संजय लांडगे,वाडा,
ग्रा.पं.अबिटघर कार्यालयाचा राष्ट्रध्वज फडकणार वारकऱ्याच्या हस्ते,
आबिटघर ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी संतोष साठे या सातत्याने नाविन्यपूर्ण तसेच समाजाला दिशा देणाऱ्या गोष्टी आपल्या कार्यक्षेत्रात करत असतात.येत्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या गावातील सामाजिक, सांस्कृतिक तसेच सांप्रदायिक क्षेत्रात ज्यांनी आपला ठसा उमटवला आहे.अशा व्यक्तींना सामाजिक तसेच सार्वजनिक पटलावर स्थान मिळवून देण्याच्या उद्देशाने आबिटघर ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी संतोष साठे,उपसरपंच सुप्रिया सुनील पाटील ज्येष्ठ सदस्य भरत गोविंद जाधव व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी यांनी नेहमीच सकारात्मक निर्णय घेतले आहेत.
याच अनुषंगाने आबिटघर गावातील गणपत शिडू पाटील यांच्या शुभ हस्ते येत्या २६ जाने.२०२५ रोजी आबिटघर ग्रामपंचायत कार्यालयावर झेंडा फडकवण्यात येणार आहे.पाटील यांनी आतापर्यंत सांप्रदायिक क्षेत्रात अर्थात वारकरी म्हणून गावाचा नावलौकिक वाढवला,संत परंपरेची पताका आपल्या खांद्यावर घेऊन गावाच्या अखंड हरिनाम सप्ताहात त्यांनी सातत्याने आपले योगदान देऊन गावाचा सन्मान वाढवला.सोबतच अतिशय मृदू आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची सर्वदूर ख्याती आहे.तसेच सामाजिक बांधिलकी जोपासणारे एक सवेंदनशील व्यक्ती म्हणून ते परिचित आहेत.
त्यांचा सन्मान व्हावा, असा उद्देश बाळगून सरपंच साक्षी संतोष साठे यांनी स्वतःचा झेंडा फडकवण्याचा मान आपल्या आधिकारात दुसऱ्या व्यक्तीला देण्याचा निर्णय घेतला आहॆ.त्यांच्या या निर्णयाचे पंचक्रोशीत अनेक गावात स्वागत होत आहॆ.

