गंगाधर जामनिक,पालघर पूर्व,
रस्त्यात बंद पडणाऱ्या एस्ट्या ; प्रवासीवर्गात संतापाचे वातावरण,
पालघर एस.टी.आगाराला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या सातपाटी – पालघर या मार्गांवर धावणाऱ्या एस. टी. बसेस सतत नादुरुस्त होत असतात,त्यामुळे प्रवासी वर्गात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
रात्रीच्या वेळी बंद पडणाऱ्या बसेस,हा महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणारा आहे. सातपाटीला जाणारी शेवटची बस अधून मधून बंद पडत असते.त्यामुळे प्रवाशांना अतोनात त्रास सहन करावा लागतो.कारण रात्रीच्या वेळी जाण्यासाठी वाहन उपलब्ध होऊ शकत नाही.त्यामुळे प्रवासी महामंडळाच्या पालघर विभागाच्या बेभरवशा कारभारावर सडकून टीका करतात.सातपाटी मार्गावर नादुरुस्त वाहने देण्यात येत असल्याचा आरोप सातपाटीकरांकडून करण्यात येत आहे.
प्रतिक्रिया /-
एस.टी.प्रशासनाला सातपाटी ग्रामपंचायतीतर्फे या ज्वलंत समस्येबाबत आम्ही लेखी कळवणार आहोत,
–अभिजित तरे,उपसरपंच, सातपाटी,
प्रतिक्रिया /-
आमचे कामगार बसेसची वेळोवेळी तपासणी करतात,वाहनांची देखभाल व दुरुस्तीकडे आम्ही जाणीवपूर्वक लक्ष देत असतो. गाड्या रस्त्यात बंद पडल्या असतील तर आम्ही लवकरच त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करू…
–श्री.साठे,डेपो,आगार व्यवस्थापक,पालघर एस.टी. आगार,

