संजय नेवे,विक्रमगड,
विक्रमगड येथे मेडिकल असो.तर्फे रक्तदान शिबीर,
विक्रमगड महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड डॣगिस्ट असोशियनतर्फे आज राज्यभर तालुक्यात जगन्नाथजी आप्पासाहेब शिंदे यांच्या ७५ व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधत विक्रमगड येथील विठ्ठल मंदिर सभागृहामध्ये भव्य रक्तदानशिबिर संपन्न झाले. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून बऱ्याच रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले जव्हार कुटीर रुग्णालय,यांच्या संकलन पेढीने रक्त संकलन केले यावेळी विक्रमगड मेडिकल स्टोअर्स असोसिएशनचे अध्यक्ष योगेश प्रकाश भानुशाली,विजय पाटील सचिव,विक्रमगड मेडिकल स्टोअर्स असोसिएशन तसेच विक्रमगड मेडिकल स्टोअर्स असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य तसेच वाडा,कुडूस अंबाडी येथील मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी प्रफुल पाटील,राजेश चाफेकर, मुकेश पाटील असोसिएशनचे सदस्य,जव्हार,मोखाडा येथील मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी इमरान जुमाने, मिलिंद चुंबळे व तेथील मेडिकल स्टोअर असोसिएशनचे सदस्य, दुकानात काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाने,तसेच इच्छुक नागरिक स्वच्छेने रक्तदान करून या शिबिरात सहभागी झाले होते.
या शिबिरात विविध पक्षाचे मान्यवर व पत्रकार उपस्थित होते.

