वसंत भोईर,वाडा,
ईव्हीएम हटाव ; काँग्रेसतर्फे वाडा येथे सह्यांची मोहीम
महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल राज्यातील जनतेसाठी धक्कादायक अविश्वासनीय आहेत.कोणतीही लाट नसताना पाच महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीतील निकालाच्या एकदम उलट निकाल कसे काय लागू शकतात ? असा प्रश्न राजकीय नेते कार्यकर्ते यांच्यासह राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते व सामान्य नागरिकांना पडला आहे.त्यामुळे निवडणुका,या दोन ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर व घेण्याची मागणी करत वाडा तालुका काँग्रेसतर्फे सह्यांची मोहीम राबवण्यात आली.
यावेळी ईव्हीएम हटाव देश बचाव,” च्या घोषणा काँग्रेस कार्यकर्ते देत होते.तसेच निवडणुका या बॅलेट पेपरवरच घेण्यात याव्यात,अशी मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली.
या मोहिमेत पालघर काँग्रेस जिल्हा अध्यक्ष प्रफुल पाटील,महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सहकार सेलचे सरचिटणीस निलेश भोईर,तालुका अध्यक्ष दिलीप पाटील,शहर अध्यक्ष सुशील पातकर,पालघर जिल्हा काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष गणेश बाराठे,मुलीच्या महिला तालुका अध्यक्षा साक्षी आगिवले,वाडा शहर अध्यक्ष प्रमिला धोडी,गिरीश पाटील, प्रकाश काबाडी,राजेश राहणे, आदीसह कार्यकर्ते पदाधिकारी सहभागी झाले होते.

