- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, भयावह वास्तव, शहरी भागातील रेल्वेसेवा सुधारणा करण्यावर भर देण्याची गरज, २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत विराजमान झाल्यानंतर गेल्या १० वर्षात भारतीय रेल्वेला सुगीचे दिवस आले.१९४७ ते २०१४ सलग ६७ वर्षे रेल्वे सुधारणेला या पूर्वीच्या सरकारांनी कधीही प्राधान्य दिले नाही.विशेष करून मुंबईकर हालअपेष्टा सहन करत रेल्वेप्रवास करत होते.कोट्यवधी मुंबईकर चाकरमानी दररोज मरणयातना भोगत प्रवास करत राहिले.आजही त्यामध्ये फारसे बदल झालेले नाहीत.मोदी यांच्या सरकारने गेल्या दहा वर्षात रेल्वेच्या आधुनिकीकरणाला गती दिली.शहरी भागात मेट्रोचे जाळे विणले,रेल्वेस्थानके अद्ययावत केली,गाड्याचे रुपडे बदलले.अनेक शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी त्यांनी नवे मार्ग सुरू केले.आता त्यांनी पाहिलेले बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.हे सारं घडत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शरद पवार यांच्या पक्षात इनकमिंगला वेग, महायुतीचे नेते एकीकडे विविध योजनेच्या माध्यमातून पैश्याची खिरापत वाटत असताना दुसरीकडे शरद पवार यांनी त्यांच्या पायाखालची चादर ओढण्यास सुरुवात केली आहे.दोन दिवसांपूर्वी लिहिलेल्या लेखात महायुतीचे अनेक नेते शरद पवार यांच्या ” सिल्व्हर ओक,” या निवासस्थानी प्रवेशासाठी रांगेत उभे असल्याचे म्हंटले होते.आज त्या नेत्यांची यादी आमच्या हाती लागली आहे.पण शरद पवार हे प्रवेश देताना आता ताक देखील फुंकून पीत आहेत.या रांगेत कोण कोण उभे आहेत,यावर एक नजर टाकूया… १) विवेक कोल्हे-कोपरगाव, २) बाळ भेंगडे-मावळ, ३) बाबू पठारे-वडगाव शेरी, ४) हर्षवर्धन पाटील-इंदापूर, ५) मदन भोसले-वाई, ६) प्रशांत परिचारक-पंढरपूर ७) राजन पाटील-मोहोळ, ८)…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यात सरकार असून नसल्यासारखे, जातीपाती व धर्माचे राजकरण करणाऱ्या महायुतीच्या नेत्याना त्याच्या या दळभद्री राजकारणाने आता चांगलेच अडचणीत आणले आहे.मराठा विरुद्ध ओबीसी व आदिवासी विरुद्ध धनगर,या समाजामध्ये भिंती उभारण्याचे काम,ज्या नेत्यानी केले त्यांना लोकसभा निवडणुकीत विशिष्ट समाजाने चांगलाच हिसका दाखवला होता.त्या दणक्यानंतर तरी हे दळभद्री राजकारणी आपल्या वागण्यात सुधारणा करतील,अशी अपेक्षा होती.पण अंतरवली सिराट व वडगोद्री या गावात तसेच धारावी मुंबई येथे जे काही चालले आहे,ते दंगलीना आमंत्रण देण्यासारखे आहे.राज्याचे गृहमंत्री विविध वृत्तवाहिनीवर केवळ फुकटचे सल्ले देत असताना पाहायला मिळतात.वास्तविक रस्ते बंद करणे,दगडफेक करणे,असे प्रकार करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.पण गृहखात्याने त्यांना तमाशाई बनवून…
दीपक मोहिते, धावपळीच्या या जगात मनसोक्त जगून घ्या, क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि. कधी विकेट जाईल,याची काहीच शाश्वती नसते कोणालाही… आयुष्य जाते ते रुसण्या फुगण्यात, अबोला धरण्यात,बऱ्याचदा आधी कोणी बोलावे,या अहंकारात वर्षानुवर्षे निघून जातात.जीवनाच्या वाटचालीत कोणीच कोणाचा कायमचा साथीदार नसतो मित्रानो. आज आहे तर उद्या नाही. शेवटी फक्त आपले स्थान केवळ फोटोफ्रेममध्येच असते.ती फोटोफ्रेम पाहून लोक आपल्या आठवणी जागवत असतात.जगून घ्या,बोलून घ्या,मनमुराद हसून घ्या,आलंच रडायला तर रडूनही घ्या.आपल्यावर कोणी रुसले असेल तर स्वतः त्याच्याशी बोला. प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे.वय,नोकरी, व्यवसाय,प्रतिष्ठा,जात-पात, धर्म यापलीकडे जाऊन जगता आल पाहिजे. नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या.लहानपणी वाटत मोठ व्हावं,मोठेपणी वाटत श्रीमंत व्हावं…
दिपक मोहिते, वाडवळ समाज ; स्वतःच्या कष्टाने आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला, पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर राहणारा सोमवंशी क्षत्रिय समाज म्हणजेच ” वाडवळ,” समाज होय.हा समाज महाराष्टाच्या पश्चिम किनारपट्टीवर वसई तालुक्याच्या दक्षिण सीमेपासुन डहाणू तालुक्याच्या उत्तर सीमेपर्यंत असलेल्या लांबलचक पट्ट्यात प्रामुख्याने वसला आहे.पुढे तो मुंबई पार करून रायगड तालुक्यात अलिबाग ते मुरूडपर्यंत विखुरला गेला.पारंपारिक पद्धतीने शेती व बागायती करुन सोमवंशीय क्षत्रिय समाज स्वत:चे अस्तित्व टिकवून राहिला.त्या काळातही सोमवंशीय क्षत्रिय समाजाचे काही विशिष्ट कुलाचार व गोत्रप्रवरे होते,वज्रेश्वरी,महालक्ष्मी,एकवीरा,शितलादेवी,महिकावती,इ.कुलदेवता होत्या.मुळचे क्षत्रिय असल्याने विवाहासारख्या प्रसंगी वापरण्यासाठी प्रतिकात्मक असा सिंहासनाचा मान सोमवंशीय क्षत्रिय समाजाला मिळाला होता.त्या सिंहासनावर पाच कलश असत म्हणून हा समाज ” पाचकळशी,” म्हणून ओळखला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पालघर विधानसभा ; भाजपमुळे शिंदे गटांच्या नेत्यांचे भवितव्य टांगणीला, दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे गटात गेलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैदेही वाढाण आता घरवापसीच्या मार्गावर आहेत.पण उद्धव ठाकरे त्यांना पक्षात पुन्हा घेतील,असे वाटत नाही. गेली अनेक वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कट्टर समर्थक म्हणून त्या ओळखल्या जात होत्या.पण अडीच वर्षांपूर्वी झालेल्या बंडाच्या वेळी त्यांनी शिंदे यांना साथ दिली.त्यामुळे उद्भव ठाकरे यांनी त्यावेळी चांगलाच संताप व्यक्त केला होता. मात्र गेल्या अडीच वर्षात वैदेही वाढाण यांची पक्षात साधी दखल घेतली गेली नाही.यंदा त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळेल,अशी अपेक्षा होती,पण त्यांना उमेदवारी देण्यास अनेकांचा विरोध आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची अनु.जाती व…
दीपक मोहिते, जागावाटप, जागावाटपात महाविकास आघाडीच्या शिवसेना ( उबाठा ) व महायुतीमधील भाजपला झुकते माप मिळणार, महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे पथक येत्या २७ सप्टें.रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे.दोन दिवसांच्या या दौऱ्यात हे पथक निवडणूकीसंदर्भात आढावा घेणार आहे.त्यांचा हा दौरा संपला कि विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.या निवडणुका साधारणपणे नोव्हें.महिन्याच्या मध्यास घेण्यात येतील,असा अंदाज आहे.त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख पक्षाच्या जागावाटप प्रक्रियेला आता चांगलाच वेग आला आहे.महायुतीच्या घटक पक्षाचे नेते कितीही दावा करत असले तरी याविषयी होणाऱ्या त्यांच्या मॅरेथॉन बैठकीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण होत आहे.भाजप व शिवसेना ( एकनाथ शिंदे गट )…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आ.नितेश राणे यांच्या भगव्या झंझावातापुढे अजित पवारांचा गुलाबी रंग फिकट, गेल्या आठ ते दहा दिवसापासून अजित पवार गटावर एकामागोमाग संकटे कोसळत असून भाजपचे आ.नितेश राणे यांनी त्यांची पळता भुई थोडी केली आहे.तर दुसरीकडे शरद पवार यांनीही अजित पवार यांचा गळा पकडण्यास सुरवात केली आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी जर घड्याळ चिन्हाबाबत निर्णय लागणार नसेल,तर ते चिन्ह गोठवण्यात यावे,व फुटीर गटाला दुसरे चिन्ह देण्यात यावे,अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.त्यामुळे अजित पवार गट सध्या अडचणीत आला आहे.एकीकडे काका आपल्याला अडचणीत आणण्यासाठी सतत जाळे फेकत असतो,तर दुसरीकडे नितेश राणे हे ” आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये,” असा दम भरू…
प्रवीण दवणे, डहाणू येथे झालेल्या लेखनस्पर्धेत विद्यार्थी व विद्यार्थिनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मोबाईलच्या विळख्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थी लेखन व काव्यलेखन स्पर्धेत चुणूक दाखवून विविध विषयांवर आपला ठसा उमटवत आहे.त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा,यासाठी कोमसाप पालघर शाखा विविध उपक्रम राबवत असते. आज के.एल.पोंदा शाळेत कोकण मराठी साहित्य परिषद,डहाणू शाखेने डहाणू तालुकास्तरीय लेखन व काव्यलेखस्पर्धेचे व सन २०२३ साली विजेत्या स्पर्धका़ना बक्षीस पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले होते.याप्रसंगी दि डहाणू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तरुणभाई पोंदा,सचीव सुधीर कामत,प्राचार्य सोपान इंगळे,कोमसाप पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे, शाखाध्यक्षा डॉ.अंजली मस्करेन्हस,सेवानिवृत्त कर्मचारी संघांचे तालुकाध्यक्ष मारुती वाघमारे,कार्यकारीणी सदस्य वसंत तांडेल,दिलीप जोंधळेकर,नीता नहार आदी मान्यवर उपस्थित होते. डहाणू तालुक्यातील १४ शाळा,…
दीपक मोहिते, मराठा व ओबीसी आंदोलक आमने-सामने, अंबड तालुक्यातील वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आज समोरासमोर आले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री इथे उपोषणाला बसले आहेत.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिसांनी या परिसरात अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.अंतरवली सराटी गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर वडीगोद्री या गावात मराठा आणि ओबीसी आंदोलक आज समोरासमोर आले व त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.मराठा आंदोलक शहागडमार्गे बीड जिल्ह्यात प्रवेश करणार असून पोलीसानी या मार्गावर बंदोबस्त वाढवला आहे. मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी प्रकृती बिघडल्याने मराठा समाजाचे अनेक आंदोलक अंतरवली सराटीत दाखल होत आहेत.अंतरवली सराटीत जाण्यासाठी लक्ष्मण हाके यांचं जेथे उपोषण सुरु आहे,त्या…
