दीपक मोहिते,
जिल्ह्यातील प्रदूषण ; पालकमंत्र्यांनी बैठकांची नौटंकी बंद करावी,
आज पालघर जिल्ह्यातील प्रदूषणाच्या प्रश्नावर एक ऐतिहासिक बैठक पार पडली या बैठकीचे नेतृत्व जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले.या बैठकीत जिल्ह्यातील प्रदूषणाच्या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली,असे जिल्हावासियांच्या कानावर आले.या ऐतिहासिक बैठकीनंतर प्रदूषणाच्या समस्या किती सुटतील,हे सांगणे जरा कठीणच आहे.

बोईसर औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी सांडपाणी समुद्रात जाण्यापासून रोखणे,आजवर एकाही सरकारला शक्य झाले नाही.ते रोखण्याऐवजी राज्यांच्या प्रत्येक पर्यावरणमंत्र्याने व प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी खिसे भरण्याचे काम केले.परिसरात प्रचंड प्रदूषण करणारे कारखाने बंद करण्याचे न्यायालयाचे आदेश धुडकावून ते सर्रास सुरू आहेत.वने आणि डोंगर परिसरात अनेक अनधिकृत दगडखाणी धुमाकूळ घालत आहेत.बोईसर पूर्व भागातील नागझरी व अन्य गावात या दगडखाणीतून बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे स्थानिक रहिवाशांना श्वास देखील घेता येत नाही. या भागातील अनेक मुले श्वसन रोगाने त्रस्त आहेत. जिल्हाधिकारी,तहसील व प्रदूषण नियंत्रण मंडळ या तीन कार्यालयाचे अधिकारी अर्थपूर्ण डोळेझाक करत असतात.
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील रेड झोन परिसरात असलेल्या टायर पायरोलिसिस रिसायकलिंग कंपन्यांमधून होणारे प्रदूषण, हा ही एक ज्वलंत विषय आहे. काही कंपन्यांना बंद करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. पण त्या कंपन्या पालकमंत्र्यांच्या नाकावर टिच्चून सुरू आहेत.समुद्रकिनारी असलेल्या मुरबे,सातपाटी व नांदगाव नवापूर,या चार गावात गेल्या काही वर्षात लाखो मासे मृतावस्थेत सापडले,पण कोणतीही कारवाई झाली नाही.
या महत्त्वाच्या बैठकीला वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डॉ.इंदुराणी जाखड,आ.राजेंद्र गावित यांच्यासह अनेक संबंधित अधिकारी उपस्थित होते,पण या बैठकीतून काहीही निष्पन्न होणार नाही.या बैठका म्हणजे केवळ एक फार्स असुन ” मी मारल्यासारखे करतो,तू रडल्यासारखे कर, ” अशाप्रकारची एक नौटंकी आहे.
आजच्या घडीला जिल्ह्याच्या समुद्रकिनारी असलेली अनेक गावे,बोईसरचा पूर्व भागातील डोंगरी परिसर व वाड्यातील अनेक गांवे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेत. आपले जिल्हा प्रशासन केवळ नोटीसा बजावणे व बैठकांची नौटंकी करण्यात मग्न आहेत. पालकमंत्र्यांनी बैठका घेण्याऐवजी सकाळी आठच्या सुमारास बोईसर औद्योगिक क्षेत्र,समुद्रकिनारी असलेली गावे, बोईसर पूर्व भागातील नागझरी,वाडा तालुक्यातील अनेक गावांचा दौरा करावा, पण स्थानिक प्रशासनाच्या

