- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- यंदाचा पाऊस भातशेतीला दिलासा देणारा….
- मी ज्या नालासोपारा मतदारसंघातून येतो…
- ठाणे जिल्हा मध्य.सह.बँक निवडणूक ; सहकार पॅनलचे निर्विवाद वर्चस्व,
- राजकारण्यांनी पत्रकारांची किंमत केली आहे,
- ” सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही, “
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
Author: दीपक मोहिते
जव्हार प्रतिनिधी, जगदंबा बोहाडा उत्सव ; १५ ते १७ मे २०२५ दरम्यान भव्य आयोजन, जव्हार तालुक्यातील मौजे चालतवड येथे १५ ते १७ मे दरम्यान जगदंबा बोहाडा उत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.या तीन दिवसीय धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात ग्रामस्थ,नातेवाईक, आजूबाजूच्या गावांतील भाविक आणि लोककला प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. या उत्सवात पारंपरिक सोंगे, आदिवासी लोककला सादरीकरण,मिरवणूक,आणि जगदंबा देवीचे पूजन,असे कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.बोहाडा सोंगांचे संबळ वाद्य मिरवणूक,तसेच पारंपरिक वेशभूषेतील कलाकारांचे सादरीकरण,ही या उत्सवाचे खास आकर्षण असते.त्यामुळे उपस्थित भाविकांना पारंपरिक आदिवासी सांस्कृतिक वारशाचा अनोखा अनुभव मिळतो.चालतवड गावातील सार्वजनिक जगदंबा बोहाडा उत्सव हे गावाचे गौरवशाली…
दीपक मोहिते, युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात मॉक ड्रिल, दहशतवाद्यांविरोधात भारतीय वायू दलाने मोठी कारवाई केल्यामुळे त्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानही कारवाई कऱण्याची शक्यता नाकारता येत नाही.हे लक्षात घेता नागरी क्षेत्रात हल्ले झाल्यास कसं वागावं,काय उपाययोजना कराव्या,यासाठी नागरी संरक्षणाचे धडे देण्यात येत आहेत. केंद्रीय गृहखात्याने सर्व राज्यांना आज मॉक ड्रील घेण्याचे आदेश दिले आहेत.हे मॉक ड्रिल करताना हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवले जातील, तसंच अशावेळी ब्लॅकआऊट कसा करावा,सुरक्षित ठिकाणी कसं जावं,इमारतींखाली कसं जमा व्हावं,याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या मॉक ड्रिलच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारही हायअलर्ट मोडवर आले आहे.प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना…
दीपक मोहिते, भारतीय वायू दलाकडून अतिरेक्याचे अड्डे उध्वस्त, अखेर आज भारतीय वायू दलाने काल मध्यरात्री दीड वाजता पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ९ अड्ड्यावर जोरदार बॉम्बहल्ले केले.या हल्ल्यात आठ दहशतवादी ठार झाले,,तर ३५ जण गंभीर जख्मी झाले.मध्यरात्री भारतीय वायू दलाने “ऑपरेशन सिंदूर,” राबवले.अचानक झालेल्या या हल्ल्याने पाकिस्तान अक्षरशः भांबावून गेला आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या या हल्ल्यात अनेक दहशतवादी संघटनांची मुख्यालये उध्वस्त झाली आहेत.मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय वायू दलाने राबवलेल्या या मोहिमेत एकूण २४ क्षेपणास्त्रे डागली.या हल्ल्यात ” जैशे ए महंमद,” या जहाल अतिरेकी संघटनेचे मुख्यालय पार उध्वस्त झाले.पहलगाम घटनेच्या पंधरा दिवसानंतर भारतीय सैन्याने बदला घेतला.हिजबूल मुजाहीदिन या अतिरेकी संघटनेचेही…
दीपक मोहिते, भारतीय वायू दलाकडून अतिरेक्याचे ९ अड्डे उध्वस्त, अखेर आज भारतीय वायू दलाने काल मध्यरात्री दीड वाजता पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ९ अड्ड्यावर जोरदार बॉम्बहल्ले केले.या हल्ल्यात आठ दहशतवादी ठार झाले,,तर ३५ जण गंभीर जख्मी झाले.मध्यरात्री भारतीय वायू दलाने “ऑपरेशन सिंदूर,” राबवले.अचानक झालेल्या या हल्ल्याने पाकिस्तान अक्षरशः भांबावून गेला आहे. भारतीय हवाई दलाने केलेल्या या हल्ल्यात अनेक दहशतवादी संघटनांची मुख्यालये उध्वस्त झाली आहेत.मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय वायू दलाने राबवलेल्या या मोहिमेत एकूण २४ क्षेपणास्त्रे डागली.या हल्ल्यात ” जैशे ए महंमद,” या जहाल अतिरेकी संघटनेचे मुख्यालय पार उध्वस्त झाले.पहलगाम घटनेच्या पंधरा दिवसानंतर भारतीय सैन्याने बदला घेतला.हिजबूल मुजाहीदिन या अतिरेकी…
राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सरकारी समितीच्या अध्यक्षपदाचा माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला आहे.जाने.२०२५पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे राम नाईक यांना तीनदा दीर्घकाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली,तरी अजूनही संपूर्ण विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आल्यामुळे राम नाईक यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे.राम नाईक यांचा मत्स्य व्यवसाय संदर्भातील प्रदीर्घ अनुभव व समितीपुढे आलेल्या सूचना यामुळे मुख्यत्वे मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देणे,ही काळाची गरज असल्याचे नाईक यांचे ठाम मत झाले होते.योगायोगाने समितीचा अहवाल सादर करण्यापूर्वीच गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग विकास धोरण निश्चित करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सरकारी समितीच्या अध्यक्षपदाचा माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीनामा दिला आहे.जाने.२०२५पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे राम नाईक यांना तीनदा दीर्घकाळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली,तरी अजूनही संपूर्ण विश्रांतीचा वैद्यकीय सल्ला देण्यात आल्यामुळे राम नाईक यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. राम नाईक यांचा मत्स्य व्यवसाय संदर्भातील प्रदीर्घ अनुभव व समितीपुढे आलेल्या सूचना यामुळे मुख्यत्वे मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देणे,ही काळाची गरज असल्याचे नाईक यांचे ठाम मत झाले होते.योगायोगाने समितीचा अहवाल सादर करण्यापूर्वीच गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र…
दीपक मोहिते, ” नको असला विकास,” प्रस्तावित पुरंदर विमानतळ : पोलीसांच्या लाठीहल्ल्यात महिलेचा मृत्यू, ” देशाचा सर्वांगीण विकास,” या तीन गोंडस शब्दाविषयी ग्रामीण भागातील लोकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण आहे.वाढवण,बुलेट,समृद्धी मार्ग,द्रुतगती मार्ग,रेल्वेचा डेडिकेटेड फ्रेट प्रकल्प व आता बारामती जिल्ह्यातील पुरंदर येथे होणारऱ्या प्रस्तावित विमानतळासाठी बळजबरीने होत असलेले जमिनीचे संपादन लक्षात घेता हा अशाप्रकारचा सर्वांगीण विकास आम्हाला नको,असे स्थानिक भूमिपुत्राचे म्हणणे आहे. दोन दिवसांपूर्वी पुरंदर विमानतळासाठी जमीन संपादन प्रक्रियेच्या विरोधात सात गावातील स्थानिक भूमीपुत्रांनी सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले.सरकारच्या आडमुठे धोरणामुळे हे आंदोलन चिघळले.पोलिसांनी घरात घुसून मारहाण केल्यामुळे शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करण्यास सुरुवात केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” वसई/विरारच्या नागरिकांनी यंदाही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी.. पावसाळा तोंडावर आला असून वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांना अद्याप वेग आलेला नाही.” ” नेमेची येतो पावसाळा,” या म्हणीप्रमाणे करदात्यांना यंदाही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागणार आहे.दर पावसाळ्यात वसई/ विरार भागात अनेक परिसर जलमय होत असतात.दरवर्षी नालेसफाईच्या कामावर कोट्यवधी रु.खर्च होत असतात.पण मनपा अधिकारी,ठेकेदार व लोकप्रतिनिधी यांच्या मिलीभगतमुळे दरवर्षी नागरिकांना किमान तीन ते चार दिवस हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. वसई विरार उपप्रदेशात अतिवृष्टी झाली की उपप्रदेशात सर्वत्र हाहाकार उडतो.या नैसर्गिक आपत्तीमध्ये नागरिक व व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असते.नालासोपारा शहराच्या पूर्व भागात तुळींज,या गजबजलेल्या वस्तीच्या…
सफाळे,प्रतिनिधी, रोडखड जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थासाठी योग प्रशिक्षण, पालघर जिल्ह्यातील सफाळे पूर्वेकडील रोडखड जिल्हा परिषदेच्या शाळेत रोटरी क्लब ऑफ मुंबई ( मकाबो ) यांच्यातर्फे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. रोटरी क्लब ऑफ मुंबई (मकाबो) च्या अध्यक्षा शुभदा मांजरेकर,सनदी अध्यक्ष संजय अग्रवाल,सोनल दोशी,योग प्रशिक्षक मीनल भिर्द, यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील गिरीधर,उपाध्यक्ष नीलम घरत तसेच शाळेतील सर्व शिक्षक, पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.योग प्रशिक्षक मीनल मर्द यांनी मुलांना सुलभ मार्गाने योग कसे करावे,याविषयी खूप सुरेख मार्गदर्शन केले.योगाचे जीवनातील महत्त्व सांगितले. त्यानंतर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. संजय अग्रवाल यांनी शाळेला साऊंड सिस्टिम भेट…
सुशील भोईर, सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास गटाची पहिली महत्वाची बैठक संपन्न, महाराष्ट्र विधान परिषद गटनेते प्रविण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली सहकारी गृहनिर्माण संस्था स्वयंपुनर्विकास गटाची पहिली महत्त्वाची बैठक काल वांद्रे येथील म्हाडा मुख्यालयात पार पडली. या बैठकीत वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील अत्यंत धोकादायक (C-1) प्रकारात समावेश असलेल्या २०० धोकादायक इमारतींच्या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत,इमारतीचा पुनर्विकास रखडल्यामुळे हजारो कुटुंबांचे बेघर होण्याचे भिती आ.स्नेहा दुबे यांनी व्यक्त केली. महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करताना आ.प्रवीण दरेकर यांनी आ.स्नेहा दुबे पंडित यांची वसई-विरार आणि पालघर जिल्ह्यासाठी समन्वयक म्हणून नियुक्ती जाहीर केली. तसेच नवी मुंबई-पनवेलसाठी आ.प्रशांत ठाकूर यांची वर्णी लावली. त्यामुळे आता वसई-विरार सह नवी मुंबईमधील…
