दीपक मोहिते,
जिल्हाधिकारी बोडके यांनी केली महामार्गाच्या दुरावस्थेची पाहणी,
काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते विजय पाटील यांनी वसई विरार जिल्हा काँग्रेसतर्फे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निषेधार्थ ढोल बजाव आंदोलन केले होते.
या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष जनतेला होणाऱ्या त्रासाकडे वेधले जाईल व त्याचीत ते दाखल घेतील,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.पण निद्रावस्थेत असलेल्या प्राधिकरणाचे अधिकारी या आंदोलनाने जागे झाले नाहीत.त्यामुळे विजय पाटील यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची नुकतीच भेट घेऊन या विषयी कैफियत मांडली होती.त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी काँग्रेस नेते विजय पाटील यांच्या सोबत महामार्गाची झालेली दुरवस्था व खड्ड्याची पाहणी केली.यावेळी त्यांच्यासोबत वसई तहसीलदार अविनाश कोष्टी,मंडळ अधिकारी, तलाठी,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, संबधित ठेकेदार,वसई विरार शहर मनपाचे उपआयुक्त,अधिकारी,वरिष्ठ पोलिस अधिकारी,वाहतूक नियंत्रण अधिकारी व अन्य मान्यवर होते.जिल्हाधिकारी बोडके यांनी महामार्गाची पाहणी केल्यानंतर तरी महामार्गाची सर्व कामे लवकरात लवकर पूर्ण होऊन सर्वसामान्यजनाना दिलासा मिळेल का याविषयी लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे.

