Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टो.मध्ये होण्याची शक्यता, केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा कालबद्ध कार्यक्रम काल जाहीर केला. त्यामुळे साधारणपणे या निवडणुका ऑक्टो.महिन्यात दिवाळीच्या आसपास होतील असा अंदाज आहे.एका प्रभागात चार सदस्य,अशी प्रभागाची रचना करण्यात येणार आहे.आयोगाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असुन भाजपने, या रचनेमुळे चारपैकी निदान एका प्रभागात घटक पक्षाला उमेदवारी देता येईल,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यातील अ + – वर्गात बृहन्मुंबई महानगरपालिका, अ वर्ग – पुणे,नागपूर,ब वर्ग – ठाणे,पिंपरी-चिंचवड,नाशिक, क वर्ग – कल्याण – डोंबिवली,छत्रपती संभाजी नगर,नवी मुंबई व वसई विरार, ड वर्ग – सोलापूर,मीरा भाईंदर,भिवंडी – निजामपूर, अमरावती,नांदेड -…

Read More

जव्हार प्रतिनिधी, जव्हारच्या दुर्गम भागात ३६० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू व छत्र्यांचे वाटप, पावसाळ्याची चाहूल लागली असुन जव्हार तालुक्यातील दुर्गम आदिवासी वाड्यांमध्ये श्री रामलाल जे.बगाडिया चॅरिटेबल ट्रस्ट,कफ परेड मुंबई यांच्या सौजन्याने आणि जूचंद्र येथील शिव छत्रपती समाज सेवा मंडळ यांच्या सहकार्यातून एक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत जव्हार तालुक्यातील जंगलपाडा,ऐनापाडा, बरफपाडा,धिंडेपाडा, पारधीपाडा,गौंडपाडा, हनुमानपाडासाखरा या दुर्गम भागातील ३६० आदिवासी कुटुंबांना जीवनावश्यक किराणा साहित्य तसेच टॉवेल व छत्र्यांचे वाटप करण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या वस्तूंमध्ये तांदूळ,डाळ, कडधान्य,साखर,चहा पावडर, गूळ,पोहे,साबण,मीठ,तेल, मसाला,हळद,थंड पेय,टॉवेल व छत्र्या यांचा समावेश होता. या सर्व साहित्याचे वितरण बगाडिया ट्रस्टचे सेवक अनिल सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास शिव…

Read More

वसंत भोईर,वाडा वाड्याची अंकिता घोडविंदे मुंबई पोलीस सेवेत दाखल, वाडा तालुक्यातील घोडविंदेपाडा येथील अंकिता नामदेव घोडविंदे हीने कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस प्रशिक्षण पूर्ण केले.आता ती मुंबई पोलीस दलात सेवेत दाखल झाली आहे.घोडविंदेपाडा गावातील ही पहीलीच मुलगी पोलीस सेवेत रुजू झाली असून आईवडीलांसह ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नाही.अंकिताच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव एकत्रित येऊन ढोल- ताशांच्या गजरात गावभर तीची मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केले. अत्यंत गरीब कुटुंबातून आलेल्या अंकिताने अनेक अडचणींना सामोरे जात आपले शिक्षण पूर्ण केले.तर लहानपणापासून तीने पोलीस होण्याचे स्वप्न पाहिले होते.त्या स्वप्नाला साकार करण्यासाठी तीने अथक परिश्रम केले.अंकिताचे यश हे केवळ तिच्या कुटुंबासाठी नव्हे,तर संपूर्ण गावातील तरुणाईसाठी…

Read More

वसंत भोईर,वाडा गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप, गुरूदेव सिद्धपीठ अंतर्गत कार्यरत प्रसाद चिकित्सा धर्मादाय संस्था,गणेशपुरी, रोटरी क्लब ऑफ कांदिवली वेस्ट आणि एस.ए.एस. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काल तानसा खोऱ्यातील गरजू मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला.यामध्ये संस्थेतर्फे ४१ शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ मुंबई कांदिवली वेस्टचे अध्यक्ष देवसिंग शहाणी,यज्ञेश भट,श्रीमती दीप्ती संघवी,श्रीमती जस्मिता भट तसेच प्रसाद चिकित्साचे कार्यकारी व्यवस्थापक मिलिंद नरगुंद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेली तीन दशके प्रसाद चिकित्सा संस्था तानसा खोऱ्यात आरोग्य,कृषी, महिला सक्षमीकरण,पाणी व स्वच्छता,शिक्षण आणि कला यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेऊन संस्थेने उचललेले…

Read More

दीपक मोहिते, जिल्ह्यातील प्रदूषण ; पालकमंत्र्यांनी बैठकांची नौटंकी बंद करावी, आज पालघर जिल्ह्यातील प्रदूषणाच्या प्रश्नावर एक ऐतिहासिक बैठक पार पडली या बैठकीचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.या बैठकीत जिल्ह्यातील प्रदूषणाच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली,असे जिल्हावासियांच्या कानावर आले.या ऐतिहासिक बैठकीनंतर प्रदूषणाच्या समस्या किती सुटतील,हे सांगणे जरा कठीणच आहे. बोईसर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी सांडपाणी समुद्रात जाण्यापासून रोखणे,आजवर एकाही सरकारला शक्य झाले नाही.ते रोखण्याऐवजी राज्यांच्या प्रत्येक पर्यावरणमंत्र्याने व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी खिसे भरण्याचे काम केले.परिसरात प्रचंड प्रदूषण करणारे कारखाने बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश धुडकावून ते सर्रास सुरू आहेत.वने आणि डोंगर परिसरात अनेक अनधिकृत दगडखाणी धुमाकूळ…

Read More

सुरेश वैद्य,पालघर पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा- डॉ. भोयर, गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा पोलीस प्रशासन आणि जनता यामधील महत्वाचा दुवा आहे. आज पालघर येथे होणारी कार्यशाळा ही महाराष्ट्रात पहिली कार्यशाळा आहे.याचा मला अभिमान असल्याचे, प्रतिपादन गृह ( ग्रामीण ),गृहनिर्माण,शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आज येथे केले. जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन समिती सभागृह येथे पालघर जिल्हा पोलीस पाटील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी ते बोलत होते. या कार्यशाळेस खा.हेमंत सवरा,आ.राजेंद्र गावित, आ.हरिश्चंद्र भोये,विधी निदेशक महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक संजय पाटील,जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड,पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे,अपर…

Read More

शुभम सावंत,विरार विरार येथे ” पिकलबॉल,” खेळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान विकसित, ” पिकलबॉल,” हा सर्व वयोगटांसाठी,विशेषतः ज्येष्ठ नागरिकासाठी एक आदर्श खेळ असून,या खेळामुळे हृदय,स्नायू,मानसिक संतुलन आणि सामाजिक बंध यांसारखे शरीराच्या अनेक अवयावांना फायदे होत असतात. शारीरिक व मानसिकदृष्ट्या तो आरोग्यासाठी वरदान ठरणारा आहे. पिकलबॉल हा एक मजेदार, कमी प्रभावाचा खेळ आहे.जो सर्व वयोगटांसाठी शारीरिक व मानसिक फायदे मिळवून देतो.अशा या अनोख्या खेळाचे मैदान विरार येथील यशवंत नगरमध्ये नूकतेच विकसित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन काल वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष सुधीर वालावलकर,माजी महापालिका आयुक्त कल्याण केळकर,माजी नगरसेवक जीतू…

Read More

सचिन परब,विरार विरार येथे जलतरण व बुद्धीबळ स्पर्धा  संपन्न, विरार अमेय क्लासिक क्लब येथे संपन्न झालेल्या या जलतरण स्पर्धेत ६ ते ७० वयोगटातील १७५ स्पर्धक सहभागी झाले होते.विशेष म्हणजे+यामध्ये २ दिव्यांगांचाही समावेश होता तर बुद्धिबळ स्पर्ध्येत ६ ते ५० वयोगटात ५५ स्पर्धक सहभागी झाले होते. या जलतरण स्पर्ध्येत ६ ते ७० वयोगटातील १७५ स्पर्धक सहभागी झाले होते त्यात २ दिव्यांगांचाही समावेश होता तर बुद्धिबळ स्पर्ध्येत ६ ते ५० वयोगटात ५५ स्पर्धकांनी भाग घेतला. या दोन्ही स्पर्धाचे खेलो मास्टर्स गेम्स पालघर जिल्हा अध्यक्ष व माजी महापौर राजीव पाटील,हेमंत म्हात्रे,जीतू शहा,अजिव पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी…

Read More

जव्हार प्रतिनिधी, भगवान बिरसा मुंडा बलिदान दिवस व छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा. गेल्या नऊ वर्षात आदिवासी समाजातील तळागाळातील समाज बांधवांना जागृत करून पारंपारिक संस्कृती टिकवण्याचे प्रामाणिक कार्य करत असलेल्या जनजाती विकास मंचाचे काम हे प्रेरणादायी असून सध्याच्या आधुनिक युगात समाजाला याचा भविष्यात नक्कीच फायदा होईल,असे गौरवोउद्गार पालघर लोकसभेचे खा. डॉ.हेमंत सवरा यांनी काढले. जनजाती विकास विकास मंच आयोजित भगवान बिरसा मुंडा बलिदान दिवस व छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने जव्हार येथे सोमवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आदिवासी समाजाचे दैवत मानल्या जाणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांची पुण्यतिथी आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज…

Read More

वाडा प्रतिनिधी, वाड्यात निवडणूक आयोगा विरोधात मशाल मोर्चा, देशातील निवडणूका निष्पक्ष, पारदर्शक पद्धतीने पार पाडणे, हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे.लोकशाही व्यवस्थेत निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे,परंतु मागील निवडणुकीतील काही घटना पाहता या स्वायत्त संस्थेवरील जनतेचा व राजकीय पक्षांचा विश्वास कुठेतरी कमी होत असल्याचे दिसत आहे. त्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. नोव्हें. २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतही अनेक गैरप्रकार दिसून आले आहेत. असे मत काँग्रेस कमिटीचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल पाटील यांनी मांडले आहे.ते पत्रकारांशी बोलत होते. वाडा शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत,ते पुढे म्हणाले की,मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट करणे व वगळणे या प्रक्रियेत मोठा…

Read More