- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
Author: दीपक मोहिते
गंगाधर जामनिक,पालघर पूर्व, रस्त्यात बंद पडणाऱ्या एस्ट्या ; प्रवासीवर्गात संतापाचे वातावरण, पालघर एस.टी.आगाराला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या सातपाटी – पालघर या मार्गांवर धावणाऱ्या एस. टी. बसेस सतत नादुरुस्त होत असतात,त्यामुळे प्रवासी वर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी बंद पडणाऱ्या बसेस,हा महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारा आहे. सातपाटीला जाणारी शेवटची बस अधून मधून बंद पडत असते.त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागतो.कारण रात्रीच्या वेळी जाण्यासाठी वाहन उपलब्ध होऊ शकत नाही.त्यामुळे प्रवासी महामंडळाच्या पालघर विभागाच्या बेभरवशा कारभारावर सडकून टीका करतात.सातपाटी मार्गावर नादुरुस्त वाहने देण्यात येत असल्याचा आरोप सातपाटीकरांकडून करण्यात येत आहे. प्रतिक्रिया /- एस.टी.प्रशासनाला सातपाटी ग्रामपंचायतीतर्फे या ज्वलंत समस्येबाबत आम्ही…
संजय लांडगे,वाडा शहर, मांगरूळ येथे जिल्हा परिषद शाळेसाठी नवीन स्वच्छतागृह, वाडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या मांगरूळ शाळेसाठी स्वच्छ आणि सुसज्ज स्वच्छतागृह बांधण्याचा महत्वाचा उपक्रम राबवण्यात आला. के.पी.टी.पाईप्स यांच्या सी.एस.आर.कार्यक्रमांतर्गत, रोटरी क्लब ऑफ मुंबई बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स,फिनेट मीडीया,अभी & नियु ( Following Love ), आणि ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह यांच्या सहकार्याने हा प्रकल्प यशस्वी झाला. ही शाळा पूर्वीपासून स्वच्छ आणि सुसज्ज स्वच्छतागृहाच्या सुविधेपासून वंचित होती.विशेषतः मुलींना स्वच्छतागृहाच्या अभावामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते.शाळेतील ही गरज लक्षात घेऊन के.पी.टी. पाइप्स यांनी जि.प.शाळेसाठी तीन मुलींसाठी आणि तीन मुलांसाठी असे एकूण सहा स्वच्छतागृह बांधून दिले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते.या उद्घाटनप्रसंगी के.पी.टी.पाईप्सचे रिजनल…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महाविकास व इंडिया आघाडीची वाटचाल बिघाडीच्या दिशेने… नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महाविकास आघाडीची वाटचाल आता बिघाडीच्या दिशेने सुरू झाली आहे.लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही तसेच यश पदरात पडेल,अशी सर्वसाधारण अपेक्षा होती.पण आघाडीच्या घटक पक्षात या निवडणुकीत एकवाक्यता व समन्वय याचा अभाव राहिल्यामुळे त्यांचे संख्याबळ साठीच्या आत आले.या पराभवानंतरही त्यांच्या वागण्यात सुधारणा झाली नाही.या पराभवाची कारणमीमांसा करणे,आपलं काय चुकलं ? याविषयी हे घटक पक्ष एकत्रितपणे आत्मचिंतन करतील,अशी अपेक्षा होती,पण त्यांनी आपापल्या वेगळ्या चुली मांडण्यात धन्यता मांडली.त्यामुळे ही आघाडी आता किती काळ तग धरेल,हे सांगणे कठीण आहे. महविकास आघाडीची ही तऱ्हा तर…
दीपक मोहिते, पालघर जिल्हा परिषद चिंचले प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार हक्काचे छत, डहाणू तालुक्यातील चिंचले येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत व अंगणवाडीची इमारत मुंबई – वडोदरा महामार्गात जात असल्यामुळे महामार्ग बनवणाऱ्या कंपनीने जिल्हा परिषदेची कुठलीही पूर्व परवानगी न घेता तोडल्या होत्या.त्यामुळे वर्षभरापासून या शाळेतील विद्यार्थी हे एका पत्राच्या छताखाली शिक्षण घेत होते.जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी वर्षभरापासून जिल्हा परिषदेमधील प्रत्येक स्थायी आणि सर्वसाधारण सभेमध्ये पोटतिडकीने हा विषय मांडत असत.नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हा विषय काशिनाथ चौधरी यांच्याकडून मांडण्यात आला. या सभेमध्ये मुलांना शाळा उपलब्ध करून न दिल्यास जिल्हा परिषद येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने आज…
दीपक मोहिते, पालघर जिल्हा परिषद चिंचले प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना मिळणार हक्काचे छत, डहाणू तालुक्यातील चिंचले येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत व अंगणवाडीची इमारत मुंबई – वडोदरा महामार्गात जात असल्यामुळे महामार्ग बनवणाऱ्या कंपनीने जिल्हा परिषदेची कुठलीही पूर्व परवानगी न घेता तोडल्या होत्या.त्यामुळे वर्षभरापासून या शाळेतील विद्यार्थी हे एका पत्राच्या छताखाली शिक्षण घेत होते.जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी वर्षभरापासून जिल्हा परिषदेमधील प्रत्येक स्थायी आणि सर्वसाधारण सभेमध्ये पोटतिडकीने हा विषय मांडत असत.नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या सभेत हा विषय काशिनाथ चौधरी यांच्याकडून मांडण्यात आला. या सभेमध्ये मुलांना शाळा उपलब्ध करून न दिल्यास जिल्हा परिषद येथे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने आज…
दीपक मोहिते, महिला लोकशाही दिन १६ डिसें.रोजी, समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण उपलध्ब करून देण्याच्या दृष्टीने महिलांच्या तक्रारी,अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी म्हणजेच या महिन्याचा महिला लोकशाही दिन १६ डीसें.रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,येथे आयोजित करण्यात आला आहे. महिला लोकशाही दिनाचा अर्ज जिल्हाधिकारी यांना उद्देशून असावा.तसेच तालुका महिला लोकशाही दिन टोकन क्र.व तहसिलदारांच्या उत्तराची प्रत अर्जा सोबत जोडण्यात यावी.महिला लोकशाही दिनी घ्यावयाची तक्रार,अडचण सोडविण्यासाठी अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,कक्ष क्र. १०८,पहिला मजला, प्रशासकीय इमारत अ, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर,कोळगाव रोड,…
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतला पालघर जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा, आज पंचायत समिती पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पालघर,रविंद्र शिंदे यांनी गट विकास अधिकारी,विस्तार अधिकारी (पंचायत),विस्तार अधिकारी (सांख्यिकी),सर्व विभागप्रमुख,उपअभियंता, शाखा अभियंता,सहाय्यक प्रशासन अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक यांची समन्वय आढावा सभा घेऊन विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी,ग्रामपंचायत,चंद्रशेखर जगताप,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,पाणी व स्वच्छता विभाग अतुल पारसकर,बापूराव नाळे,प्रभारी गट विकास अधिकारी,पंचायत समिती पालघर तसेच अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचा आढावा घेताना सन २०१६-१७ ते २०२३-२४ पर्यंत दरम्यान प्रधानमंत्री आवास योजना व राज्यपुरस्कृत घरकुल योजनांची अपूर्ण घरकुले माहे जानेवारी २०२५ अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबत सुचना दिल्या.लाभार्थी घरकुले बांधून पूर्ण…
नवीन पाटील,सफाळे, जिल्हा प्रशासनाचा अजब कारभार ; तब्बल ३१ गावांचा भार एकाच तलाठ्यावर… पालघर जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया रखडल्यामुळे अनेक गावातील तलाठ्यांची पदे रिक्त आहेत.सफाळे पूर्व व पश्चिम भागातील तीन मंडळ अधिकाऱ्यांची जबाबदारी सध्या एकाच तलाठ्याकडे असून यामुळे ३१ गावांचा भार त्यांच्यावर देण्यात आला आहे. जमिनीची व इतर कामे वेळेवर होत नसल्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. पालघर जिल्ह्यात तलाठ्यांची कमतरता भासत असून अनेक ठिकाणी तलाठ्यांअभावी शेतकऱ्यांच्या शेतीविषयी भेडसावणाऱ्या समस्यांची सोडवणूक होत नाही.तलाठ्यांना इतरही कामे असल्यामुळे तलाठ्यांची चांगलीच दमछाक होत असते. संपूर्ण जिल्ह्यात असा प्रकार सुरू असून शेतकऱ्यांची शेतीची कामे व विविध दाखल्यांवर तलाठ्यांच्या सहीसाठी विद्यार्थी व पालकांना वारंवार फेऱ्या…
संजय नेवे विक्रमगड बांगला देशाच्या निषेधार्थ विक्रमगड येथे मुक मोर्चाचे आयोजन, बांगला देशात हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराचे पडसाद आता देशभरात उमटू लागले आहेत.अनेक हिंदुत्ववादी संघटना व सामाजिक संस्था या अत्याचाराविरोधात निषेध व्यक्त करत आहेत. पालघर जिल्ह्यातील सकल हिंदू समाज या मराठा संघटनांनी याविषयी एल्गार पुकारला आहे.गेल्या दोन दिवसात नालासोपारा व आज वाडा / विक्रमगड शाखेने मोर्चाचे आयोजन केले होते. आज विक्रमगड येथे या घटनेच्या निषेधार्थ मूक मोर्चा काढण्यात आला होता बांगलादेशामध्ये अल्पसंख्यांक हिंदूंना त्रास दिला जातो,त्यांच्यावर हल्ले होत आहेत,त्या निषेधार्थ विक्रमगड सकल हिंदू समाजाच्यावतीने शहरातील विठ्ठल मंदिर येथून मुक मोर्चा निघून विक्रमगड तहसीलदार कार्यालय विकमगड आला. यावेळी सकल हिंदू समाजाच्या…
नवीन पाटील,सफाळे, सफाळे येथे तरुणाने इअरफोनमुळे गमावला जीव, पश्चिम रेल्वेच्या सफाळे स्थानकात रेल्वे अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नुकताच घडली.कानात इअरफोन घातल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या राजधानी एक्स्प्रेस गाडीचा हॉर्न ऐकू आला नाही आणि त्या तरुणाचा गाडी खाली येऊन मृत्यू झाला. नितेश चौरसिया,असे या तरुणाचे नाव आहे.याबाबत सफाळे रेल्वे पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मुंबईहून सफाळे येथे नेहमीप्रमाणे ओमटेक्स येथे क्रिकेटच्या सरावासाठी येत असताना रेल्वे रूळ ओलांडताना ही घटना घडली. सफाळे स्थानकात लोकलमधून उतरून तो मैदानाकडे चालला होता.मात्र, कानात इअरफोन असल्याने रेल्वे रूळ ओलांडताना त्याला गाडीचा,तसेच लोकांच्या आरडाओरड्याचा आवाज ऐकू आला नाही.तो मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेस…
