दीपक मोहिते,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ऑक्टो.मध्ये होण्याची शक्यता,
केंद्रीय निवडणूक आयोगाने काल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचा कालबद्ध कार्यक्रम काल जाहीर केला. त्यामुळे साधारणपणे या निवडणुका ऑक्टो.महिन्यात दिवाळीच्या आसपास होतील असा अंदाज आहे.एका प्रभागात चार सदस्य,अशी प्रभागाची रचना करण्यात येणार आहे.आयोगाच्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत असुन भाजपने, या रचनेमुळे चारपैकी निदान एका प्रभागात घटक पक्षाला उमेदवारी देता येईल,अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राज्यातील अ + – वर्गात बृहन्मुंबई महानगरपालिका,
अ वर्ग – पुणे,नागपूर,ब वर्ग – ठाणे,पिंपरी-चिंचवड,नाशिक,
क वर्ग – कल्याण – डोंबिवली,छत्रपती संभाजी नगर,नवी मुंबई व वसई विरार, ड वर्ग – सोलापूर,मीरा भाईंदर,भिवंडी – निजामपूर, अमरावती,नांदेड – वाघाळा, कोल्हापूर,अकोला,उल्हास नगर,सांगली,मिरज आणि कुपवाड शहर,मालेगाव,जळगाव, धुळे,अहिल्यानगर,लातूर चंद्रपूर व परभणी शहर या महानगरपालिकांचा त्यामध्ये समावेश आहे.११ जून ते ४ सप्टें.दरम्यान हा कालबद्ध कार्यक्रम पार पडणार असुन केंद्रीय निवडणूक आयोगाने याविषयी जिल्हाधिकारी, आयुक्त व मुख्याधिकारी यांना आदेश दिले आहेत.उपरोक्त कार्यक्रम वेळेत पूर्ण झाल्यास तसेच त्यास न्यायालयात आव्हान न मिळाल्यास केंद्रीय निवडणूक आयोग लवकरच निवडणुका जाहीर करण्याची शक्यता आहे.

