शुभम सावंत,विरार
विरार येथे ” पिकलबॉल,” खेळाचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान विकसित,
” पिकलबॉल,” हा सर्व वयोगटांसाठी,विशेषतः ज्येष्ठ नागरिकासाठी एक आदर्श खेळ असून,या खेळामुळे हृदय,स्नायू,मानसिक संतुलन आणि सामाजिक बंध यांसारखे शरीराच्या अनेक अवयावांना फायदे होत असतात. शारीरिक व मानसिकदृष्ट्या तो आरोग्यासाठी वरदान ठरणारा आहे.
पिकलबॉल हा एक मजेदार, कमी प्रभावाचा खेळ आहे.जो सर्व वयोगटांसाठी शारीरिक व मानसिक फायदे मिळवून देतो.अशा या अनोख्या खेळाचे मैदान विरार येथील यशवंत नगरमध्ये नूकतेच विकसित करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन काल वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी पिकलबॉल संघटनेचे अध्यक्ष सुधीर वालावलकर,माजी महापालिका आयुक्त कल्याण केळकर,माजी नगरसेवक जीतू शाह,अजीव पाटील,डॉ. प्रवीण क्षीरसागर,अमेय क्लासिक क्लबच्या संचालिका ग्रीष्मा पाटील-पोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
या संपूर्ण खेळाविषयी सांगताना उद्घाटक राजीव पाटील आपल्या भाषणात म्हणाले,पिकलबॉल हा सर्व वयोगटांसाठी,विशेष करून ज्येष्ठ नागरिकासाठी देखील एक चांगला खेळ आहे.
दरम्यान पिकलबॉल खेळताना जलद हालचाली आणि रॅलीमुळे हृदयाची गती वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका टळू शकतो तर हा खेळ नियमित खेळल्याने रक्तदाब, कोलेस्ट्रोल नियंत्रणात राहते.
आठवड्यातून ३ दिवस १ तास खेळणाऱ्या वृद्धांचे हृदयाचे आरोग्य सुधारते.पिकलबॉल खेळताना पाय,हात आणि पोटाचे स्नायू सक्रिय होत असतात.
पिकलबॉल हा सामाजिक खेळ आहे,विशेषतः डबल्स खेळताना आपले नवीन मित्र बनत असतात आणि एकटेपणा कमी होतो,जे वृद्धांसाठी महत्त्वाचे आहे.
सर्व थरातील लोक हा खेळू खेळू शकतात,अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुधीर वालावलकर यांनी दिली. यशवंत नगरमधील पिकलबॉल खेळाचे मैदान आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनवण्यात आले असल्याचेही शेवटी वालावलकर यांनी यावेळी सांगितले.

