पालघर,
वसई विरार शहर मनपाच्या ताफ्यात नवीन १०० इलेक्ट्रिक बसेस,
आ.क्षितिज ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश,
वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या ताफ्यात यंदा नवीन १०० बसेस दाखल होणार आहेत.प्रधानमंत्री इलेक्ट्रिक बससेवा योजनेंतर्गत या चार शहरातील नागरिकांना उत्कृष्ट प्रवासी सेवा देण्यासाठी महानगरपालिकेला भरीव आर्थिक निधी मंजूर झाला आहे.त्यापैकी १५ कोटी रु.चा पहिला हप्ता महानगरपालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे.हा निधी मिळावा,यासाठी नालासोपाऱ्याचे आ.क्षितिज ठाकूर हे गेले वर्षभर पाठपुरावा करत होते.अखेर त्यांच्या प्रयत्नाला चांगले यश मिळाले.
या योजनेंतर्गत महानगरपालिकेला ३६ कोटी रु.चा निधी मंजूर झाला असून या निधीतून बसखरेदी,नालासोपारा व नवघर बस आगाराची कामे मार्गी लागणार आहेत.तसेच केंद्रसरकारच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातील ओलेक्ट्रा कंपनीच्या ४० बसेसपैकी २० बसेस ऑगस्ट महिन्यात महानगरपालिकेच्या ताब्यात आल्या होत्या.त्यांची रीतसर नोंदणी देखील झाली आहे.या सर्व बसेस विना वातानुकुलीत असून या बसेस ३२ सिटरच्या आहेत.नव्याने दाखल होणाऱ्या अद्ययावत इलेक्टिक बसेसमुळे नागरिकांना चांगली प्रवासीसेवा उपलब्ध होणार आहे.या प्रकरणी आ.क्षितिज ठाकूर यांनी महत्वाची भूमिका पार पाडल्यामुळे नागरिक त्यांना धन्यवाद देत आहेत.

