- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” करदात्याच्या पैश्याची लूट,” वसई विरार शहर मनपा ; नालेसफाई व कचरा उचलणे,या दोन्ही कामाची ईडीने चौकशी करावी… वसई विरार शहर महानगरपालिकेचा भ्रष्ट माजी आयुक्त हा सध्या सक्तवसुली संचलनालयाच्या कोठडीत असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.४१ अनधिकृत इमारती बांधकाम,वसुली व त्याच्याकडे सापडलेली गडगंज संपत्ती,या अशा तीन प्रकरणी हा माजी आयुक्त व त्याचे कुटुंब सध्या अडचणीत आले आहेत.न्यायालयाने त्यांच्यासह अन्य चार जणांना २० ऑगस्टपर्यंत इडीची कोठडी सुनावली आहे. त्याच्या या चौकशीची कार्यकक्षा कोणकोणत्या विभागापर्यंत विस्तारल्या आहेत,ते यथावकाश म्हणजे आज ना उद्या माध्यमांना कळू शकेल.सध्या सुरू असलेल्या चौकशीमध्ये कचरा व्यवस्थापन व नालेसफाई,या दोन ज्वलंत प्रश्नाचा समावेश आहे की नाही,हे…
वाड्यात ८ कि.मी.लांबीच्या रस्त्याची झाली दुरुस्ती, वाडा तालुक्यातील निंबवली – पालसई रस्ता अत्यंत खराब झाला असून जागोजागी खड्डे पडले होते.त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहन चालक हैराण झाले होते.रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी भाजपचे पालघर उपजिल्हाध्यक्ष कृष्णा भोईर व माझी सभापती अरुण गौंड यांनी पुढाकार घेतला.त्यांनी स्थानिक खदाण मालकांच्या मदतीने ८ कि.मी. रस्त्याची खड्डे भरले. तालुक्यातील निंबवली- पालसई हा रस्ता प्रचंड रहदारीचा असुन अनेक गावांना व बाजारपेठेस जोडणारा मुख्य रस्ता आहे.या रस्त्यावर प्रवास करतांना वाहन चालकांसह नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता.तसेच जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता.सदर बाब लक्षात घेऊन येथील स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हा रस्ता खड्डे भरून…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अखेर त्या २९ गावांचा तिढा सुटला… काल अखेर राज्याच्या नगरविकास विभागाने वसई तालुक्यातील २९ गावांचा तिढा मार्गी लावला.ही गावे महानगरपालिकेतच राहणार असल्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्यात आली आहे.त्यामुळे गेली पंधरा वर्षे वादात अडकलेल्या प्रश्नाचा एकदाचा सोक्षमोक्ष लागला आहे.गेल्या तीन वर्षांपासून नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या मूठभर लोकांची तोंडे आता बंद झाली आहेत. राज्य शासनाने आपल्याला असलेल्या अधिकाराचा वापर करून गेल्या २४ फेब्रु.२०२४ रोजी या विषयावर अधिसूचना प्रसिद्ध केली व नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या होत्या.त्या सूचना व हरकतीवर कोकण विभागीय आयुक्तांनी नुकतीच सुनावणी घेतली व आपला अहवाल नगरविकास विभागाला सादर केला होता.सदर अहवाल विचारात घेऊन राज्य सरकारने ही २९…
दीपक मोहिते, जाज्वल्य देशाभिमानच देशाला विकासाच्या वाटेवर नेऊ शकतो… आज देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.स्वातंत्र्याच्या आठ दशकात आपल्या देशाची झालेली वाटचाल वाखणण्याजोगी नसली तरी समाधानकारक आहे.सुरुवातीच्या काळात अनेक आघाडीवर बलाढ्य देशानी आपली कोंडी केली.अन्न-धान्य,संरक्षण,परराष्ट्र धोरण,शिक्षण,आरोग्य व आर्थिक धोरण इ.क्षेत्रात मागासलेपणा होता.परंतु आता तशी स्थिती राहिलेली नाही.वरील सर्व क्षेत्रात आता आपण स्वंयपूर्ण झालो आहोत,ही अभिमानाची बाब असून प्रत्येक भारतीयाने आज आपल्या तिरंग्याला सलाम करायलाच हवा.अठरापगड़ जाती-जमाती,विविध भाषा व संस्कृती,प्रचंड लोकसंख्या असलेला लोकशाहीप्रधान देश,अशी आपली जगभरात ओळख आहे.हे सारे एकसंघ ठेवून राज्यकारभार चालवण्याची किमया आपल्या राज्यकर्त्यानी यशस्वीरित्या करून दाखवली,याची नोंद घ्यायलाच हवी. गेल्या ७९ व्या वर्षात देश विकसनशील देशाच्या रांगेत…
सचिन सावंत,वसई, वसईत नविन भूमिगत २२ के.व्ही.वाहिनीचे लोकार्पण, २२०/२२ के.व्ही.नालासोपारा उपकेंद्र ते २२ के.व्ही.पोमण स्विचिंग स्टेशन,पोमण इनकमर-२ या नविन भुमिगत २२ के.व्ही. वाहिणीचे उद्घाटन आज वसई विधानसभेच्या आ.स्नेहा ताई दुबे पंडित यांच्या हस्ते पोमण स्विचिंग स्टेशन,रॉयल हब इंडस्ट्रीज,पोमण ता.वसई येथे संपन्न झाले. या स्विचिंग स्टेशनमुळे वसई विरार परिसरातील वीज पुरवठा अधिक सक्षम,स्थिर व अखंड राहणार असून उद्योग क्षेत्रासोबतच नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या सोहळ्याला महावितरण कल्याण परिमंडळ मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा,महावितरण वसई मंडळ अधिक्षक अभियंता संजय सु. खंडारे,कार्यकारी अभियंता प्रविण सूटे,अति.कार्यकारी अभियंता मुकुंद देशमुख,कनिष्ठ अभियंता इरफान शेख,पोमण ग्रामपंचायत सरपंच आत्माराम ठाकरे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजू म्हात्रे,वसई पूर्व दक्षिण मंडळ अध्यक्ष…
दीपक मोहिते, पालघर जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळावी, मुंबईलगत असलेल्या गुजरातच्या प्रवेशद्वारावर वसलेला पालघर जिल्हा हा निसर्गाच्या लेण्यानी नटलेला असा हा जिल्हा आहे.पुर्वेस खोलडोंगरदऱ्या,विपुल वनसंपदा व भातशेतीची आगरे दुसरीकडे पश्चिमेस अथांग समुद्रकिनारा,बागायती, फुलशेती व पारंपारीक पद्धतीने मासेमारी करणारी समुद्रकिनारी वसलेली मच्छीमारांची असंख्य गावे.शहरीकरण होवुनही या संपूर्ण परिसराने आजही आपले गावपण टिकवून ठेवले आहे.वास्तविक येथील वातावरण हे पर्यटन उद्योगाला पोषक असूनही राज्य व केंद्र सरकार त्याकडे का दुर्लक्ष करत आहे,याचा उलगडा होत नाही. जिल्ह्याच्या पश्चिमेस वसई ते थेट डहाणू व पूर्वेस मनोर,विक्रमगड़,जव्हार,मोखाडा परिसर हा पर्यटनासाठी उत्तम असा प्रदेश आहे.जव्हार तालुका हा मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखला जातो. हा तालुका पर्यटनासाठी पोषक असा तालुका…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ईडीने ” थर्डडिग्री,” चा वापर केल्यास सगळे पोपट पटापट बोलायला लागतील… शासकीय अधिकारी व राजकारणी पैश्याच्या मागे सतत धावत का असतात ? या प्रश्नाचे उत्तर आहे,स्वार्थ व वरिष्ठाची मर्जी सांभाळणे होय. मलईदार जागी पोस्टिंग मिळवण्यासाठी या अधिकाऱ्यांना वसुली अधिकारी व्हावे लागते. दरमहा ठराविक रक्कम दिल्यानंतर तुम्हाला करदात्याच्या पैश्याची लूट करण्याचा एकप्रकारे परवानाच मिळतो,या अशा गोरखधंद्यामध्ये हे अधिकारी देखील आपले हात धुवून घेत असतात.वसई – विरार महानगरपालिकेत गेल्या सोळा वर्षात जी लूट झाली.त्यामध्ये हीच पद्धत अवलंबण्यात आली.त्यामुळे आयुक्तासोबत अति.आयुक्त बाव उपायुक्त व मंत्रालयात बसलेले झारीतील शुक्राचार्य यांना सक्तवसुली संचलनालयाने शोधून काढले पाहिजे.हल्लीचे राजकारण आणि प्रशासन दोन्हीही अर्थकारणाभोवती…
सचिन पाटील,वसई चिंचोटी-भिवंडी रस्ता दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी मंत्रालयात बैठक संपन्न, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची मंत्रालयात भेट घेऊन चिंचोटी-भिवंडी रस्त्याच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसंदर्भात महत्वपूर्ण बैठक घेतली.या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत या राजमार्गाची तात्काळ दुरुस्ती सुरू करण्याबाबत चर्चा होऊन मंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना पुढील दोन दिवसांत काम सुरू करण्याचे स्पष्ट आदेश दिले.तसेच, रस्त्याची पुनर्बांधणी काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून करण्याची प्रक्रिया गतीमान करण्याचे निर्देश दिले.हे प्रकरण सध्या मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे आवश्यक परवानग्या मिळवून प्रक्रिया त्वरित पूर्ण करण्याचे यावेळी आदेशही देण्यात आले. या सकारात्मक निर्णयासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.तसेच,वसईच्या नागरिकांच्या प्रश्न व समस्याचे निराकरण…
वसंत भोईर,वाडा अमली पदार्थांविरोधात वाडा पोलिसांची जनजागृती मोहीम, वाडा पोलिस ठाण्यातर्फे रियल अकॅडमी येथे “अमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती,” मोहीम राबवण्यात आली. या कार्यक्रमात दत्तात्रेय किंद्रे यांनी अमली पदार्थांचे वैयक्तिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम,कुटुंब व समाजावर होणारे परिणाम,तसेच अमली पदार्थांच्या आहारी जाण्यामुळे होणारे मानसिक,आर्थिक आणि सामाजिक नुकसान याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.युवकांनी अमली पदार्थांपासून दूर राहून शिक्षण,क्रीडा व सकारात्मक छंदांकडे वळावे,असे आवाहन त्यांनी यावेळी केले. अमली पदार्थांविरुद्ध पोलीस प्रशासनाच्या विविध मोहिमा, कायदेशीर तरतुदी आणि त्यांची अंमलबजावणी याविषयीही माहिती देण्यात आली.उपस्थित विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांना ” नाही,” म्हणण्याचा संकल्प केला. या उपक्रमाला रियल अकॅडमीचे संचालक शशांक ठाकरे,विशाल ठाकरे, शिक्षकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदर…
वसंत भोईर,वाडा चिंचघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कैलास ठाकरे यांची निवड तालुक्यातील चिंचघर या प्रतिष्ठित समजल्या जाणा-या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक काल पार पडली.या निवडणूकीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या सत्ताधारी कमिटीला धक्का देत भाजपचे कैलास ठाकरे हे निवडून आले.त्यांच्या या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. चिंचघर या ग्रामपंचायतीची सदस्य संख्या दहा असून या ग्रामपंचायतीत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची सत्ता असून त्यांचे पाच तर भाजपचे पाच सदस्य होते.या ग्रामपंचायतीचे तत्कालीन उपसरपंच मनेश पाटील यांनी आपल्या पॅनल मध्ये ठरलेल्या समझोत्यानुसार काही दिवसांपूर्वी राजीनामा दिला होता.तसेच याच पॅनलच्या अन्य एका सदस्याचे पद जिल्हाधिकारी यांनी रद्द केल्यानमुळे सत्ताधारी पक्षाचे चार सदस्य उरले होते. आज ग्रामपंचायतीच्या…
