दीपक मोहिते,
भारतीय वायू दलाकडून अतिरेक्याचे अड्डे उध्वस्त,
अखेर आज भारतीय वायू दलाने काल मध्यरात्री दीड वाजता पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ९ अड्ड्यावर जोरदार बॉम्बहल्ले केले.या हल्ल्यात आठ दहशतवादी ठार झाले,,तर ३५ जण गंभीर जख्मी झाले.मध्यरात्री भारतीय वायू दलाने “ऑपरेशन सिंदूर,” राबवले.अचानक झालेल्या या हल्ल्याने पाकिस्तान अक्षरशः भांबावून गेला आहे.

भारतीय हवाई दलाने केलेल्या या हल्ल्यात अनेक दहशतवादी संघटनांची मुख्यालये उध्वस्त झाली आहेत.मध्यरात्री दीडच्या सुमारास भारतीय वायू दलाने राबवलेल्या या मोहिमेत एकूण २४ क्षेपणास्त्रे डागली.या हल्ल्यात ” जैशे ए महंमद,” या जहाल अतिरेकी संघटनेचे मुख्यालय पार उध्वस्त झाले.पहलगाम घटनेच्या पंधरा दिवसानंतर भारतीय सैन्याने बदला घेतला.हिजबूल मुजाहीदिन या अतिरेकी संघटनेचेही या हल्ल्यात कंबरडे मोडले आहे. भारताकडून झालेल्या या कारवाईचा देशवासियांनी जोरदार स्वागत केले आहे.दरम्यान जम्मू – काश्मीर,जामनगर,राजकोट, अमृतसर व अन्य विमानतळावरील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

