- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
सुशीला फातरपेकर,नालासोपारा नालासोपारा येथे ९ फेब्रु.रोजी फनस्ट्रीटचे आयोजन, मोबाईल आणि संगणकाच्या युगात दिवसें दिवस मैदानी खेळाकडे लहान मुलांसह तरुणांचा कल कमी होताना दिसत आहे.यासाठी नागरिकांना बालपणातील त्यांनी खेळलेल्या सर्व खेळाचा आनंद घेता यावा,त्यांच्यात खेळ व व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी वसई विरार शहर महानगरपालिका विविध सेवाभावी संस्थांच्या मदतीने ” फनस्ट्रीट,” या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे. या उपक्रमांर्तगत एकाच ठिकाणी अनेक पारंपारिक व इतर खेळात सहभागी होण्याची संधी उपलब्ध होत असून या फनस्ट्रीटच्या आयोजनामुळे वसई विरार शहरामधील नागरिकांना, विद्यार्थ्यांना त्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी व त्यांच्या मध्ये खेळांची तसेच विविध मैदानी खेळासह इतर खेळांची आवड निर्माण होण्यास मदत होणार आहे. या फनस्ट्रीटमध्ये…
दीपक मोहीते, स्वच्छ भारत अभियानाची ग्रामीण भागात होणार प्रभावी अंमलबजावणी, जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरू असून अनेक गावे स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श होत आहेत. जिल्ह्यातील ४७३ ग्रामपंचायतींमधील ८९८ गावांपैकी ७०३ गावे ओडीएफ प्लस मॉडेल झाली आहेत. १५ व्या वित्त आयोगातील बंधित निधीमधून जास्तीत जास्त निधी स्वच्छतेच्या कामावर खर्च करण्याचे निर्देश पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी यांना दिले आहेत.तसेच तालुका स्तरीय प्लास्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू करण्यात यावेत,तसेच गावापातळीवर स्वच्छतेच्या सुविधा कार्यरत राहण्यासाठी देखाभाल दुरुस्तीकरीता प्राधान्य द्यावे,अन्यथा कारवाई करण्यात येईल.अशी तंबीदेखील यावेळी अधिकारी वर्गाला दिली. स्वच्छ भारत मिशन ( ग्रा.) चा…
अनंत भोईर,पालघर, पालघर येथे ” बेटी बचाओ बेटी पढाओ,” मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न, काल बाल विकास प्रकल्प, पालघर नागरी अंतर्गत अंगणवाडी केंद्र वेवूर येथे ” बेटी बचाओ बेटी पढाओ,” या अभियानाअंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिवेश पष्टे ( अन्न तंत्रज्ञ व आरोग्य सेवक ) उपस्थित होते.प्रवीण मधुकर भावसार, बाल विकास प्रकल्प अधिकारी,यांनी मुलींना मार्गदर्शन केले तर मुख्यसेविका तृप्ती भोये आणि अंगणवाडी सेविका यांनी कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात मोलाची कामगिरी बजावली. उपरोक्त कार्यक्रमात ६५ किशोरवयीन मुली सहभागी झाल्या होत्या.मुलींना शिक्षण, पोषणयुक्त आहार,आरोग्य, स्वच्छता आणि मासिक पाळी व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.…
संजय लांडगे,वाडा, ग्रा.पं.अबिटघर कार्यालयाचा राष्ट्रध्वज फडकणार वारकऱ्याच्या हस्ते, आबिटघर ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी संतोष साठे या सातत्याने नाविन्यपूर्ण तसेच समाजाला दिशा देणाऱ्या गोष्टी आपल्या कार्यक्षेत्रात करत असतात.येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या गावातील सामाजिक, सांस्कृतिक तसेच सांप्रदायिक क्षेत्रात ज्यांनी आपला ठसा उमटवला आहे.अशा व्यक्तींना सामाजिक तसेच सार्वजनिक पटलावर स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने आबिटघर ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी संतोष साठे,उपसरपंच सुप्रिया सुनील पाटील ज्येष्ठ सदस्य भरत गोविंद जाधव व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांनी नेहमीच सकारात्मक निर्णय घेतले आहेत. याच अनुषंगाने आबिटघर गावातील गणपत शिडू पाटील यांच्या शुभ हस्ते येत्या २६ जाने.२०२५ रोजी आबिटघर ग्रामपंचायत कार्यालयावर झेंडा फडकवण्यात येणार आहे.पाटील यांनी आतापर्यंत सांप्रदायिक क्षेत्रात अर्थात वारकरी…
संजय नेवे,विक्रमगड, विक्रमगड येथे मेडिकल असो.तर्फे रक्तदान शिबीर, विक्रमगड महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड डॣगिस्ट असोशियनतर्फे आज राज्यभर तालुक्यात जगन्नाथजी आप्पासाहेब शिंदे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधत विक्रमगड येथील विठ्ठल मंदिर सभागृहामध्ये भव्य रक्तदानशिबिर संपन्न झाले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून बऱ्याच रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले जव्हार कुटीर रुग्णालय,यांच्या संकलन पेढीने रक्त संकलन केले यावेळी विक्रमगड मेडिकल स्टोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश प्रकाश भानुशाली,विजय पाटील सचिव,विक्रमगड मेडिकल स्टोअर्स असोसिएशन तसेच विक्रमगड मेडिकल स्टोअर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच वाडा,कुडूस अंबाडी येथील मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी प्रफुल पाटील,राजेश चाफेकर, मुकेश पाटील असोसिएशनचे सदस्य,जव्हार,मोखाडा येथील मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी इमरान जुमाने, मिलिंद…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अमित शहा यांना शरद पवारांचे एवढे वावडे का ? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग अद्याप मोकळा झाला नसला तरी राजकीय नेत्यांची एकमेकांवर चिखलफेक सुरू झाली आहे.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात आले की त्यांना शरद पवार यांच्यावर तोफ डागल्याशिवाय चैन पडत नाही.काल नाशिक येथे एका कार्यक्रमानिमित्त आले असता,त्यांनी आपल्या भाषणात,शरद पवार केंद्रात कृषिमंत्री असताना त्यांनी कृषी व सहकार क्षेत्रासाठी काय केले ? असा प्रश्न विचारत हल्ला चढवला.शरद पवार यांनीही त्यांच्या या टिकेनंतर पलटवार करताना अमित शहा,हे कोल्हापूरचे आहेत,असे वाटत नाही,असा चिमटा काढला.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शरद पवार यांचे इतके वावडे का ? हा एक संशोधनाचा…
सुरेश काटे,तलासरी, तलासरीत साजरा होतोय आनंददायी शनिवार, तलासरी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शासन निर्देशानुसार शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरत आहेत. विविध उपक्रम घेऊन मुलांना दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरत आहे. दप्तर मुक्त शाळेमध्ये मातीकाम,कागदकाम, पर्यावरण,स्नेही सवयी, चित्रकला,परसबाग,आनंदी बाजार,नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन,शारीरिक वाढ होण्यासाठी विविध प्रकारचे खेळ,गाणी,गोष्टी,वक्तृत्व स्पर्धा,परिसर भेट सहल, मोबाईलचे फायदे तोटे,असे विविध उपक्रम तलासरीतील विविध शाळेमध्ये राबवण्यात येत आहेत. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासन व शाळेच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत.सन २०२४-२०२५ मध्ये प्रत्येक इयत्तेच्या अभ्यासक्रमाचे चार भाग आले आहेत.मुले एक भाग घेऊन शाळेमध्ये येत आहेत.सर्व विषय त्या एकाच भागामध्ये आहेत. पुस्तकांमध्येच लिहिण्यासाठी…
सहकाराच्या माध्यमातूनच शेतकरी होतील आत्मनिर्भर – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन कटिबद्ध आहे.सहकारातूनच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग समृद्ध होऊन देशातील शेतकरी आत्मनिर्भर होईल. त्यासाठी शेतीला विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड देणे आवश्यक असून केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी राहील, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकारिता मंत्री अमित शहा यांनी केले. अजंग,ता.मालेगाव,जि. नाशिक येथे व्यंकटेश्वरा को. ऑप.पॉवर ॲण्ड ॲग्रो प्रोसिसिंगच्या माध्यमातून आयोजित सहकार परिषदेत केंद्रीय मंत्री शहा बोलत होते. यावेळी केंद्रीय सहकार व नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ,राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जलसंपदा ( विदर्भ, तापी खोरे व कोकण विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन,पणन व राजशिष्टाचार…
दीपक मोहिते, भारतीय प्रजासत्ताक दिनी इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित, आपला ७५ वा प्रजासत्ताक दिन अवघ्या ४८ तासावर आला आहॆ.तो आपण मोठ्या उत्साहात साजरा करणार आहोत.ब्रिटिश साम्राज्याच्या जोखडातून मुक्ती मिळाल्याचा आनंद व संविधान अमलबजावणीचा उत्सव म्हणून दरवर्षी हा दिवस साजरा करत असतो.यंदाचे हे अमृतमहोत्सवी वर्ष असल्यामुळे या दिनाला विशेष महत्व आहॆ.दिल्लीत होणाऱ्या सोहळ्याला इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. १५ ऑगस्ट १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षानंतर देशाच्या संविधान समितीने २६ नोव्हें.१९४९ साली संविधानाचा मसुदा स्विकारला व २६ जाने.१९५० रोजी ते अमलात आले.स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्याला स्वतःचे संविधान…
शुभम सावंत,विरार, पाणीपुरवठा संदर्भात मनपा मुख्यालयात आढावा बैठक संपन्न, वसई-विरार महानगरपालिका मुख्य कार्यालय,विरार येथे राज्यस्तरीय आदिवासी आढावा समिती अध्यक्ष ( मंत्री दर्जा ),वसईचे माजी आ. विवेक भाऊ पंडित यांच्या अध्यक्षतेखाली जल जीवन मिशन, हर घर जल योजना, आणि अमृत योजनांच्या प्रलंबित कामांचा आढावा बैठक पार पडली . या बैठकीत जलजीवन मिशनच्या विविध योजनांची अंमलबजावणी,प्रलंबित कामे, अडचणी आणि उपाययोजना, यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.वसई तालुक्यात मुबलक पाणी उपलब्ध असूनही,काही गावे आणि आदिवासी पाड्यांना आजही पिण्याचे पाणी मिळत नाही.तसेच वसई शहरांमधील सोसायट्यांनाही पुरेसे पाणी मिळत नाही.पाणीटंचाई भासत असून,सोसायट्यांना ट्रॅक्टरद्वारे पाणी आणण्यासाठी लाखो रु.ची बिले भरावी लागत आहेत.या संदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात…
