दीपक मोहिते,
फ्रंटलाईन,
आपल्याला खोकेबाज सरकार भस्मसात करायचे आहे-उद्धव ठाकरे,
काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कोल्हापूर जिल्ह्यात राधानगरी विधानसभा मतदारसंघात झालेली पहिली जाहीर सभा न भूतो न भविष्यती अशी झाली.या जाहीर सभेला झालेल्या गर्दीने यापूर्वीचे सारे रेकॉर्ड ब्रेक केले.
या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारभाराची अक्षरशः पिसे काढली.ते यावेळी म्हणाले, कोण स्वतःला देवाभाऊ तर कोण स्वतःला गुलाबी भाऊ म्हणतो,पण हे तिन्ही भाऊ जेथे जाऊ तेथे खाऊ,अशा पद्धतीने वागत आहेत.ज्या माणसाला आपण सर्वस्व दिलं,मानसन्मान प्रेम व आमदारकी दिल्यानंतरही हा नराधम आता शिवसेना नावाच्या आईच्या छाताडावर वार करायला उभा आहे.पण त्याला ते शक्य होणार नाही,कारण या जिल्ह्यातील सर्व जागा जिंकण्याची जबाबदारी मी सतेज पाटलावर देत आहे.सतेज आपल्याबरोबर आहे,तो ही जबाबदारी नक्कीच पार पाडेल,अशी मला खात्री आहे.आपल्याला या निवडणुकीत खोके सरकार भस्मसात करायचे आहे.या लोकांसारखे मलाही संपूर्ण शिवसेना त्यांच्याकडे नेता आली असती,पण मी तसे केले नाही,मी स्वाभिमानी आहे.मला महाराष्ट्र गहाण ठेवायचा नाही.या लोकांनी जिल्ह्याचे पाणी देखील अदानीला विकले.अशा या सरकारला खाली खेचण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे.त्यांच्या या घणाघाती भाषणापूर्वी के.पी.पाटील,सतेज पाटील व अन्य नेत्यांची भाषणे झाली.

