पालघर,
वसई व नालासोपारा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बंडखोरांची डोकेदुखी,
१३२ नालासोपारा व १३३ वसई या दोन्ही विधानसभा मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना सध्या बंडखोरांना तोंड द्यावे लागत आहेत.महाविकास आघाडीचे वसईचे विजय पाटील व संदीप पाटील या दोघांविरोधात काँग्रेस व शिवसेना ( उबाठा ) या दोन्ही घटक पक्षातील बंडखोरांनी चांगलीच उचल खाल्ली आहे.तर दुसरीकडे महायुतीचे नालासोपारा व वसई मतदारसंघात भाजपचे अनुक्रमे राजन नाईक व स्नेहा दुबे या दोघांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
त्यामुळे बंडखोर मंडळी निवडणुकीच्या रिंगणात उतरले नसले तरी ते प्रचारापासून दूर राहणार आहेत.वसई येथे गेली अनेक वर्षे भाजपच्या उभारणीमध्ये महत्वाचे योगदान देणाऱ्या मनोज पाटील यांना डावलून नेत्यांनी आमच्या एका वरिष्ठ व प्रामाणिक पदाधिकाऱ्यावर अन्याय केल्याची भावना भाजप कार्यकर्त्यांमध्ये पसरली आहे.ज्यांना उमेदवारी देण्यात आली,त्यांचे पक्षात योगदान काय आहे ? अशी विचारणा भाजपचे कार्यकर्ते करत आहेत,तर अनेक पदाधिकाऱ्यांनी स्नेहा दुबे या पक्षाच्या सदस्य देखील नाहीत व त्यांना उमेदवारी दिली जाते व ज्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्या,त्यांना मात्र डावलले जाते,त्यामुळे ही निवडणूक जिंकणे,भाजपला शक्य नाही,असे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.येथे शिंदे व अजित पवार गटाची ताकद नगण्य आहे,त्यामुळे त्यांची भाजपला किंचितही मदत होऊ शकत नाही.
अशावेळी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी हाडाचा कार्यकर्ता,अशी ओळख असलेल्या मनोज पाटील यांना डावलणे,हे पराभवाला आमंत्रण देण्यासारखे आहे,असे अनेक आरएसएसच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यानी आज माध्यमांशी बोलताना सांगितले.नालासोपारा येथे उमेदवार राजन नाईक यांना पक्षातील विविध घटकांचा तीव्र विरोध असून या समाज घटकांच्या नेत्यांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना उमेदवारी देणे,म्हणजे पदाधिकाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे.त्यामुळे हे दोन्ही मतदारसंघ भाजपला गमवावे लागणार आहेत.
महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी विजय पाटील व संदीप पांडे यांना उमेदवारी देऊन पराभवाची मालिका अखंड सुरू ठेवण्याची तजवीज करून ठेवली आहे,अशा जळजळीत प्रतिक्रिया पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत होत्या.वसई व नालासोपारा शिवसेनेनेच्या
(उबाठा ) अनेक शाखांच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी राजीनामे देण्याची तयारी चालवली आहे.तर अनेक पदाधिकारी बोईसर येथे आपल्या पक्षाचे उमेदवार डॉ.विश्वास वळवी यांच्या प्रचारासाठी बोईसर गाठण्याचा,निर्णय घेतला आहे.दरम्यान आ.हितेंद्र ठाकूर,आ.क्षितिज ठाकूर व आ.राजेश पाटील,पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरी व ग्रामीण भाग आजपासून पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे.त्यांच्या प्रचारात मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

