वसंत भोईर,वाडा
गरजू विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप,
गुरूदेव सिद्धपीठ अंतर्गत कार्यरत प्रसाद चिकित्सा धर्मादाय संस्था,गणेशपुरी, रोटरी क्लब ऑफ कांदिवली वेस्ट आणि एस.ए.एस. फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने काल तानसा खोऱ्यातील गरजू मुलांसाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडला.यामध्ये संस्थेतर्फे ४१ शालेय विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ मुंबई कांदिवली वेस्टचे अध्यक्ष देवसिंग शहाणी,यज्ञेश भट,श्रीमती दीप्ती संघवी,श्रीमती जस्मिता भट तसेच प्रसाद चिकित्साचे कार्यकारी व्यवस्थापक मिलिंद नरगुंद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गेली तीन दशके प्रसाद चिकित्सा संस्था तानसा खोऱ्यात आरोग्य,कृषी, महिला सक्षमीकरण,पाणी व स्वच्छता,शिक्षण आणि कला यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे.दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी होणारा त्रास लक्षात घेऊन संस्थेने उचललेले हे पाऊल कौतुकास्पद आहे. आजपर्यंत संस्थेने १५० हुन अधिक विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले असून, या मदतीमुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ झाले आहे.

