वसंत भोईर,वाडा,
साहीत्यिक योगेश गोतारणे याचे सुयश
अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत,”साहित्य भारती,” डोंबिवली शाखा आयोजित राज्यस्तरीय लेख लेखन स्पर्धेत वाडा तालुक्यातील साहीत्यिक योगेश नंदा तुकाराम गोतारणे यांनी ” पर्यावरण जागरूकता,” या विषयावरील लेख लिहून यश प्राप्त केले.सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व मानधन देवून त्यांना गौरवण्यात आले.रवि. १५ डिसे.रोजी डोंबिवलीत हा कार्यक्रम झाला.यावेळी ” सहजीवन,” यावर झालेल्या परिसंवादात डॉ.अद्वैत पाध्ये मनसोपचार तज्ञ,प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सहजीवन यशस्वी व्हावे,यासाठी ते समुपदेशन करत असतात.परिसंवादामध्ये उपस्थित वक्त्यांनी आपली मते मांडली.आयोजिका उज्ज्वला लुकतुके म्हणाल्या, ” आजची तरुणाई व्यवसायिक दृष्ट्या यशस्वी असली तरी संसाराच्या करिअरमध्ये ते कधी काठावर पास होतात तर कधी भोपळा त्यांना मिळतो,असे का होते ? याचा अभ्यास जरूर व्हायला हवा.
या कार्यक्रमात लेख स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.विषय होते, “प्रसारमाध्यमे आणि त्यांचे परिणाम,” ” सणांचे बदलते स्वरूप,” ” दोन पिढ्यांमधील समन्वय,” आणि ” पर्यावरण जागरूकता.”
प्रथम क्रमांक ( विभागून ) श्रद्धा वझे – कल्याण,वैशाली जोशी- डोंबिवली,द्वितीय क्रमांक भारती जोशी- ठाणे, तृतीय क्रमांक- योगेश गोतारणे,विरार,यांनी मिळविले.कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी अध्यक्षा अश्विनी मुजुमदार,उज्ज्वला लुकतुके, छाया घाटगे आणि सर्व सभासदांनी मनापासून प्रयत्न केले.मेघना पाध्ये यांनी आभार मानले.तर सूत्रसंचालन अदिती जोशी केले तर ईशस्तवन माधुरी येल्लापूरकर यांनी म्हंटले.

