सुरेश काटे,तलासरी,
तलासरीत साजरा होतोय आनंददायी शनिवार,
तलासरी तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमध्ये शासन निर्देशानुसार शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरत आहेत. विविध उपक्रम घेऊन मुलांना दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शनिवारी दप्तरमुक्त शाळा भरत आहे.
दप्तर मुक्त शाळेमध्ये मातीकाम,कागदकाम, पर्यावरण,स्नेही सवयी, चित्रकला,परसबाग,आनंदी बाजार,नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती व्यवस्थापन,शारीरिक वाढ होण्यासाठी विविध प्रकारचे खेळ,गाणी,गोष्टी,वक्तृत्व स्पर्धा,परिसर भेट सहल, मोबाईलचे फायदे तोटे,असे विविध उपक्रम तलासरीतील विविध शाळेमध्ये राबवण्यात येत आहेत.
दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शासन व शाळेच्या माध्यमातून विविध प्रयत्न केले जात आहेत.सन २०२४-२०२५ मध्ये प्रत्येक इयत्तेच्या अभ्यासक्रमाचे चार भाग आले आहेत.मुले एक भाग घेऊन शाळेमध्ये येत आहेत.सर्व विषय त्या एकाच भागामध्ये आहेत. पुस्तकांमध्येच लिहिण्यासाठी एक कोरे पान दिले आहे. त्यावर नोट लिहिल्या जात आहेत.या चार पुस्तकाच्या भागामुळे दप्तराचे ओझे मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे.
यासाठी तलासरी तालुक्याचे गट विकास अधिकारी डॉ. वैभव सापळे,निमिश मोहिते व विस्तार अधिकारी,केंद्र प्रमुख यांचे मार्गदर्शन लाभले.

