दीपक मोहिते,
कुणबी सेना आणि आगरी कोळी सेनेचा बहुजन विकास आघाडीला पाठिंबा,
पालघर जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुका निवडणुकीच्या प्रचारातबहुजन विकास आघडीने प्रचंड आघाडी घेतली आहे.त्यामुळे विरोधी पक्षांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात आश्चर्यकारक घटना घडत आहेत.कुणबी व आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आ.हितेंद्र ठाकूर यांची विरार येथे भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे.काही मातब्बर उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी अनेक संघटना पुढे येत आहेत.त्यामुळे विरोधी पक्षाचे धाबे दणाणले आहे.या घडामोडीमुळे भयभीत झालेल्या एका राष्ट्रीय पक्षाने जागावाटपाच्या धर्तीवर आता पैसेवाटप करण्याचा उद्योग सुरू केला आहे.जिल्ह्यातील बहुजन विकास आघाडी या प्रमुख पक्षास ठाणे आणि पालघर जिल्ह्यात प्रभाव असलेल्या कुणबी सेना आणि आगरी कोळी सेनेने आज बिनशर्तं पाठिंबा देवू केला आहे.
आगरी कोळी सेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष भूपेश कडूलकर यांनी काल दुपारी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विरार येथे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष,आ.हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितिज ठाकूर यांची भेट घेऊन,त्यांना आगरी कोळी सेनेचा जाहीर पाठिंबा देत असल्याचे पत्र दिले.तत्पूर्वी सकाळी कुणबी सेनेचे अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांनी त्यांच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह आ. हितेंद्र ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना या निवडणुकीत कुणबी सेना विधानसभा निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.विशेष म्हणजे कुणबी सेना ही संघटना गेली सात वर्षे भाजपासोबत होती.मात्र त्यांनी संघटनाचे प्रश्न व समस्या याकडे कायम दुर्लक्ष केले.त्यामुळे कुणबी सेना आणि भाजपामध्ये दुरावा निर्माण झाला होता.
या दोन्ही संघटनांचा पाठिंबा मिळाल्यामुळे बहुजन विकास आघाडीच्या पालघर जिल्ह्यातील वसई, नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघातील तिन्ही उमेदवारांच्या विजयाला चांगलाच हातभार लागणार आहे.तसेच पालघर जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना,कामगार संघटना व धार्मिक संस्था बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देण्यासाठी पुढे येत आहेत.या सर्व घडामोडीमुळे भाजप व काँग्रेस आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य पसरले आहे.

