Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, नालासोपारा येथील अनधिकृत इमारतीमधील रहिवाशांचे आझाद मैदानात आंदोलन, नालासोपारा पूर्वेस अग्रवाल नगरीमधील आरक्षित जागेवरील ४१ अनधिकृत इमारती मधील सुमारे दहा हजार रहिवाशांनी आझाद मैदानावर आंदोलन केले.यावेळी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी खा.सुप्रिया सुळे आंदोलन स्थळी आल्या होत्या.आंदोलकांचे म्हणणे ऐकल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी याविषयी चर्चा करणार असल्याचे सांगितले.पण रहिवाशांचे समाधान झाले नाही. या इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने वसई विरार महापालिकेला दिले आहेत.त्यामुळे पालिकेने येथील रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.खाजगी जमिनी बळकावून तसेच पालिकेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करून या इमारती बांधण्यात आल्या आहेत. नालासोपारा पूर्वेस अग्रवाल नगरी येथे भूमापन क्रमांक ( सर्व्हे नंबर ) २२ ते ३० पर्यंतचा…

Read More

दीपक मोहिते, राज्यात गेल्या काही वर्षात बालकामगारांची संख्या वाढली, पालघर जिल्ह्यात विविध उद्योगात बालकामगारांची संख्या सतत वाढत आहे.वीटभट्टी,हॉटेल्स,धाबे,किराणा मालाची दुकाने,घरकाम,वाड्या इ.क्षेत्रात सर्रास बालकामगार पाहायला मिळतात.आजच्या घडीला राज्यात सुमारे आठ ते दहा लाखाहून अधिक बालकामगार विविध धोकादायक उद्योगात काम करत आहेत. पण राज्याचे कामगार आयुक्त विभाग,हा वर्षानुवर्षे निद्रावस्थेत आहे.यासंदर्भात या विभागाने कोणतीही ठोस अशी कारवाई केली नाही. राज्यनिर्मितीला ६५ वर्षे पूर्ण झाली.या काळात अनेक कारखाने व अन्य व्यवसायात बालकामगार हे आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. वास्तविक बालश्रम निर्मूलनासाठी या विभागाने आपले अधिकार व हक्क उद्योजकांकडे गहाण टाकले आहेत.त्यामुळे राज्यात बालकामगारांची संख्या सतत वाढत गेली.बालकामगार बंदी नियमन…

Read More

दीपक मोहिते, पेजरचे स्फोट ; आधुनिक तंत्रज्ञान अतिरेक्यांच्या हाती पडता कामा नये, गेल्या आठवड्यात इस्रायलच्या ” मोसाद,” या जगप्रसिद्ध गुप्तचर संघटनेने हिजबुल्लाह संघटनेच्या नेत्यांना ठार मारण्यासाठी पेजर व वॉकी-टॉकीचा बेमालूम वापर केला,तो वाखाणण्याजोगा असाच आहे.या हिजबुल्लाह संघटनेने इस्त्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात उडी घेतली असून त्यांनी इस्त्रीलावर ड्रोनच्या साहाय्याने क्षेपणास्त्रे डागण्यास सुरुवात केली होती.त्यांना रोखण्यासाठी इस्त्र्यालाच्या मोसाद या गुप्तचर संघटनेने नवीन मार्ग स्विकारला.हाती असलेल्या या पेजर व वॉकी-टॉकीमध्ये स्फोटके भरून मोसादने अनेक लॅबेनॉन शहरात अनेक स्फोट घडवून आणले.या घडामोडीनंतर लॅबेनॉनने आपल्या देशात इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यावर बंदी घातली.मोबाईलच्या वापरामुळे इस्त्र्यायलच्या सैन्याला आपले लोकेशन कळते,व तो आपल्या नेत्याना टिपून मारतो,हे लक्षात आल्यानंतर हिजबुल्ल्लाहच्या नेत्यांनी तसेच…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष, राज्याच्या निवडणुका कधी लागतील,याविषयी शिगेला पोहोचलेली उत्कंठा कदाचित आज सांयकाळी चार वाजता संपुष्टात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली १४ जणांचे पथक काल मुंबईत आले असून त्यांनी गेल्या दोन दिवसात अनेक विभाग व राजकीय पक्षांच्या नेत्यासोबत बैठका घेतल्या.या बैठकीतून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. आज सांयकाळी चार वाजता त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका या १५ व १७ नोव्हें.अशा दोन दिवशी होतील,तर २० नोव्हें.ला मतमोजणी होईल,अशी शक्यता आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांशी विविध प्रश्नांवर संवाद साधला.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित…

Read More

दीपक मोहिते, शिवाजी महाराजांचा पुतळा ; चौकशी समितीच्या अहवालाने सरकारचे थोबाड फोडले, गेल्या २६ ऑगस्ट रोजी मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला होता.घाईघाईने बांधण्यात आलेला हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कसा काय पडतो व त्यामागची कारणे काय आहेत,याची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल दोन दिवसापूर्वी राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.ही समिती केंद्र सरकारने नियुक्त केली होती.यासमितीने दिलेल्या १६ पानी अहवालात नमूद करण्यात आलेली माहिती केवळ धक्कादायक नसून सत्ताधारी लोकांचा नालायकपणा सिद्ध करणारी आहे.पुतळा पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी कोणतीही माहिती न घेता ” या ठिकाणी ४५ कि.मी.वेगाने वारे वाहिल्यामुळे हा पुतळा पडल्याचे,” तोंड वर…

Read More

दीपक मोहिते, धोक्याची घंटा, युवासेनेचा विजय ; महायुतीसाठी धोक्याची घंटा, बहुचर्चित मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे निकाल काल लागले.या निवडणुकीत शिवसेना प्रणित ( उबाठा ) युवासेनेने भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पार धुव्वा उडवला.या निवडणुकीत आपला पराभव होईल,अशा भितीमुळे महायुती सरकारने ही निवडणूक दोनदा पुढे ढकलली होती.पण प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मुंबई विद्यापीठाला ही निवडणूक अत्यंत घाईघाईने घ्यावी लागली.या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे चांगलेच कान उपटले आहेत.एकूण १० पैकी ९ जागा जिंकून सिनेटवर आपले निर्विवाद वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका या कोरोनानंतर सुमारे अडीच वर्षे रखडल्या होत्या.त्या २२ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते.पण अखेरच्या क्षणी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अमित शहा यांनी कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्याऐवजी खच्चीकरण केले, गृहमंत्री अमित शहा यांनी विदर्भ,मराठवाडा व उ.महाराष्ट्र,या तीन विभागाचा नुकताच दौरा केला.या दौऱ्यात त्यांनी थेट स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.आजवर कधीही असं घडलं नव्हतं.त्यांनी या संवादातून कार्यकर्त्यांना प्राणवायू देण्याचा प्रयत्न केला.अचानकपणे अशाप्रकारची उपरती त्यांना का व्हावी ? या प्रश्नाचे उत्तर आहे,” लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव,” होय.४८ पैकी ४५ जागा जिंकणार,असे दिवास्वप्न पाहणाऱ्या अमित शहा व नरेंद्र मोदी यांना १७ जागांवर समाधान मानावे लागले.हा अनुभव लक्षात घेऊन तसेच त्याची पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी अमित शहा यांनी आता अशाप्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत.पण त्यांच्या या प्रयत्नाला कितपत यश…

Read More

दीपक मोहिते, ग्रामीण जनतेच्या हालअपेष्टा, साडेसात दशकानंतरही कृषीक्षेत्र आजही डगमगतच आहे, ग्रामीण भागातील शेतीला पाणी उपलब्ध करण्यासंदर्भात सरकारचे दिशाहीन धोरण,हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजवणारे ठरले आहे.आजवर अनेक अर्थतज्ञानी कृषी क्षेत्र हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून तो मजबूत रहावा,यासाठी सरकारकडून असलेल्या अपेक्षा कधीच पूर्ण होऊ शकल्या नाहीत,सतत सांगत आले.पण सरकारने कृषी क्षेत्राच्या धोरणात कोणतेही बदल केले नाहीत.संयुक्त पुरोगामी व राष्ट्रीय लोकशाही आघाडी या दोन्ही सरकारच्या उदासिनतेमुळे आज देशाच्या कृषी क्षेत्राची पार वाताहत झाली आहे.किमान आधारभूत भाव ( एमएसपी ) वरून दोन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या भयानक आंदोलनानंतरही सरकारला शहाणपण आलेले दिसत नाही.त्यामुळे आता पुन्हा हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारण्याचे संकेत दिले…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते एकूण १२ प्रकल्पाचे भुमीपूजन करणार आहेत.पण ज्या एस.पी.महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे,त्या मैदानावर प्रचंड चिखल झाल्यामुळे सभेची जागा बदलण्याची शक्यता आहे.निवडणूक आयोगाच्या पथकाचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घाईघाईने या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन उरकण्यात येत आहे.तसेच लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे मोदी व शहा या दोघांनी ” मिशन महाराष्ट्र,” हाती घेतले आहे.या अंतर्गत त्यांनी अनेक प्रकल्पाचा शुभारंभ करण्याचा सपाटा लावला आहे. अवघ्या दीड तासाच्या त्यांच्या या दौऱ्यात ते अत्यंत वेगाने १२ प्रकल्पाचे भूमिपूजन व तसेच उदघाटने पार…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक अपडेट्स, राज्य विधानसभा निवडणूक ; येत्या  आठवड्याभरात निवडणुकीचे बिगुल वाजणार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुक तयारीच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.निवडणूक आयोगाचे राजीवकुमार हे आजपासून आपल्या पथकासह महाराष्ट्र दौरा करणार आहेत.या दौऱ्यादरम्यान निवडणूक आयोग राजकीय पक्ष व संबधित विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत ते बैठका घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा २६ ते २८ सप्टें.दरम्यान महाराष्ट्र दौरा आखण्यात आला आहे.या दौऱ्यात निवडणूक अधिकारी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील. २६ सप्टें.रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईकडे रवाना होत आहेत.त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ सप्टें.रोजी सकाळी १०.०० वाजता निवडणूक मुख्य आयुक्त राजीवकुमार राज्यातील राजकीय पक्षांसोबत बैठक घेणार आहेत.त्यानंतर दुपारी १.००…

Read More