अनंत भोईर,पालघर,
पालघर येथे ” बेटी बचाओ बेटी पढाओ,” मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न,
काल बाल विकास प्रकल्प, पालघर नागरी अंतर्गत अंगणवाडी केंद्र वेवूर येथे ” बेटी बचाओ बेटी पढाओ,” या अभियानाअंतर्गत किशोरवयीन मुलींसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून दिवेश पष्टे ( अन्न तंत्रज्ञ व आरोग्य सेवक ) उपस्थित होते.प्रवीण मधुकर भावसार, बाल विकास प्रकल्प अधिकारी,यांनी मुलींना मार्गदर्शन केले तर मुख्यसेविका तृप्ती भोये आणि अंगणवाडी सेविका यांनी कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात मोलाची कामगिरी बजावली.
उपरोक्त कार्यक्रमात ६५ किशोरवयीन मुली सहभागी झाल्या होत्या.मुलींना शिक्षण, पोषणयुक्त आहार,आरोग्य, स्वच्छता आणि मासिक पाळी व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. किशोरवयीन मुलींना वरील विषयांची महत्त्वपूर्ण माहिती देत त्यांचे मानसिक,शारीरिक आणि सामाजिक आरोग्य सुधारण्यासाठी प्रेरित करण्यात आले.
कार्यक्रमाची प्रमुख वैशिष्ठे –
शिक्षण : शिक्षणाच्या महत्त्वावर भर देत मुलींना आत्मनिर्भर होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले.
आहार : पोषणयुक्त आहारामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांची माहिती देण्यात आली.
आरोग्य व स्वच्छता :
आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे महत्त्व आणि त्यासंबंधीच्या मूलभूत सवयी विकसित करण्यावर चर्चा झाली.
मासिक पाळी व्यवस्थापन : मासिक पाळीविषयीचे गैरसमज दूर करत याबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये उपस्थित किशोरवयीन मुलींनी प्रश्न विचारून आपल्या शंकाचे निरसन केले.अशा उपक्रमांमुळे मुलींच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते, तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्याला आधार मिळतो. असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात मुख्यसेविका, अंगणवाडी सेविका आणि बाल विकास प्रकल्प पालघर नागरी यांचा सहभाग कौतुकास्पद असून त्यांनी किशोरवयीन मुलींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुढाकार घेतला.

