पालघर,
तानसा धरण भरले ; जिल्ह्यातील १५ गावांना सतर्कतेचा इशारा,
पालघर जिल्ह्यातील तानसा धरणाने पाण्याची कमाल पातळी गाठली असून ते ओसंडून वाहू लागले आहे.त्यामुळे वसई व वाडा तालुक्यातील एकूण १५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.वसई तालुक्यातील १२ तर वाडा तालुक्यातील ३ गांवाचा त्यामध्ये समावेश आहे.
गेल्या पंधरा दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे तानसा धरणातील पाण्याची पातळी १२८.१०७ मी.इतकी पोहोचली आहे.या धरणाची पूर्ण क्षमता १२८.६३ मी.इतकी आहे.सध्याची पातळी अधिक असल्यामुळे तसेच ती सतत वाढत असल्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जातील.त्यामुळे खानिवडे,घाटेघर,शिरवली,आडणे,पारोळ,आंबोडे, भाताणे,सायवन,काशीद-कोपर,हेदवडे,कोपर,चिमणे व वाडा तालुक्यातील निभावली,मेट व गोरांड या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.या धरणाचे दरवाजे उघडले की या सर्व गावात पाणी शिरते व हाहाकार उडतो.२००५ साली ही सर्व गांवे तब्बल तीन दिवस पाण्याखाली गेली होती.त्यावेळी प्रशासनाने नाविक दलाला पाचारण केले होते.या पार्श्वभूमीवर दरवर्षी अतिवृष्टी झाली की जिल्हा प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा या सर्व गावावर विशेष लक्ष ठेवत असतात.जिल्ह्यातील धामणी व कवडास ही धरणे देखील येत्या आठ दिवसात ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.धरण क्षेत्रात प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे यंदा जिल्ह्यातील सर्व धरणे व बंधारे अल्पावधीत पूर्णपणे भरतील,अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Trending
- ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांच्या एका व्यक्तव्याने देशभरात तीव्र पडसाद,
- दहशतवादी पन्नूला सतावतेय स्वतःच्या हत्येची भिती,
- येत्या दसरा मेळाव्यात उद्धव व राज एकाच मंचावर,
- मसाला उत्पादकांमध्ये कारवाईच्या भितीने घबराट,
- टीआरपीच्या नादात बेताल वक्तव्ये ; माफी मागण्याची नामुष्की ओढवली…
- इन्फ्लुएन्सर्स आणि युट्युबर्ससाठी आचारसंहिता लागु करण्याचा प्रश्न विचारधीन ?
- कैसा हराया….?
- रियल इस्टेट व्यवसाय, हा नियोजनबद्ध विकासाचा पाया होऊ शकत नाही,

