जव्हार प्रतिनिधी,
जव्हार येथे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात साजरा,
२६ जाने.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा काळीधोंड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदनेने झाली.या सोहळ्यात एकूण ६० गाणे,नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे नियोजन भाऊसाहेब शेटे,लक्ष्मी ठाकरे,नरसिंह सूर्यवंशी किरण कुवरा,सुनिता इंगळे,रुपेश घेगड,अर्जुन शिंदे,संजय कोकतरे,योगिता बोंबाडे,जयश्री भोये,निखिल महाले,पल्लवी बोरसे,मुक्ता कुरबुडे व पालकांनी केले.भाऊसाहेब शेटे आपल्या भाषणात म्हणाले,वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करत असून,त्यांच्या कला,कौशल्य आणि नेतृत्वगुणांना वाव देते.हे नेतृत्वगुण फक्त राजकीय क्षेत्रात नव्हे तर व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्रातही उपयुक्त ठरतात.कार्यक्रमाचे अध्यक्ष हरी बोरसे होते,तर प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेचे सदस्य श्रावण खरपडे होते.यावेळी खरपडे यांनी गावकऱ्यांच्या लोकवर्गणीतून व स्वयंखर्चातून हळदी-कुंकवाचा कार्यक्रम व वनभोजन आयोजित केल्याबद्दल कौतुक व्यक्त केले.कार्यक्रमात माजी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी लता भोये,दर्शना मुकणे व रोहित कोळी या शिक्षकांचा विशेष गौरव करण्यात आला.या कार्यक्रमासाठी सरपंच निलेश भोये,उपसरपंच संजय भोये, ग्रामपंचायत सदस्य राजेश पांढरे,शिक्षण विस्तार अधिकारी डांगे मॅडम, प्राथमिक शिक्षक संघ अध्यक्ष सखाराम पवार, मनोज कामडी ( तालुका व्यवस्थापक,पेसा ), केंद्रप्रमुख जगताप सर, काशिनाथ पांढरे, दिनेश भोये, कृष्णा मुरमे,शांताराम ठाकरे, डॉ.शरद मुकणे,अमोल मोकाशी व इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण कुवरा व नरसिंह सूर्यवंशी यांनी केले. परीक्षणाची जबाबदारी दिनेश भोये, काशिनाथ पांढरे व संजय भोये यांनी पार पाडली.प्रत्येक गटासाठी ट्रॉफी देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अर्जुन शिंदे यांनी केले.

