Author: दीपक मोहिते

सचिन परब, वसई विरार महापालिकेच्या उपक्रमांना मोठा प्रतिसाद, वसई विरार महापालिकेने स्वच्छ भारत अभियान 2.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत घेतलेल्या विविध स्पर्धांचे विजेते जाहीर करण्यात आले आहे. या विजेत्यांना मंगळवारी पार पडलेल्या सोहळ्यात मा.आयुक्तांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. वसई विरार शहर महानगरपालिकेमार्फत स्वच्छ सर्वेक्षण 2024-25 अंतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान व स्वच्छ वसई विरार अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये स्वच्छता चॅम्पियन लघुपट, पथनाट्य, चित्रकला, स्वच्छ नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आदी विविध स्पर्धांचा समावेश होता. शहर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात जनजागृती व्हावी तसेच शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थी…

Read More

मनिष म्हात्रे, अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात शालेय विद्यार्थ्यासाठी क्रिडा स्पर्धा, मिरा भाईंदर वस‌ई विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ ३ विरार तर्फे अर्नाळा सागरी पोलीस ठाणे अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस या स्पर्धा अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याशेजारी असलेल्या मैदानावर होत आहेत. आज सकाळी मिरा भाईंदर वस‌ई विरार परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांच्या उपस्थीतीत या क्रिडा स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी नालासोपारा विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त विजय लगारे, विरार विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई, अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील , सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश पुरभे, पोलीस उप निरीक्षक साईप्रसाद पवार,…

Read More

दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका : पुढील सुनावणी २५ फेब्रू.रोजी, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात होणारी सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा पुढे ढकलली आहे.आता ही सुनावणी पुढील महिन्याच्या २५ तारखेला होणार आहे.या निवडणुका लवकरात लवकर व्हाव्यात,यासाठी सरकारही प्रयत्नशील आहे.कारण गेली चार वर्षे या निवडणुका रखडल्या आहेत.लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांची कामे वेळेवर होत नाहीत.याविषयी दोन दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होती.परंतु त्या दिवशीही पदरी निराशाच पडली.आता २५ फेब्रु.रोजी होणाऱ्या सूनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाची सुनावणी ५ फेब्रु.रोजी ठेवण्यात येणार होती,परंतु दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही तारीख पुन्हा पुढे ढकलली गेली आहे.मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या सुनावणीत ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निकाली…

Read More

सुशील भोईर, वसई, शिवछाया मित्रमंडळ व साईदयाघना मंदिराचा ३७ वा वर्धापनदिन साजरा, नवयुगनगर,दिवाणमान,वसई पश्चिम येथे शिवछाया मित्र मंडळ व साईदयाघना मंदिराचा ३७ वा वर्धापन व साई उत्सव नुकताच विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाला, १६ ते २३ जाने.दरम्यान श्री साईसच्चरित पारायण सप्ताह व सांयकाळी साईबाबांच्या पादुका व प्रतिमेची पालखी मिरवणूक साईबाबांचा देखावा,लेझीम पथक,धुर्म्रवर्ण ढोल पथक,बेंजो,जगदगुरू श्री नरेंद्र महाराज भजन मंडळ,सुंदर रांगोळ्या,गुलाब फुलांची पुष्पवृष्टी,रंगीबेरंगी फटाके आतषबाजी,पालखीचे मानकरी हरिलाल जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,माणिकपूर पोलिस स्टेशन व प्रशांत लांगी,पोलिस निरीक्षक,वाहतूक शाखा,वसई परिमंडळ-२,संदेश जाधव व मंडळाचे पदाधिकारी,महिला साई भक्त पारंपरिक वेशभूषेत नाचत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.दुसऱ्या दिवशी महिलांचा जल्लोष कार्यक्रमात,निवेदिका मोनिका यांनी…

Read More

अनिल वैद्य,नाशिक, अंमलीपदार्थ विक्री विरोधात कठोर कारवाई करावी – गृहराज्यमंत्री योगेश कदम, अंमली पदार्थ विक्रेत्यांबरोबरच सेवन करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करतानाच याविरोधात शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी.त्यामध्ये पालकांना सहभागी करून घ्यावे,असे निर्देश राज्याचे गृह ( शहरे ), महसूल,ग्रामविकास व पंचायतराज,अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी येथे दिले.ते आज नाशिक पोलिस आयुक्तालयात आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव,मोनिका राऊत,चंद्रकांत खांडवी यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री कदम म्हणाले की, अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवावे.शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी,अंमली पदार्थ…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” देशमुख कुटुंबियांना लवकर न्याय मिळेल,असे वाटत नाही…. गेल्या दोन महिन्यांपासून कराड पुराण सुरू असून महायुतीचे सरकार धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहे,हे आता लपून राहिलेले नाही.संतोष देशमुख यांचे बंधू,कन्या व बीडवासीय न्याय मिळावा,यासाठी राज्यसरकारकडे सातत्याने मागणी करत आहेत,पण फडणवीस सरकारच्या हृदयाला पाझर फुटत नाही.दोन महिने उलटून गेल्यानंतरही हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी पोलिसांना सापडत नाहीत.त्यामुळे बीड जिल्हा पोलीस यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक असून पोलिसांवर दबाव असल्यामुळे कराड याला सगळ्या सुविधा उपलब्ध होत आहेत,असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया केला आहे.मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा,यासाठी दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात साजरा, २६ जाने.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा काळीधोंड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदनेने झाली.या सोहळ्यात एकूण ६० गाणे,नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे नियोजन भाऊसाहेब शेटे,लक्ष्मी ठाकरे,नरसिंह सूर्यवंशी किरण कुवरा,सुनिता इंगळे,रुपेश घेगड,अर्जुन शिंदे,संजय कोकतरे,योगिता बोंबाडे,जयश्री भोये,निखिल महाले,पल्लवी बोरसे,मुक्ता कुरबुडे व पालकांनी केले.भाऊसाहेब शेटे आपल्या भाषणात म्हणाले,वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करत असून,त्यांच्या कला,कौशल्य आणि नेतृत्वगुणांना वाव देते.हे नेतृत्वगुण फक्त राजकीय क्षेत्रात नव्हे तर व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्रातही उपयुक्त ठरतात.कार्यक्रमाचे अध्यक्ष हरी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ४१ अनधिकृत इमारती ; लोकप्रतिनिधींकडून जुमलेबाजी सुरूच… नालासोपारा पूर्व भागातील ४१ अनधिकृत इमारतीवरील तोडक कारवाई जवळपास पूर्ण होत आली आहे.या कारवाईनंतर सुमारे दोनशे हुन अधिक कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले आहेत.कारवाई सुरू होण्यापूर्वी आणि कारवाई सुरू झाल्यानंतरही खासदार व आमदाराकडून आश्वासनाची जुमलेबाजी सुरूच आहे.आज पुन्हा एक नवीन जुमला समोर आला आहे.आज या पीडित रहिवाशांना नवीन आश्वासन देण्यात आले आहे.याप्रकरणी खासदार आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.आज मंत्रीमंडळाची बैठक आहे,या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिवसभर मुंबईत भरगच्च कार्यक्रम आहेत.त्यामुळे फडणवीस यांची भेट मिळण्याची शक्यता फार कमी आहे. आणि समजा भेट मिळालीच तर याविषयी ते मुख्यमंत्र्यांना काय…

Read More

दिपक मोहिते, मानवी जीवनाला धोका, भूजलात नायट्रेटचे प्रमाण वाढले ; मानवी जीवनाला धोका, केंद्रीय भूजल मंडळाने नुकताच वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल जाहीर केला आहे.या अहवालात देशातील ४४० जिल्ह्यात भुजलात नायट्रेटचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढले असल्याचे नमूद केले आहे.यामध्ये महाराष्ट्रातील वर्धा,बुलढाणा,अमरावती,नांदेड,बीड,जळगाव व यवतमाळ या सात जिल्ह्याचा समावेश आहे.सदर अहवालाची राज्यसरकारने गंभीर दखल घ्यावी,अशी पर्यावरण तज्ञानी मागणी केली आहे. भुजलात नायट्रेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असणे,ही बाब गंभीर असून पर्यावरण व मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.नायट्रेट आधारीत रासायनिक खतांचा बेसुमार वापर,हे महत्वाचे कारण यामागे असून बागायती क्षेत्रात नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे या अहवालात म्हंटले आहे.पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढल्यास त्याचा परिणाम लहान…

Read More

अनिल वैद्य,नाशिक, सतीश आळेकर यांना जनस्थान २०२५ पुरस्कार जाहीर, नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा २०२५ सालचा जनस्थान पुरस्कार मराठी नाटककार अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक सतीश वसंत आळेकर यांना जाहीर झाला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आज या पुरस्काराची घोषणा झाली एक वर्ष आड दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे वितरण कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी १० मार्च रोजी नाशिक येथे गुरुदक्षिणा हॉल येथे होणार आहे.एक लाख रु.रोख व सन्मान चिन्ह सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रीय नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले.त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले १९७२ साली त्यांनी पुणे विद्यापीठातून विज्ञानाची पदवी प्राप्त…

Read More