे पाण्याचा निचरा वेगाने होत नव्हता.याविषयी नागरिकांकडून अनेक तक्रारी आल्यानंतर महानगरपालिकेने रस्त्याची पुनर्बांधणी व रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला व एप्रिल व मे या दोन महिन्यात रस्त्याचे काम पूर्ण केले.त्यासाठी लाखो रु.चा निधी खर्ची पडला.पण हा खर्च पहिल्याच पावसात वाहून गेला आहे.गेल्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने महानगरपालिकेची…
पालघर, रहिवाशांना महसूल विभागाकडून नोटीसा, महसूल विभागाने जिल्ह्यातील सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधलेल्या रहिवाश्यांना नोटीसा बजावल्या आहेत.त्यामुळे स्थानिक भूमीपुत्रामध्ये प्रचंड नाराजी आहे. डहाणूच्या तहसीलदारांनीही चिंचणी येथे वर्षानुवर्षे राहत असलेल्या मच्छीमार लोकांना अतिक्रमण केल्याचे नमूद करत ते राहत असलेली घर खाली करण्यासाठी नोटीसा बजावल्या आहेत.सदर नोटीसा घेऊन चिंचणी येथील मच्छीमारांचे नेत्यांनी आ.श्रीनिवाजी वनगा यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांची भेट घेऊन चर्चा केली. आले.या चर्चेदरम्यान आ.वनगा यांनी यावेळी वर्षानुवर्षे राहत असलेल्या रहिवाशांना नियमाकुल करून घ्यावे,अशी विनंती तहसीलदाराना केली.त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.त्यामुळे मच्छीमाराना काही अंशी दिलासा मिळाला आहे.भेटीस गेलेल्या शिष्टमंडळात पालघर शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुशील चुरी व पालघर विधानसभेचे आ.श्रीनिवास वनगा पालघर तालुका…
पालघर, जव्हार येथे ८ लाखाचे अमली पदार्थ जप्त,दोनजण अटकेत, अमली पदार्थाचा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघाना जव्हार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३२ कीलो अमली पदार्थ व वाहन असा एकूण एकूण साडेअकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकहुन एका पिकअप वाहनातून अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर जव्हार पोलिसांनी सापळा रचून एका पिकअप वाहनाला अडवले.सदर वाहनांची तपासणी केली असता,भाजीपाल्याच्या कॅरेट्समध्ये एका गाठोड्यात हे अमली पदार्थ लपवल्याचे पोलिसांना आढळून आले.पोलिसांनी वाहनचालक सुनील आर्य व क्लिनर श्रीराम सोलंकी,दोघे राहणार मध्यप्रदेश याना ताब्यात घेतले.त्यांची कसून चौकशी केली असता सुमारे ८ लाख की.चा कॅनबीज बिया असलेला गांज्याचे पुडके आढळून आले.पोलिसांनी गांजा व पिकअप वाहन,असा…
पालघर, जव्हार येथे ८ लाखाचे अमली पदार्थ जप्त,दोनजण अटकेत, अमली पदार्थाचा अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघाना जव्हार पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून ३२ कीलो अमली पदार्थ व वाहन असा एकूण एकूण साडेअकरा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. नाशिकहुन एका पिकअप वाहनातून अमली पदार्थाची तस्करी होणार असल्याची खबर मिळाल्यानंतर जव्हार पोलिसांनी सापळा रचून एका पिकअप वाहनाला अडवले.सदर वाहनांची तपासणी केली असता,भाजीपाल्याच्या कॅरेट्समध्ये एका गाठोड्यात हे अमली पदार्थ लपवल्याचे पोलिसांना आढळून आले.पोलिसांनी वाहनचालक सुनील आर्य व क्लिनर श्रीराम सोलंकी,दोघे राहणार मध्यप्रदेश याना ताब्यात घेतले.त्यांची कसून चौकशी केली असता सुमारे ८ लाख की.चा कॅनबीज बिया असलेला गांज्याचे पुडके आढळून आले.पोलिसांनी गांजा व पिकअप वाहन,असा…
मुले होणार संगणक सुशिक्षित- आ. राजेश पाटील, पालघर, सर्वदा प्रतिष्ठान आणि नवनीत फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बेलवाडी आश्रम शाळेमधील १२ वी च्या विद्यार्थांसाठी मोफत एमएस-सीआयटी हा कोर्स मुलांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नवनीत फाउंडेशन हे आपल्या बेलवाडी आश्रमशाळेमध्ये १० उपलब्ध करणार असून सर्वदा प्रतिष्ठान अणि नवनीत फाऊंडेशन हे या केंद्राची संपूर्ण व्यवस्था पाहणार आहे.मी देखील याच आश्रमशाळेचा विद्यार्थी होतो,आज मी आमदार झालो आहे, शिक्षणासाठी ज्या काही सोयी सुविधा आवश्यक आहेत,त्या सर्व मी उपलब्ध करुन देईन,असे आ.राजेश पाटील यांनी मार्गदर्शनपर केलेल्या भाषणात सांगितले.या कार्यक्रमासाठी सर्वदा प्रतिष्ठानचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित पटेल,नवनीत फाऊंडेशनचे वैभव चौहान, प्रणिता जाधव,वसई पंचायत समितीच्या…
