दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
भाजपने एकनाथ शिंदेंचा गळा आवळण्यास सुरुवात केली,तर अजित पवारही डेंजर झोनमध्ये,
अखेर भाजपने डाव साधला,राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागणार आहे,त्यामुळे शिंदे यांचा पत्ता कट झाला आहे.त्यांना उपमुख्यमंत्रीपद किंवा केंद्रात मंत्रिपद अशी ऑफर देण्यात आली आहे.पण शिंदे यांना हे दोन्ही प्रस्ताव मान्य नाहीत.ते पक्षप्रमुख म्हणून राहणार असू देशभरात आपल्या पक्षाचा विस्तार करण्याचे त्यांनी संकेत दिले आहेत.
भाजपच्या दिल्लीतील नेत्यांनी नियोजनबद्ध आखणी करत शिंदे यांची कोंडी केल्याचे दिसून आले आहे.शिंदे यांनी जर काही गडबड केली तर अजित पवार गटाला हाताशी धरून सत्ता स्थापन करण्यासंदर्भात मोदी व शहा हे दोघे सध्या चाचपणी करत आहेत.मुख्यमंत्रीपदावर काम केल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद स्विकारणे म्हणजे आपल्या राजकीय कारकिर्दीला ओहोटी लावून घेण्यासारखे आहे,तसेच केंद्रातील मंत्रिपद हे आपला श्वास कोंडणारे ठरेल,अशा शक्यतेमुळे शिंदे यांनी नकार दिला आहे.आपल्याला मिळणारे उपमुख्यमंत्रीपद ते मराठा किंवा ओबीसी आमदाराला बहाल करण्याच्या मनस्थितीत आहेत.वास्तविक या ज्या घडामोडी घडत आहेत,त्या घडणारच होत्या, कारण भाजप हा आपल्या पंखाखाली ज्या प्रादेशिक पक्षांना आपल्या पंखाखाली घेतो,त्यांची कालांतराने कोंडी करतो.शिंदे यांच्या बाबतीत सध्या तेच घडत आहे.या सर्व घडामोडीमुळे सध्या अजित पवार गटात आनंदाचे वातावरण असले तरी,भाजप राज्यात स्वबळावर स्थिर झाल्यानंतर अजित पवार गटाचे हाल कुत्रे देखील खाणार नाही.राज्यात स्वबळावर सरकार आणायचे असल्यास राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच हवेत,असे मोदी व शहा यांचे म्हणणे आहे.फडणवीस हे फोडाफोडीच्या राजकारणाचे चाणक्य आहेत.त्यामुळे या जोडगोळीने सर्वप्रथम शिंदेंची विकेट काढली आहे.त्यानंतर अजित पवार यांचा नंबर लागणार आहे.दरम्यान या दोघांचे आमदार गळाला लावण्यासाठी भाजप पुन्हा खोक्याचे राजकारण सुरू करेल.आगामी महानगरपालिका निवडणुका लक्षात घेऊन देवेंद्र फडणवीस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असायला हवेत,त्यासाठी अशी व्यूहरचना आखण्यात येत आहे.पण शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले नाही तर महायुतीला मुंबई,ठाणे,भिवंडी,कल्याण- डोंबिवली,या महानगरपालिका व बदलापूर- कुळगाव व अंबरनाथ महापालिकेच्या निवडणुकीत फटका बसू शकतो.

