वसंत भोईर,वाडा,
करडीचे तेलाचे भाव कडाडणार…
जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्याचा अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत. तरीही तेलबियांचे क्षेत्र वाढलेले नाही.यामध्ये करडईचे क्षेत्र निरंक आहे तेल वर्गीय पीक असलेल्या करडईला बाजारात मागणी व दरही मिळत आहे. मात्र,कीड व रोगाचा प्रादुर्भाव, काढणीच्या हंगामात मजूर न मिळणे,आदी कारणांमुळे आता करडईचे पीक रब्बी हंगामातून बाद झाले आहे.
रब्बीचा पेरा
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात वाल,हरभरा,तीळ,मुग,धने, थोड्याफार प्रमाणात सूर्यफूल या रब्बी पिकांची पेरणी जवळजवळ आटोपली आहे.८० टक्के क्षेत्रावर यावर्षी रब्बीचा पेरा आहे.
करडईचे क्षेत्र निरंक..
रब्बी हंगामात यंदा गलित धान्याचे क्षेत्र एकदम कमी झाले आहे.विशेष म्हणजे जिल्ह्यात करडई, जवस पिकाचे क्षेत्र निरंक आहे.
करडईचा पेरा झाला बाद…
रब्बी हंगामात काही मोजके शेतकरी करडईचे उत्पादन घेत होते.मात्र,आता जवळ जवळ करडईचे क्षेत्र बाद झाले आहे.रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा कळ हरभरा, वाल,मुग या पिकांकडे जास्त असल्याचे दिसून येते.
करडईचे तेल २५० रु. किलो
तिळाच्या आयात शुल्कात केंद्रशासनाने वाढ केल्यानंतर सर्वच तेलाच्या दरात वाढ झालेली आहे. त्यानुसार करडईचे तेल आता २५० रु.किलो दराने विकले जात आहे.
करडईचा पेरा का झाला बंद ?
उगवणशक्तीमध्ये कमी, काढणीच्या काळात मजुरांचा तुटवडा,कमी उत्पादन खर्चाच्या हरभरा पिकाकडे शेतकऱ्यांचा कल,कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिक बाद झाले.
पाण्यात पैसे देणारे पीक
पीक हे कमी खर्चात जास्त उत्पादन देणारे पीक आहे.मात्र,पिकाला काटे असल्याने काढणीच्या काळात मजूर मिळत नाहीत,हा मोठा दोष आहे प्रत्यक्षात या पिकाचे उत्पादन चांगले मिळते व दरही चांगला आहे.
रब्बी गळीत धान्याचे क्षेत्र वाढावे,यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. शिवाय शेतकऱ्यासाठी विविध योजना देखील आहेत. शेतकऱ्यांचा कल कमी उत्पादन खर्चात असलेल्या पिकांकडे असल्याचे दिसून येते.
-संजय घरत, कूषी अधिकारी

